नवी मुंबई, ६ जुलै २०२२ (GNI): आशिया खंडातील अग्रणी अपोलो हॉस्पिटल्सने मोटरस्टेट डायग्नॉस्टिक्सच्या वापरातील अग्रणी कनेक्टेडलाईफ सोबत एक अनोखी भागीदारी केली. अपोलोच्या एआयसीव्हीडी टूलला कनेक्टेडलाईफच्या व्यवस्थापन आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या इतर ऍप्लिकेशन्ससाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल सुविधांसोबत जोडण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. एआयसीव्हीडी टूल कार्डिओवस्क्युलर आजारांच्या धोक्याचे पूर्वानुमान वर्तवू शकते. यामुळे आरोग्य देखभाल सेवा प्रदान करणाऱ्यांना त्यांच्या रुग्णांमध्ये हृदयरोगाच्या धोक्याचे पूर्वानुमान करता येईल आणि त्यांच्या जीवनात वास्तविक बदल घडवून आणण्यासाठी लवकरात लवकर उपचार, उपाय सुरु करता येतील.
भागीदारीची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका ऑनलाईन कार्यक्रमामध्ये क्लिनिकल इंटिग्रेशन प्रदर्शित करण्यात आले. कार्डियाक रिस्क स्कोरिंग टूल डेटा प्रोसेसिंगचा वेग आणि कोणत्याही रुग्णामध्ये कोरोनरी आजार निर्माण होत असल्याचे पूर्वानुमान करण्यातील अचूकता या दोन्ही गोष्टी उत्कृष्ट आहेत. या उपकरणाचा उपयोग करून डॉक्टर्स, ज्या रुग्णांना आजाराचा धोका आहे त्यांची सक्रिय, प्रतिबंधात्मक देखभाल करू शकतात, अशाप्रकारे ते आपल्या रुग्णांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणू शकतात, तसेच भविष्यात उद्भवू शकतील असे धोके कमी करून आरोग्य देखभाल व्यवस्थांवरील ताण देखील कमी करू शकतात.
डॉ. प्रताप सी रेड्डी, अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप म्हणाले,“हृदयरोगांमुळे असंसर्गजन्य आजारांचे ओझे वाढण्याची समस्या आपल्या लोकसंख्येच्या वाढत्या वयासोबत अधिकाधिक तीव्र होत आहे. असंसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंमुळे होणारा सामाजिक-आर्थिक प्रभाव देखील खूप मोठा असतो. आजार लवकरात लवकर लक्षात आल्यास आणि वेळीच उपचार झाल्यास अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात पण रुग्णांमध्ये हृदयरोग उत्पन्न होत आहे हे समजून येऊ शकेल असे उपकरण डॉक्टरांकडे उपलब्ध नाही. कनेक्टेडलाईफसोबत भागीदारीमध्ये आजारांचे पूर्वानुमान करू शकेल असे एआय टूल्स विकसित करण्याचा आमचा अनुभव आणि कौशल्ये व कनेक्टेडलाईफच्या आरोग्य देखभाल सुविधा यांना एकत्र जोडण्यात आले आहे. रुग्णांमध्ये आजारांच्या धोक्याचे पूर्वानुमान वर्तवून त्यांना श्रेणीतील सर्वश्रेष्ठ क्लिनिकल परिणाम प्रदान करणारे एक सर्वसमावेशक उपकरण आरोग्य देखभाल सेवा देणाऱ्यांना उपलब्ध करवून देणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.”
