मुंबई, १७ फेब्रुवारी २०२१ (GNI): आशिया खंडात एकात्मिक आरोग्यसेवा देणारा ‘अपोलो हॉस्पिटल्स समूह’ आणि डिझाईन, थ्रीडी प्रिंटिंग, रॅपिड प्रोटोटाइपिंग व बायोप्रिंटिंग ही तंत्रज्ञाने आणि रुग्णकेंद्रीत सोल्युशन्स आरोग्यसेवा उद्योगाला पुरविणारी भारतातील आघाडीची कंपनी ‘अॅनाटॉमीझ3डी मेडटेक प्रा. लि.’, यांनी गुंतागुंतीच्या इम्प्लॅंट्स (रोपण) प्रक्रियांचे डिझाईन व मुद्रण यांसाठी भागीदारी करीत असल्याची घोषणा आज केली. ‘थ्रीडी-प्रिंटेड इम्प्लॅंट्स’साठी भारतात हॉस्पिटल ‘थ्रीडी-प्रिंटिंग लॅब’ स्थापन करण्याच्या संदर्भात ‘अपोलो हॉस्पिटल्स’ व ‘अॅनाटॉमीझ3डी’ या दोन्ही संस्था पुढाकार घेणार आहेत. ‘इम्प्लॅंट्स’च्या गुंतागुंतीच्या केसेसमध्ये डॉक्टरांना ‘इम्प्लॅंट्स’ची दृश्यमानता कळावी व त्या प्रक्रियेचे मुद्रण करता यावे, हा यामागील उद्देश आहे. यातील पहिली लॅबोरेटरी हैदराबादमधील ज्युबिली हिल्स येथे असलेल्या ‘अपोलो हेल्थ सिटी’ येथे उभारण्यात येणार आहे.
अपोलो हॉस्पिटल्स समुहाचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी म्हणाले, “आमच्या रूग्णांना फायदा व्हावा म्हणून अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान आणण्यात आम्ही पुन्हा अग्रेसर ठरत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. हॉस्पिटल ‘थ्रीडी-प्रिंटिंग लॅब’च्या माध्यमातून आरोग्यसेवा क्षेत्राचे भवितव्य घडणार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आरोग्यसेवेचे वैयक्तिकरण करणे हा एक नवीन मंत्र आहे. जनुकशास्त्रातील (जीनॉमिक्स) नवीन प्रगती व अचूक औषधयोजना यांच्या आधारे वैयक्तिकृत प्रतिबंध आणि उपचार करण्याचा सध्याचा काळ आहे. टार्गेटेड थेरपीसाठी विशेष औषधांपासून ते सानुकूलित रोपण आणि कृत्रिम औषधांपर्यंत, सर्व क्षेत्रांत थ्रीडी-प्रिंटिंग तंत्रज्ञान आल्यामुळे वैद्यकीय वातावरणात बदल घडून येत आहे. वैद्यकीय सेवेला पुढील स्तरावर नेण्यासाठी वेगवान, अचूक आणि परवडणारे असे हे सोल्युशन आहे. आरोग्यसेवा क्षेत्र विकसीत होत असताना, या भविष्यकालीन परिवर्तनाचा भाग म्हणून ‘थ्रीडी-प्रिंटिंग’ मोलाची भूमिका बजावेल.”
चांगल्या आरोग्यसेवेसाठी ‘मेडिकल थ्रीडी-प्रिंटिंग’ सेवा पुरविण्याचे काम हॉस्पिटल ‘थ्रीडी-प्रिंटिंग लॅब्स’ करतील. शस्त्रक्रियेपूर्वीचे नियोजन व शिक्षण, रुग्णावर विशिष्ट कटिंग व ड्रिलिंग करण्यासंबंधीचे मार्गदर्शन आणि सानुकूलित रोपण व इम्प्लॅंट मोल्ड्स यांकरीता अॅनाटॉमिकल मॉडेल्सची निर्मिती अशा अनेक गोष्टी यामध्ये करण्यात येतात.
‘थ्रीडी-प्रिंटिंग’ तंत्रज्ञानामधील प्रगतीमुळे आज कस्टमाईज्ड, हलकी, मजबूत, सुरक्षित आणि अतिकार्यक्षम उत्पादने कमी वेळेत व कमी खर्चात तयार करता येतात. यामुळे डॉक्टरांना आपल्या रूग्णांविषयी सखोल ज्ञान मिळते. उदा. पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये ‘थ्रीडी-प्रिंटिंग’ मुळे वैयक्तिकृत औषधाचे मूल्य वाढेल, शस्त्रक्रियापूर्व नियोजन करता येऊन शस्त्रक्रियेचा वेळ कमी होईल आणि रुग्णाला असलेला धोका कमी होण्यास मदत होईल. ‘थ्रीडी-प्रिंटिंग’मुळे रुग्णाच्या आजाराचे स्वरूप चांगल्या प्रकारे समजून घेता येत असल्याने, नवीन पिढीतील सर्जन्सना आपली कौशल्ये सुधारण्यास वाव मिळेल. ही केवळ एक सुरुवात आहे. तंत्रज्ञानाचा विकास जसजसा होत राहील, तसतशी ‘थ्रीडी-प्रिंटिंग’ची आरोग्य सेवेतील पूर्ण क्षमता आपण पाहू शकू.”
