Rays Power Infra announced closure of INR 127 Crore Equity Capital Fund Raise - Rentomojo Limited Announced it's Initial Public Offer (IPO) to open on Wednesday, September 09, 2026 Price Band has been fixed at ₹ 384 to ₹ 404 per Equity Share - Manipal Payment and Identity Solutions Limited Announced its Initial Public Offering (IPO) to Open on Wednesday, September 9, 2026 Price Band fixed at ₹322 to ₹339 per equity share of face value of ₹10 each - LCC Projects fixes IPO price band at Rs 139-146 per share; issue opens on Sep 9 - KARAMTARA ENGINEERING LIMITED ANNOUNCED ITS INITIAL PUBLIC OFFERING (IPO) OF EQUITY SHARES TO OPEN ON WEDNESDAY 09 SEPTEMBER 2026 Price Band fixed at ₹241 to ₹254 per equity share of face value of ₹10 each - LCC Projects Limited announces the price band for its IPO - Ola Electric's First Dealer Stores are Now Open across India - Prasol Chemicals Limited Announced its initial Public Offering (IPO) to Open on September 8 at Price Band of ₹643–₹676 - Asset Reconstruction Company (India) Limited Announced it's Initial Public Offering (IPO) to open on Wednesday, September 09, 2026 The Price Band of the Offer has been fixed from ₹ 132 per Equity Share of face value ₹ 10 each to ₹139per Equity Share of face value of ₹ 10 each - Veegaland Developers Limited’s IPO to Open on Thursday, September 10, 2026 Price Band fixed at ₹130 to ₹140 per equity share of face value of ₹10 each - Veegaland Developers Limited’s IPO to Open on Thursday, September 10, 2026 At the Price Band fixed at ₹130 to ₹140 per equity share of face value of ₹10 each

सॉल्व्ह.केयरने (Solve.Care) सुरु केले जगातील पहिले क्रॉस-बॉर्डर ब्लॉकचेन टेलिमेडिसिन नेटवर्क

–        ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे रुग्ण व डॉक्टरांची माहिती संपूर्णपणे सुरक्षित राहते.

–        डॉक्टर्स व रुग्णांना अभूतपूर्व जागतिक पोहोचसुविधा व पारदर्शकता हे लाभ अनुभवता येतात.

–        जीटीएचईसाठी हेल्थलिंक टेक्नॉलॉजीज हे भारतीय वितरक असणार आहेत.

राष्ट्रीय१४ सप्टेंबर२०२१ (GNI): जागतिक पातळीवरील आरोग्यसेवा क्षेत्रातील ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म कंपनी सॉल्व्ह.केयरने भारतात आपले ग्लोबल टेलीहेल्थ एक्स्चेंज (जीटीएचई) नेटवर्क सुरु करत असल्याची घोषणा आज केली. जीटीएचई हे एक खुलेसीमारहित व रुग्ण-डॉक्टर यांच्यादरम्यान टेलिकन्सल्टेशन चटकन घडवून आणणारे आरोग्यसेवा नेटवर्क असून ते सॉल्व्ह.केयर प्लॅटफॉर्मवर चालते. भारतात जीटीएचईचे अधिकृत वितरक हेल्थलिंक टेक्नॉलॉजीज आहेत. आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्रातील या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे.

जीटीएचई हे रुग्णांसाठी जगभरातील फिजिशियन्सची जागतिक डिरेक्टरी म्हणून कार्यरत असूनत्याठिकाणची काटेकोर पडताळणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर डॉक्टर्स याठिकाणी आपले स्वतःचे दरओळखपत्रउपलब्धता अशी सर्व माहिती प्रकाशित करू शकतात आणि जगभरातील कुठल्याही भागात असलेल्या (ज्या ठिकाणी कायदेशीर परवानगी आहे त्या ठिकाणी) रुग्णांकडून अपॉईंटमेंट्स स्वीकारणे सुरु करू शकतात.  जीटीएचईच्या विकेंद्रीकृत तांत्रिक संरचनेमुळे सर्व संवेदनशील माहिती विकेंद्रीकृत नोड्समध्ये अतुलनीय सुरक्षितपणे जमा करून ठेवली जाते.  जीटीएचई क्रांतिकारी आहे कारण यामध्ये रुग्णांच्या वैद्यकीय नोंदी व माहिती यांची मालकी आणि त्यावरील नियंत्रण हे सर्व त्या-त्या रुग्णांकडे असते.  यामुळे रुग्णांना आपल्या आधीच्या वैद्यकीय नोंदी सहजपणे पाहता येतात व वैद्यकीय व्यावसायिकांसोबत शेअर करता येतील.  हे सर्व अतिशय सुरक्षित व्यवस्थेमध्ये केले जात असल्याने रुग्णांना त्यांच्या माहितीच्या गोपनीयतेविषयी किंवा तिच्यामध्ये काही फेरफार होतील अशी काहीही चिंता करावी लागत नाही.  यामुळे दरवेळी नव्या डॉक्टरकडे गेल्यानंतर कराव्या लागणाऱ्या अनावश्यक व पुन्हा-पुन्हा वैद्यकीय तपासण्यांमुळे खर्च होणारा वेळ व पैसे यांची बचत होईल. अशाप्रकारे आरोग्यसेवांचा जास्त सक्षमपणे लाभ घेता येईल. 