डेरील अर्नोल्ड, संस्थापक – सीईओ, कनेक्टेडलाईफ म्हणाले,“अपोलो हॉस्पिटल्ससोबत करण्यात आलेली ही भागीदारी आम्ही आमचा सन्मान मानतो. भारत आणि जगभरात आरोग्य इकोसिस्टिममध्ये होत असलेल्या डिजिटल परिवर्तनामध्ये अजून जास्त सुधारणा घडवून आणण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सच्या श्रेणीतील सर्वोत्तम क्लिनिकल एआय टूल्सना आमच्या कनेक्टेडलाईफ सुविधांसह एकीकृत केले जाणे ही आमच्यासाठी गर्वाची बाब आहे. कनेक्टेडलाईफ विथ फिटबिट साठी ही एक अतुलनीय संधी आहे, या संधीचा लाभ घेऊन ते वापरण्यास सोप्या स्मार्टफोन आणि वेयरेबल तंत्रज्ञानात नावीन्य आणून, त्याचा उपयोग करून हृदयरोगाच्या धोक्याचे सतत आणि वेगवान पूर्वानुमान वर्तवण्याची क्षमता निर्माण करू शकतात. आमच्या विश्वसनीय, सुरक्षित आणि पुढे वाढवण्याजोग्या व्यावसायिक पायाभूत सुविधा, माहिती मिळवणे आणि तिच्या उपयोगाबाबत काटेकोर जबाबदारीची भावना, गोपनीयता आणि सुरक्षेसह कनेक्टेडलाईफ येत्या महिन्यांमध्ये अपोलोच्या क्लिनिकल एआय टूल्सच्या उपयोगाला अजून जास्त एकीकृत आणि समृद्ध बनवतील, जेणेकरून जगभरातील रुग्णांना आणि आरोग्य देखभाल भागीदारांना त्यांचे लाभ मिळू शकतील.”
कनेक्टेडलाईफ आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे. व्यवस्थापन आणि आरोग्याशी संबंधित इतर ऍप्लिकेशन्ससाठी वेयरेबल सुविधा बनवण्यासाठी या कंपनीने फिटबिटसोबत भागीदारी केली आहे. कनेक्टेडलाईफ प्लॅटफॉर्मवर फिटबिट वेयरेबल डिव्हायसेस आणि रुग्णांकडून मिळणाऱ्या डेटाला कॅप्चर करून त्यांचे विश्लेषण केले जाते, त्याच्या आधारावर लोकांसाठी आणि कनेक्टेड लोकसंख्या आरोग्य हितधारकांसाठी आरोग्य व कल्याण यांच्याशी संबंधित माहिती दिली जाते. संशोधन आणि विकासासाठी अपोलो हॉस्पिटल्स व कनेक्टेडलाईफ यांच्या दरम्यान करण्यात आलेल्या या अभूतपूर्व भागीदारीमध्ये अपोलोचे क्लिनिकल एआय सर्व कनेक्टेडलाईफ विथ फिटबिट ऍप्लिकेशन युजर्ससाठी संपूर्णपणे एकीकृत करून दिवसाचे सर्व तास उपलब्ध करवून देण्यात आले आहे. आरोग्याबाबत जवळपास वास्तविक, सातत्यपूर्ण, दीर्घकालीन माहिती देखील एआयला देऊन ऍप्लिकेशन अधिक जास्त प्रगत व सक्षम बनवले जाईल. श्वासाचा दर, हृदयाची गती, व्यायाम, बसून राहण्याचा वेळ, झोप, पीआरओ अशी माहिती यामध्ये दिली जाईल. त्यामुळे रुग्णाला समोरासमोर न भेटता, घरगुती सेटिंगमध्ये, सतत आणि गतिशील आकलनातून डिजिटल परिवर्तन घडवून आणले जाईल.
स्टीव्ह मोर्ले, संचालक, एपीएसी-फिटबिट हेल्थ सोल्युशन इंटरनॅशनल म्हणाले, “भारतामध्ये डिजिटल आरोग्य इकोसिस्टिमच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सुविधा विकसित करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्ससारख्या धोरणात्मक भागीदारांसह काम करता यावे यासाठी कनेक्टेडलाईफसोबत आमच्या भागीदारीचा विस्तार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हा प्रोग्राम रुग्णांना त्यांच्या आरोग्य सूचकाकांबाबत अधिक चांगली माहिती देतो, त्यामुळे त्यांना आपले हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यात मदत मिळू शकते.”ends GNI SG
Be the first to comment on "रुग्णांसाठी ‘कार्डिओवस्क्युलर रिस्क-कनेक्टेडलाईफ डिजिटल सोल्युशन्स’ प्रोग्राम, रुग्णांना आजारांच्या धोक्याचे पूर्वानुमान व परिणाम प्रदान करणारे एक सर्वसमावेशक उपकरण ‘कनेक्टेडलाईफ आरोग्य तंत्रज्ञान’"