‘अॅनाटॉमीझ 3डी’ च्या सहसंस्थापक व सीटीओ फिरोजा कोठारी म्हणाल्या, “आरोग्य सेवेचे वैयक्तिकरण करण्यामध्ये ‘थ्रीडी-प्रिंटिंग’च्या उपयुक्ततेवर ‘अॅनाटॉमीझ3डी’ने 2015 पासूनच विश्वास ठेवला होता. या आपल्या दृष्टिकोनाचे प्रत्यक्षात रुपांतर घडवून आणण्यासाठी ‘अॅनाटॉमीझ3डी’ने काही मार्ग निवडले व प्रयत्न केले. अपोलो हॉस्पिटल्स ही एक प्रगतीशील संस्था असून रुग्णांना फायदा व्हावा म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा लवकर अवलंब करण्यात ती अग्रेसर असते. या संस्थेशी सामरिक भागीदारी केल्याने आमचे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जाण्याच्या दिशेने जोमाने पाऊल पडले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये, आम्हाला ‘अपोलो हॉस्पिटल’शी संबंधित अनेक क्लिनिशियनबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या सुविधांमध्ये आमचे तंत्रज्ञान थेटपणे आणणे, त्यांना ते नेहमीसाठी वापरता येणे व संशोधन व विकासात्मक कामांमध्ये त्याचा उपयोग होणे, ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. रुग्णांना सानुकुलित वैद्यकीय उपकरणे सहज उपलब्ध करून त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता वाढविणे हे ‘अपोलो हॉस्पिटल्स’ व ‘अॅनाटॉमीझ3डी’ यांचे एकत्रित उद्दिष्ट आहे.”
‘अॅनाटॉमीझ 3डी’ जे तंत्रज्ञान वापरते, ते एक हजाराहून अधिक केसेसमध्ये सिद्ध झाले आहे. बायोमेडिकल इंजिनियर्स, मेकॅनिकल इंजिनिअर्स, एएम इंजिनियर्स, थ्रीडी डिझाइनर्स यांचा समावेश असलेली मल्टी-डिसिप्लिनरी टीम अपोलो हॉस्पिटलच्या मेडिकल आणि सर्जिकल तज्ज्ञांसह ‘हॉस्पिटल थ्रीडी-प्रिंटिंग लॅब’मध्ये काम करील. या प्रयोगशाळेतून रुग्णाच्या शरीररचनेची जीवन-आकार प्रतिकृती असलेली शरीरशास्त्रविषयक मॉडेल्स मिळू शकतील. रुग्णांच्या सीटी / एमआरआय स्कॅनच्या आधारे ती मॉडेल्स अचूकपणे ‘थ्रीडी मॉडेल्स’मध्ये बनविण्यात आलेली असतील. एकापेक्षा जास्त प्रकारची सामग्री, रंग, ओपॅसिटी आणि काठिण्य यांच्या सहाय्याने ही मॉडेल्स बनवून, त्यातून शस्त्रक्रियापूर्व नियोजन व रुग्णाशी संवाद यांकरीता थ्रीडी दृश्यात्मकता उभी करता येते. रुग्णाच्या शरीरात ज्या अवयवांमध्ये बिघाड झालेला असेल, त्या दोषक्षेत्राशी परिपूर्णपणे जुळण्यासाठी डिझाइन केलेले इम्प्लॅंट्स आणि मोल्ड्स तयार करून, अगदी आदर्श व कार्यात्मक असे हे मॉडेल उभे केलेले असते. बायोकम्पॅटिबल सामग्रीमध्ये हे थ्रीडी मॉडेल मुद्रित झालेले असते. रुग्णाच्या हाडांच्या पूर्वनिर्धारित भागावर फिट बसू शकतील, अशी सर्जिकल गाईड व साधने या लॅबमधून मिळू शकतील, तसेच पूर्वनियोजित दिशेने सर्जिकल सॉ किंवा ड्रिल कसे न्यावयाचे याचे मार्गदर्शनही मिळेल. यातून शस्त्रक्रिया यशस्वी होईल, याची खात्री करून घेता येते.ends
Be the first to comment on "अपोलोची ‘अॅनाटॉमीझ 3डी मेडटेक’ शी भागीदारी जटिल स्वरुपाच्या रोपण प्रक्रियेची दृश्यमानता निर्माण करणे व मुद्रण करणे डॉक्टरांना शक्य"