जीटीएचईवर साईन अप करणाऱ्या डॉक्टरांना एक ग्लोबल टेलीहेल्थ आयडी दिला जातो जो त्यांच्या व्यावसायिक माहितीसोबत नेटवर्कवर प्रकाशित केला जातोज्यामुळे जगभरातील रुग्णांना आपल्याला हवे ते डॉक्टर्स शोधणे आणि त्यांच्याकडे आपली अपॉइंटमेंट बुक करणे सहज शक्य होते.  यामुळे कोणत्याही मध्यस्थाशिवाय डॉक्टर आणि रुग्ण यांचा थेट संपर्कअतिशय सुविधाजनक आणि सुरक्षित पद्धतीने होऊ शकतो.  जीटीएचईवर डॉक्टरांना संपूर्ण मुभा असते आणि त्यांना त्यांच्या मेडिकल प्रॅक्टिसवर संपूर्ण नियंत्रण ठेवता येते.  स्वतःचे कन्सल्टेशन चार्जेसकन्सलटेशन्सचा अवधी आणि उपलब्धता हे सर्व डॉक्टर्स स्वतः ठरवू आणि निश्चित करू शकतात.  यामुळे त्यांना स्वतःला जेव्हा आणि जितके हवे तितके ते काम करू शकतात.  याशिवाय जीटीएचईच्या स्वयंचलित वैशिष्ट्यांमुळे पारंपरिक पद्धतीच्या प्रॅक्टिसमधील डॉक्टरांची प्रशासकीय कामे आपोआप पार पाडली जातात.  जीटीएचईमध्ये इतरही अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे ज्यामुळे डॉक्टरांना रुग्णांना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पुरवता येतात आणि त्या सतत सुरु ठेवता येतात ज्यामुळे रुग्णांना त्यांच्या आरोग्यामध्ये अधिक चांगले परिणाम आढळून येतात.

जीटीएचई संपूर्ण जगभरात वेगाने विस्तार करत आहे. भारतातील रुग्णांव्यतिरिक्त बांग्लादेशबहारीनब्राझीलकेनियाकुवैतनेपाळनायजेरियाओमानपाकिस्तानसौदी अरेबियाश्रीलंका आणि युएईमधील रुग्ण देखील वैद्यकीय सल्ला मिळवण्यासाठी जीटीएचईमार्फत भारतीय नोंदणीकृत डॉक्टर्सशी संपर्क करू शकतात.

केयर.वॉलेट ऍपमार्फत देखील रुग्ण जीटीएचईचा लाभ घेऊ शकतात.  हे सॉल्व्ह.केयरचे व्यक्तिगत आरोग्यसेवा सहकारी ऍप्लिकेशन असून गूगल प्ले स्टोर आणि ऍपल स्टोर वरून ते डाउनलोड करता येईल.  यामध्ये रुग्णांना अधिक जास्त जास्त सक्षमता आणि निवडीला अधिक जास्त वाव मिळतो कारण भौगोलिक सीमा आड न येता ते कोणत्याही डॉक्टर किंवा विशेषज्ञांसोबत संपर्क साधू शकतात.  रुग्णांची सर्व माहिती स्वतः रुग्णांच्या मालकीची असते आणि त्यावर संपूर्ण नियंत्रण देखील रुग्णांचेच असतेत्यामुळे त्यांना आपल्या तब्येतीवर नीट लक्ष ठेवता येते तसेच ब्लॉकचेनचा वापर करून आपले वैद्यकीय अहवाल डॉक्टरांसोबत अगदी सुरक्षितपणे शेअर करता येतात.  याठिकाणी रुग्ण आपल्या प्रियजनांची केयर सर्कल्स तयार करू शकतातजेणेकरून रुग्णांचे मित्र व कुटुंबीय त्यांच्या आरोग्यसेवा वाटचालीत त्यांची सक्रिय साथ देऊ शकतात.  बिलांचा भरणा सॉल्व्ह.केयरचे स्वतःचे चलन सॉल्व्ह टोकनयुएस डॉलर्स किंवा भारतीय रुपये वापरून थेट केयर.वॉलेट ऍपमध्येच करता येतो. 

