Rays Power Infra announced closure of INR 127 Crore Equity Capital Fund Raise - Union Minister Piyush Goyal Inaugurates Hunger Free World Initiative at Atal Bihari Vajpayee Kaushalya Vikas Kendra, Mumbai - CMR Green Technologies Limited Announced its Initial Public Offer (IPO) to open on June 3, 2026 At the Price Band of the Offer has been fixed at ₹ 182 to ₹ 192 per Equity Share - PM Modi's 12 Years: From Self-Reliant India to 'Make for the World' - Fadnavis, Chavan List Achievements - Sadbhavana Old Age Home needs ‘Mavtar’ The world’s largest ‘Vinubhai Bachubhai Nagrecha Campus’ Sadbhavana Old Age Home (Rajkot) requires childless, destitute, bedridden mavtar. Free admission will be given - Tata Realty and Salesforce Collaborate to Set New Benchmarks in AI-Led Customer Experience - Yami Gautam Dhar joins Surya Hospitals’ “The Amber Promise for Women’s Health” initiative during the launch of the Amber Wing at Santacruz Mumbai - Celebrating Innovation: HDFC SKY Shares Perspectives on India’s F&O Market Growth on National Technology Day - Rahul Shewale, Madhoo, Ashok Dhamankar and Mujtaba Aziz Naza Unveil the Latest Issue of ‘Society Interiors & Design’ Featuring Ar. Kavita & Ar. Soyuz Talib - Eugenix Hair Sciences celebrate 10 Years of Business Expansion Backed by 20,000+ Success Patients From a modest clinic in the Himalayan foothills to a name trusted across continents, Eugenix’s decade-long journey reflects a quiet revolution built on trust, innovation and patient-first care - VFS Global‑led consortium wins major citizen services contract to drive technology‑enabled transformation of 60 Model Sub‑Registrar Offices across Maharashtra

नाबार्ड समर्थित महालक्ष्मी सरस 2023-24  मेळ्यास  उत्साहात प्रारंभ ग्रामीण  कारागिरांना बँकेकडून पाठबळ, एमएमआरडीए मैदानावर 7 जानेवारीपर्यंत आयोजन

मुंबई, 26 डिसेंबर, 2023 (GNI):  भारताच्या  समृद्ध  सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या महालक्ष्मी सरस 2023-24 या उत्सावाचे 26 डिसेंबरला  मुंबईतील वांद्रे  कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसीमधील एमएमआरडीएच्या मैदानावर अतिशय उत्साहात आणि धडाक्यात शुभारंभ झालानॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्डतर्फे आयोजित या उत्सावात देशभरातील अनेक कारागिरांना त्यांच्या मालाची विक्रीसाठी उत्तम दालन प्राप्त झालेले आहे.

महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री श्रीगिरीश महाजन यांनी महालक्ष्मी सरस 2023-24 या उत्सावाचे उदघाटन केलेयावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियाना (एमएसआरएलएमचे सीईओ श्रीरूचेश जयवंशीएमएसआरएलएमचे सीओओ श्रीपरमेश्वर राऊतरेमंड डिसोझा तसेच एमएसआरएलएमचे अन्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते

महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियाना (एमएसआरएलएमशी संबंधित असलेल्या उमेद या उपक्रमाच्या सहकार्यानेकेद्र सरकारचे ग्रामीण विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचे ग्रामीण विकास विभाग यांच्याद्वारे 2006 पासून दरवर्षी आयोजित केला जाणारा महालक्ष्मी सरस मेळा हे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करतेबचत गट (एसएचजी), ग्रामीण भागातील कुशल कारागीरकलाकारशेतकरी आणि अन्य भागधारकांना त्यांची उत्पादने ग्राहकांसमोर आणण्यात तसेच शहरी ग्राहकांशी थेट संबध जोडण्यासाठी हा मेळा अतिशय उपयुक्त ठरला आहे.

याप्रसंगी बोलताना नाबार्डचे अध्यक्ष श्रीकेव्हीशाजी (Shaji) म्हणाले, “महालक्ष्मी सरस मेळा  ग्रामीण कारागिरांना सक्षम बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहेकारागिरांना आम्ही केवळ बाजारपेठच उपलब्ध करून देत नाही तरभारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या सखोल माहितीचा प्रसार करणाऱ्या कार्यक्रमाशी जोडले गेलो आहेयाचा आम्हाला अभिमान आहेयासारख्या उपक्रमांद्वारेग्रामीण कारागीर आणि शहरी ग्राहक यांच्यातील दरी कमी करणेशाश्वत उपजीविका निर्माण करणे आणि आपल्या समृध्द आण विविधता असलेल्या परंपरांचे जतन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,”

याप्रसंगी बोलताना नाबार्डचे सीजीएम श्रीरेमंड डिसोझा म्हणाले, “नाबार्डने पाठबळ दिलेला प्रत्येक स्टॉल आमच्या कारागिरांनी सुंदररित्या विणलेले हातमाग तसेच हस्तकला तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची गाथा उलगडतोनाबार्ड ग्रामीण कारागीर आणि शेतकर्यांना अत्याधुनिक पध्दतीने मदत करत राहील आणि सरस मेळ्यात त्यांच्यासाठी तब्बल 49 स्टॉलची तरतूद हे एक उदाहरण आहेसरसमध्ये सहभागी झालेले कारागीर ग्रामीण भागातील अन्य कारागींराना पुढे येण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांची शहरी भागात विक्री करण्यास प्रेरित करतीलअसा आम्हाला विश्वास आहे.”

