मुंबई, २७ जानेवारी २०२२ (GNI): : भारतातील एक आघाडीचा ज्वेलरी ब्रँड कल्याण ज्वेलर्सने आपली क्षेत्रीय ब्रँड अम्बॅसॅडर पूजा सावंत हिच्या वाढदिवसानिमित्त तिचा एक व्हिडीओ प्रकाशित केला आहे ज्यामध्ये कल्याण ज्वेलर्सचे दागिने परिधान केलेले पूजा सावंतचे पाच सर्वात शानदार लूक्स पाहायला मिळतात. कंपनीच्या विविध सोशल मीडिया व डिजिटल प्रॉपर्टीजमधून हे फोटो घेतले गेले आहेत. आघाडीची मराठी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या चतुरस्त्र अभिनयासाठी, विविधांगी भूमिकांसाठी नावाजली जाते.२०१६ मध्ये माद्रिद आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्तम अभिनेत्रीसाठी तिला नामांकन देखील मिळाले होते.
अभिनयाच्या बरोबरीनेच उत्तम नृत्यकौशल्ये देखील अंगी असल्यामुळे पूजा सावंतने मोठ्या व छोट्या पडद्यावर देखील लक्षणीय भूमिका रंगवल्या आहेत. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. स्टाईल आणि शान यांची खूप चांगली जाण असल्यामुळे सोशल मीडियावर पूजा सावंतच्या अनेक फोटो व व्हिडीओंना भरपूर लाईक्स व कमेंट्स मिळत असतात. २०१० मध्ये सचित पाटील यांच्या ‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून पदार्पण केलेल्या पूजाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या वाढदिवसानिमित्त कल्याण ज्वेलर्सने तयार केलेल्या व्हिडीओतील पूजा सावंतचे पाच शानदार लूक्स –
१) सोनेरी किनार असलेली मोरपंखी रंगाची बनारसी साडी, त्यावर शानदार हरम हार, सुंदर चोकर सेट आणि त्याला मॅचिंग कानातले परिधान केलेल्या पूजा सावंतच्या या शानदार राजसी लूकमध्ये पिवळ्या सोन्यापासून बनवलेले हेवी कडे आणि अंगठ्या अधिक भर घालत आहेत.२) पूजा सावंतचे पाहताक्षणी मन काबीज करून घेईल असे हास्य आणि सोन्याची साधी पण सुबक चेन, त्यामध्ये हिऱ्याचे हार्ट आकाराचे पेंडंट यांचा सुरेख मिलाप असलेली ही छबी कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयात कायमचे घर करेल हे नक्की.३) गुलाबी रंगाची रेशमी साडी, त्यावर सुंदरसा चोकर, हिरव्या व गुलाबी रंगांच्या मौल्यवान खड्यांनी सजलेला, देवी लक्ष्मीची प्रतिमा विराजमान असलेला खास कारीगरांनी हातांनी घडवलेला नाजूक डिझाईनचा लांब हार व हातातील कडे हे कल्याण ज्वेलर्सच्या वेडिंग कलेक्शनमधील खास दागिने परिधान केलेली पूजा सावंत मूर्तिमंत सौंदर्याची खाण भासत आहे.४) दगडी चाळ या चित्रपटातील अदाकारीने जिने अवघ्या प्रेक्षकवर्गाची मने जिंकली अशी चतुरस्त्र अभिनेत्री पूजा सावंत या फोटोमध्ये बॉटल्ड ग्रीन रंगाच्या लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसते आहे. त्यावर तिने अतिशय उठावदार टेम्पल ज्वेलरी सेट घातलेला आहे. या सेटमध्ये मौल्यवान खडे जडवण्यात आले आहेत त्यासोबत अस्सल डिझाईनचा कमरबंध आहे, याच्या डिझाईन मधील अतिशय नाजूक कलाकुसर डोळे खिळवून ठेवणारी आहे. अभिजात शैली व शान दर्शवणारा हा अनोखा दागिना रचना आणि सौंदर्य या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट आहे. नेकपीसला साजेसे लटकते कानातले, अंगठी व एका हातात बांगड्या तर हातात कडे अशा एकापेक्षा एक सरस ऍक्सेसरीजनी पूजा सावंतचे सौंदर्य बहारदार दिसत आहे.५) कल्याण ज्वेलर्सची क्षेत्रीय ब्रँड अम्बॅसॅडर पूजा सावंतने याठिकाणी अस्सल महाराष्ट्रीयन लूक परिधान केला आहे. पेशवाई नथ, गुलाबी फुलांची नक्षी असलेला सुबक चोकर, त्यापुढे छोट्या सोन्याच्या मण्यांनी सजलेला लेयर्ड नेकपीस व हिंदू परंपरेनुसार काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र असा हा अस्सल पारंपरिक साज पूजा सावंतला खूप खुलून दिसत आहे. हातातला हिरवा चुडा त्यासोबत पिवळ्या सोन्याचे कडे घालून पूजा सावंतने आपला महाराष्ट्रीयन लूक परिपूर्ण केला आहे.
Be the first to comment on "लग्नासाठी दागिने बनवताना ‘पूजा सावंत’ च्या लूक्सवरून घ्या प्रेरणा, वाढदिवसानिमित्त पूजा सावंतचे पाच खास लूक्सचे व्हिडीओ ‘कल्याण ज्वेलर्स’ ने तयार केले"