सॉल्व्ह.केयरचे सीईओ श्री. प्रदीप गोयल यांनी सांगितलेआरोग्यसेवेसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याने भारतात आरोग्यसेवा क्षेत्रात नवी क्रांती घडून येण्यासाठी नवी संधी निर्माण झाली आहे.  आजच्या काळात देखील जर तुम्हाला एखाद्या स्पेशालिस्टची अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर साधारण महिन्याभरापेक्षा जास्त काळ थांबावे लागतेच.  पण ग्लोबल टेलीहेल्थ एक्स्चेंजसोबत आता रुग्ण जगभरातील कुठल्याही ठिकाणच्या डॉक्टर किंवा स्पेशालिस्टसोबत जवळपास पटकन कन्सल्टेशन करू शकतो.  आरोग्यसेवा उपलब्ध करवून घेण्यात येणारे अडसर दूर करून जीटीएचई आजवर ज्यांना पुरेशा आरोग्यसेवा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत अशा अनेक लोकांना सेवा पुरवण्यात डॉक्टर सक्षम होतील आणि त्यांचे स्वतःचे उत्पन्न देखील वाढेल.” 

हेल्थलिंक टेक्नॉलॉजीजचे संचालक डॉ. बी एस रत्ता यांनी सांगितले, “ग्लोबल टेलीहेल्थ एक्स्चेंजचे पदार्पण हा भारतातील टेलिमेडिसिन क्षेत्रातील मोठा टप्पा ठरेल.  अनेक वैशिष्ट्यांसह खुले नेटवर्क या नात्याने ग्लोबल टेलीहेल्थ एक्स्चेंज डॉक्टरांना अधिक कार्यक्षम मेडिकल प्रॅक्टिशनर बनण्यात मदत करतेइतकेच नव्हे तररुग्णांसाठी देखील हे खूप प्रभावी ठरते.  अनेक भारतीय परदेशांमध्ये काम करत आहेतआणि मला खात्री आहे की त्यांना जर स्वतःच्या  देशातील डॉक्टरसोबत टेलिकन्सल्टेशन करण्याची संधी मिळाली तर ते त्यांच्यासाठी अधिक चांगले ठरेल.  मला पूर्ण विश्वास आहे की जीटीएचईमुळे त्यांच्या मेडिकल प्रॅक्टिसला जे मूल्य मिळू शकेल ते भारतातील डॉक्टर्स नक्की ओळखतील.”

सॉल्व्ह टोकनमार्फत जीटीएचई डॉक्टरांना तातडीने पेमेंट्स देते.  डॉक्टरांनी निश्चित केलेल्या दराच्या विशिष्ट टक्के रक्कम सर्व्हिस चार्ज म्हणून घेऊन जीटीएचई आपले उत्पन्न मिळवते.

सॉल्व्ह टोकन हे आरोग्यसेवा क्षेत्रातील जागतिक डिजिटल चलन असून ते मुळात सॉल्व्ह.केयरचे आहे.  विविध ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सवर हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून थेट केयर.वॉलेटमध्ये देखील वापरता येते.  विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये आणि जागतिक समुदायांमध्ये सहजपणे वापरता येईल अशी पेमेंट सुविधा सॉल्व्हने उपलब्ध करवून दिल्याने फोरेक्समधील चढउतार आणि बँक शुल्क यांची चिंता करण्याचे काही कारण उरत नाही. यामुळे बिलाच्या रकमेचा भरणा वेगवान आणि सुरक्षित पद्धतीने करता येतो.  यामुळे सॉल्व्हमधील सर्व व्यवहार अचूकपणे आणि पारदर्शक पद्धतीने करता येताततसेच त्यांच्या नोंदी पुन्हा पाहता येतातयामुळे फसव्या दाव्यांचा धोका उरत नाही.  सॉल्व्ह टोकनचे मूल्य हे व्यवहार करतेवेळी निश्चित करण्यात आलेल्या मुल्यासोबत सुनिश्चित करण्यात आलेले असते व बाजार किमतीनुसार त्यामध्ये चढउतार होत नाहीत.

आपली प्रॅक्टिस वाढावी आणि त्यामध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडून यावे अशी इच्छा असलेले डॉक्टर्स पुढील लिंकवर संपर्क साधून जीटीएचईवर साइन अप करू शकतात  – https://gthe.solve.care/features/main/providerregnew   

Be the first to comment on "सॉल्व्ह.केयरने (Solve.Care) सुरु केले जगातील पहिले क्रॉस-बॉर्डर ब्लॉकचेन टेलिमेडिसिन नेटवर्क"

Leave a comment

Your email address will not be published.


*