यंदाच्या उत्सवात 500 हून अधिक स्टॉल्स आहेतया स्टॉल्सवर भारतभरातील विविध उत्पादने मांडण्यात आलेली आहेतउल्लेखनीय म्हणजेनाबार्डने देशभरातील विविध कारागिरांच्या ४९ स्टॉल्ससाठी मदत देत मेळ्याच्या अनोख्या योजनेमध्ये योगदान दिलेले आहेया स्टॉल्सच्या माध्यमातून आसामी गामोचापोचमपल्ली साड्याबनारसी साड्याटांगलिया उत्पादने इत्यादी कलाकुसरीच्या वस्तू मांडण्यात आलेल्या आहेतस्वयंम बचत गट (एसएचजी), शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओआणि बिगर शेतकरी उत्पादक संस्था (ओएफपीओतील सुमारे 100 ग्रामीण कारागिरांना त्यांची उत्पादने सादर करण्यासाठी नाबार्ड मदत करत आहेनाबार्डसहाय्यित कारागीर गट या मेळ्यात 13 भौगोलिक संकेत (जीआयप्रमाणित उत्पादनांचे प्रदर्शन करणार आहे.

ग्रामीण भागातील दुर्लक्षित होत चाललेल्या  कला आणि हस्तकलेचे संरक्षण करण्याची गरज ओळखूनत्यांना मदतीसाठी नाबार्ड आघाडीवर आहेग्रामीण कारागीरविणकरशेतकरी आणि कारागीर यांना आर्थिक सहाय्यकौशल्यबाजार जोडणी आणि पायाभूत सुविधा प्रदान करत बँक मदत करत आहेआपल्या सहाय्यकारी उपक्रमांचा एक भाग म्हणूनसरस मेळ्याचा 2023-24 उत्सवासाठी नाबार्ड सातत्यपूर्ण सहाय्य देत आहेजीआयटॅग केलेल्या उत्पादनांचे महत्त्व अधोरेखित करताना नाबार्ड हे सुध्दा सुनिश्चित करत आहे कीकेवळ सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण उत्पादने यांनाच मेळ्यामध्ये स्थान मिळेल आणि शहरी ग्राहकांसमोर या वैविध्यपूर्ण  आणि विशिष्टतेने नटलेल्या आपल्या समृद्ध परंपरेचे सादरीकरण होईल.

अनेक ग्रामीण कारागिरांना शहरी बाजारपेठांमध्ये सहजासहजी प्रवेश मिळत नाही.  सरस मेळा त्यांना आपल्या उत्पादनांच्या सादरीकरणीसाठी महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतोहे व्यासपीठ ग्रामीण कारागीरांना शहरी बाजारपेठेची प्राधान्ये समजून घेण्यास मदत करते तसेच अनुकूल वातावरणही तयार करते.  कारागीर उत्तम किंमत मिळण्यासाठी ग्राहकांशी वाटाघाटी करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑर्डरसाठी संधी शोधू शकतातग्रामीण कारागिरांना उत्पन्न वाढवण्यासाठीस्वतःचा ब्रँड विकसित करण्यासाठी आणि शहरी ग्राहकांमध्ये ओळख मिळवण्यासाठी नाबार्डची या सहयोगातून एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून देते.

प्रदर्शनाचा समारोप येत्या 7 जानेवारी 2024 रोजी होईलतोपर्यंत सर्व दिवस ग्राहकांना सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत स्टॉल्सला भेट देता येतील.

About NABARD: The National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) is an apex development financial institution in India. Established on 12 July 1982, with headquarters in Mumbai, NABARD operates with a mission to promote sustainable and equitable agriculture and rural prosperity through effective credit support, related services, institutional development, and other innovative initiatives. NABARD plays a crucial role in fostering rural development, empowering farmers, and catalysing the growth of the rural economy.ends GNI

Be the first to comment on "नाबार्ड समर्थित महालक्ष्मी सरस 2023-24  मेळ्यास  उत्साहात प्रारंभ ग्रामीण  कारागिरांना बँकेकडून पाठबळ, एमएमआरडीए मैदानावर 7 जानेवारीपर्यंत आयोजन"

Leave a comment

Your email address will not be published.


*