नवी मुंबई, २४ फेब्रुवारी २०२२ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने मेटावर्सशी जोडले जाण्यासाठी ‘८चिली आयएनसी’ सोबत एक अनोखी भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. व्हर्च्युअल रिऍलिटी तंत्रज्ञान, दृश्य, आवाज यांचा, एका वेगळ्या जगात नेणारा अनोखा अनुभव प्रदान करेल जो रुग्णांसोबत बातचीत, त्यांना सल्ला, मार्गदर्शन देणे आणि व्यावहारिक प्रशिक्षणामध्ये कौशल्यांमध्ये नैपुण्य मिळवणे यामध्ये वाढ करतो. शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतर व्हर्च्युअल रिऍलिटीच्या माध्यमातून रुग्णांसोबत बातचीत, सल्लामसलत केल्याने, रुग्णांसाठी एक आरामदायी वातावरण निर्माण होईल, त्यामुळे रुग्णांच्या स्वतःच्या शरीरावरील आणि शारीरिक प्रतिसादावरील नियंत्रणाला प्रेरणा मिळेल.भावनांवर नियंत्रण ठेवण्याच्या रुग्णांच्या क्षमता अधिक वाढतील अशा व्हर्च्युअल रिऍलिटीमार्फत केल्या जाऊ शकतील अशा गोष्टींमध्ये युजर्सना सहभागी करवून घेता येईल. अशाप्रकारे प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत व्यक्तिगत दृष्टिकोन अवलंबिला गेल्याने रुग्णांना मिळणाऱ्या समाधानामध्ये वाढ होण्यात मदत मिळेल.
डॉ. प्रताप सी रेड्डी, चेअरमन, अपोलो हॉस्पिटल्स या सहयोगाबद्दल सांगितले, “अपोलो हॉस्पिटल्समध्ये आम्ही आरोग्यसेवा समुदायाला अधिकाधिक समृद्ध आणि गतिशील बनवण्याचे तसेच आमच्या रुग्णांना मिळणाऱ्या अनुभवांमध्ये वाढ करण्याचे मार्ग सातत्याने शोधत असतो. या दोन्ही गोष्टी ज्याप्रकारे केल्या जातात त्यामध्ये व्हर्च्युअल रिऍलिटीमुळे आमूलाग्र बदल घडून येतील. ८चिली हे व्हीआर क्षेत्रातील दिग्गज आहेत आणि आमच्या देखभाल सेवांमध्ये व्हीआर सुविधांना एकीकृत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”
श्री. अरविंद उपाध्याय, ८चिलीचे संस्थापक-सीईओ यांनी सांगितले, “मेटाव्हर्सच्या सर्व क्षमतांचे लाभ घेणे संघटनांसाठी सहजसोपे बनवेल असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करवून देण्यावरच आम्ही पहिल्यापासून लक्ष केंद्रित केले आहे. हिंटव्हीआर हा एक परिपूर्ण प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या मेटाव्हर्स धोरणांचे व्यवस्थापन करू शकता, हा प्लॅटफॉर्म तुम्हाला ओरिजिनल थ्रीडी कन्टेन्ट बनवण्यात, मेटाव्हर्स कस्टमायजेशन आणि विविध मेटाव्हर्स रिअल इस्टेट्सना हा कन्टेन्ट पोहोचवण्यात मदत करतो. अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपसोबत काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे कारण आता आम्ही या अनोख्या अनुभवाचे लाभ त्यांच्या लाखो रुग्णांना मिळवून देऊ शकू.”
डॉ. संगीता रेड्डी, जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर, अपोलो हॉस्पिटल्स यांनी सांगितले, “सर्वात चांगले शिक्षण प्रत्यक्ष कृतीमधून मिळत असते, आणि म्हणूनच तंत्रज्ञान, दृश्य, आवाज यामार्फत एका वेगळ्या जगात घेऊन जाणाऱ्या व्हीआर प्रशिक्षणासाठी आरोग्यसेवा क्षेत्र हे सर्वोत्तम आहे. आजवरच्या निष्कर्षांनी देखील व्हीआर प्रशिक्षणाची अनुरूपता आणि सर्वोत्कृष्टता यांचे समर्थन केले आहे, कौशल्यांमध्ये नैपुण्य मिळवण्यास लागणारा वेळ आणि आर्थिक बचत याबाबतीत व्हीआर प्रशिक्षण हे पारंपरिक पद्धतींपेक्षा सरस असल्याचे दाखवून दिले आहे. आरोग्यसेवा प्रोफेशनल्सना देखभाल सेवांच्या मानक संचालन प्रक्रियांचे (एसओपी) सक्षम प्रशिक्षण देण्याची गरज सातत्याने वाढत आहे. आमचे असे ठाम मत आहे की, ८चिलीचा प्लॅटफॉर्म व्हीआर इमर्सिव्ह प्रशिक्षण मोठ्या प्रमाणावर आणि अतिशय कार्यक्षम पद्धतीने देण्यात आमची मदत करेल.”ends
Be the first to comment on "‘अपोलो’ ची प्रगतिशील आरोग्य सेवेसाठी ‘८चिली’ सोबत भागीदारी, व्हर्च्युअल रिऍलिटी तंत्रज्ञान, दृश्य, बातचीत, सल्ला, मार्गदर्शन आवाज रुग्णांना मार्गदर्शक"