Indegene Limited raises ₹ 548.77 crore from 36 anchor investors at the upper price band of ₹452 per equity share - Indegene Limited raises ₹548.77 crore from 36 anchor investors at the upper price band of ₹452 per equity share - CtrlS Noida Datacenter Turns to Solar for 60% of its Power Requirement, Aims to reduce 94,640 tonnes of CO2 emissions through this move - TBO TEK LIMITED ANNOUNCED IT'S INITIAL PUBLIC OFFERING (IPO) TO OPENS ON 08th May, 2024 Sets Price Band fixed at ₹ 875 to ₹ 920 per equity share of face value of ₹ 1 each - Afternoon Voice Hosts 16th Newsmakers Achievers Award 2024, Recognising Outstanding Contributions Across Various Fields - AADHAR HOUSING FINANCE LIMITED ANNOUNCED ITS INITIAL PUBLIC OFFERING (IPO) OF EQUITY SHARES OPENS ON MAY 8, 2024 Sets Price Band fixed at ₹ 300 to ₹ 315 per equity share of face value of ₹ 10 each - Sankalp Art Fest Presents An Art Exhibition will be held @ Namah Royal Banquet Hall at Borivali (W) in Mumbai - Collaborates with the Akshaya Patra Foundation for Sustainable Growth in India - Kokilaben Hospital launches Arthrex Modular Glenoid System with VIP for Enhanced Shoulder Replacement for the First Time in India - उत्तर मुंबई मतदार संघातील पीयूष गोयल यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जल्लोषात समर्थन देत भाजप - महायुती कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

हाड गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स, कू वरील व्हिडीओचा नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ

प्रतिनिधी: मुंबई, १९ डिसेंबर, २०२१ (GNI): सध्याचा मोस्ट फेव्हरिट, आणि आणि लाखाे तरूणींच्या हृदयाची धडकन असलेला अभिनेता टायगर श्राॅफ याची हाडे गोठवणाऱ्या थंडीतील नृत्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालीत आहे. टायगरसह सर्व स्टार्स तसेच नेटकऱ्यांमध्ये वेगाने लोकप्रिय झालेल्या “कू’ या स्वदेशी संदेश प्रसारण उपकरणावर टाकलेला हा व्हिडीओ झपाट्याने लोकप्रिय झाला असून “कू’वरील ही छायाचित्रे आतापर्यत लाखो प्रेक्षकांनी पाहिली व अनेकांना पाठवली आहे.

फिल्म इंडस्ट्रीत फिटनेसच्या बाबतीत अतिशय पॅशन असलेल्या जाॅन अब्राहम, विद्युत जामवाल, सोनु सुद, अक्षय कुमार या मोजक्या स्टार्समध्ये टायगर श्रॅाफचेही नाव घेतले जाते. पीळदार शरीरयष्टी, रूबाबदार व देखणे व्यक्तिमत्व असलेला टायगर श्रॉफ म्हणजे युवा पिढीचा हाॅटकेक अॅक्टर आहे. आपल्या भूमिकेसाठी कुठलीही कसुर न सोडणाऱ्या नव्या पिढीच्या कलावंतांमध्ये तो टाॅपवर आहे. आणि तेवढीचटाॅपवर आहे. “लोकांशी आपल्या भाषेत जुळा’ असी टॅगलाईन असलेली “कु’ हे माध्यम झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

“कु’वर प्रसारित ध्वनीचित्रफितीत टायगर कडाक्याच्या थंडीत शर्टलेस उभा आहे. “गणपत’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे हे फोटो आहेत. युकेमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीत टायगर चक्क शर्ट न घालता उभा आहे.  “कु’वर त्याने पोस्ट केलेल्या या छायाचित्रांनी अनेकांना वेड लावले आहे. या छायाचित्रात बर्फही पडताना दिसत आहे. अशावेळी शर्ट न घालता फोटो काढणे हे धाडसाचेच काम आहे. टायगरसोबत जॅकी भगनानीही दिसत आहे. फोटोला कॅप्शन देताना टायगरने जॅकीला “बॉसमॅन’ म्हणले आहे. टायगर आणि जॅकीची मैत्री जुनीच आहे. टायगर ६ नोव्हेंबरपासून युकेमध्ये “गणपत’चे शूटिंग करण्यात गुंतला आहे. या सिनेमात टायगर कृती सेननसोबत दिसणार आहे. २०१४ मध्ये आलेल्या “हीरोपंती’ सिनेमातून या जोडीने आपला बॉलीवूड डेब्यु केला होता. Check this post from @iTIGERSHROFF on Koo App:
“The first song i ever learned how to dance to! One of my fav…”
https://www.kooapp.com/koo/iTIGERSHROFF/8a9ec0b7-eb5a-42dd-b10d-11846fc3bb49

Be the first to comment on "हाड गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स, कू वरील व्हिडीओचा नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ"

Leave a comment

Your email address will not be published.


*