नवी मुंबई, ४ फेब्रुवारी २०२१ (GNI):- जागतिक कर्करोगदिनीअपोलो प्रोटॉन कर्करोग केंद्राने कर्करोगाविषयी जागरूकता करण्यासाठी ‘द हँड प्रिंट मोहीम’ आयोजित केली होती. कर्करोगापासून बचावलेले रुग्ण, डॉक्टर, परिचारिका आणि काळजीवाहू यांनी कर्करोग आणि ‘कोविड-19’ या दोन्ही आजारांवर एकत्र विजय मिळविण्याबद्दल एकमेकांचे समर्थन करीत, कृतज्ञता दर्शवित, आपापल्या तळहातांचे ठसे भिंतीवर उमटवले. भारतात दरवर्षी कर्करोगाचे १५ लाख नवीन रुग्ण नोंदवले जातात आणि कर्करोगामुळे अंदाजे ७ लाख ८० हजार जणांचा मृत्यू होतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांनंतर कर्करोग हे मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख कारण आहे. कर्करोगाबद्दल जागरूकता व प्रचार यांद्वारे दरवर्षी लाखो प्रतिबंधात्मक मृत्यू वाचविणे हे अपोलो मधील जागरूकता कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
डॉ. अनिल डीक्रूझ, अपोलो कर्करोग केंद्र, ऑन्कॉलॉजी सर्व्हिसेस विभाग संचालक, डोके -मान कर्करोग शल्यचिकीत्सक आणि ‘युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल’ या संघटनेचे अध्यक्ष म्हणाले, “बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाविषयी वाढती चिंता आणि सामाजातील जागरूकतेचा अभाव, याकडे शक्य तितक्या लवकर लक्ष देणे आवश्यक आहे. भारतात कर्करोगाच्या घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी, लवकर निदान, तपासणी आणि जीवनशैलीत बदल यांविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. हे जागरूकतेचे कार्यक्रम आणि त्याबाबत घेतलेले पुढाकार यांमुळे, लोकांना वाईट सवयी सोडून देऊन चांगल्या जीवनशैलीच्या अनुसरणाची आवश्यकता समजण्यास मदत होईल आणि कर्करोगास अंकुश लावता येईल.”
श्री संतोष मराठे, सीओओ- युनिट हेड, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई या प्रसंगी म्हणाले, “कोविड साथीच्या व टाळेबंदीच्या काळात, अपोलो कर्करोग केंद्रांमध्ये, आंतरराष्ट्रीय साथ नियंत्रणाच्या निकषांनुसार, रुग्णांवर यशस्वीपणे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत, आम्ही पाठपुरावा करणार्या रूग्णांना व्हिडिओद्वारे उपचारांचे सल्ले देण्याचेही काम केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त ऑन्कोलॉजिस्टनी या आव्हानात्मक काळात रूग्णांना मदत व सेवा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. जीवनमान वाढत चाललेल्या लोकसंख्येमध्ये, कर्करोगाबद्दल जागरूकता नसणे आणि स्वतःचे निदान करण्यासाठी आवश्यक ज्ञान नसणे, ही सध्याची मोठी आव्हाने आहेत. अचूक औषधाच्या तंत्रांद्वारे विशिष्ट अवयवांवर उपचार करण्यासाठी आम्ही आमच्या रोबोटिक तंत्रज्ञानात श्रेणीसुधारणा करीत आहोत. म्हणूनच, ‘जागतिक कर्करोग दिन’ साजरा करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कर्करोगाचे लवकरात लवकर निदान होण्यापासून त्याच्या प्रतिबंधापर्यंत, अनेक बारीकसारीक बाबतींबद्दल जागरूकता पसरविणे, हा यामागील उद्देश आहे.”
अपोलो कर्करोग उपचार केंद्रांमध्ये कर्करोगावर ‘मल्टि-डिसिप्लीनपरी’ मेडिकल, सर्जिकल आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी इष्टतम उपचारांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी येथे ‘नॅशनल ट्यूमर बोर्ड’ ही अस्तित्वात आहे. Ends
Be the first to comment on "कर्करोग विरोधातील लढ्यासाठी अपोलोची ‘द हँड प्रिंट मोहीम’ अपोलो कर्करोग केंद्र नवी मुंबई येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रम आयोजित"