Rays Power Infra announced closure of INR 127 Crore Equity Capital Fund Raise - Orient Cables (India) Limited Announced its ₹5,520.00 million Initial Public Offering (IPO) to open on September 25, 2026 Price Band fixed at ₹258 to ₹272 per equity share of face value of ₹1 each - AceVector Limited Announced it's Initial Public Offer (IPO) of Equity Shares to open on September 25, 2026, Price Band is fixed at ₹ 30 to ₹ 32 per equity share of face value of ₹ 1 each - Moneyview Limited announced its Initial public offering (IPO) to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ₹1 each to ₹34 per equity share of the face value of ₹1 each - Moneyview Limited announced it's Initial public offering (IPO) to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ₹1 each to ₹34 per equity share of the face value of ₹1 each - BVG India awarded contract of Chambal Riverfront to Develop a Destination for Sustainable Urban Living and Tourism - L’Oréal Paris to Host Le Défilé at The Eiffel tower, Celebrating Sisterhood, Diversity and Inclusion - Elevate Campuses Limited Announced its ₹2100 crore Initial Public Offering (IPO) to open on Wednesday, September 23, 2026 Price Band fixed at ₹343 to ₹362 per shareBid/Issue Opening Date – Wednesday, September 23, 2026 and Bid/Issue Closing Date – Friday, September 25, 2026 - VARMORA GRANITO LIMITED IPO TO OPEN ON TUESDAY, SEPTEMBER 22, 2026Price Band fixed at ₹140 to ₹148 per equity share of face value of ₹2 each - "Breath of Hope”: Mumbai Doctors Help Paralysed Man Breathe Independently After Six Months on a Ventilator - Anil Rawat: Beyond the Digital Surface

नवी मुंबई अपोलो तर्फे कोरोना लसीकरण सुरु अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षे व त्यापुढील वयोगटासाठी लसीकरण केले जाईल

नवी मुंबई, १२ मे २०२१ (GNI): अपोलो हॉस्पिटल्सने कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पुढाकार घेत थेट लस उत्पादकांकडून लशी मिळवण्याची व्यवस्था केली आहे.  यामध्ये सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.  अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने आज जाहीर केले आहे की त्यांनी ३ मे २०२१ पासून १८ वर्षे व त्यापुढील वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरणास सुरुवात केली आहे.

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे सीओओ आणि युनिट हेड श्री संतोष मराठे यांनी सांगितले, “सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांच्या लसीकरणाला मान्यता दिल्यानंतर कोविड-१९ लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात कोविड लसीकरण सुरु करणाऱ्या, देशातील पहिल्या खाजगी रुग्णालयांपैकी अपोलो हॉस्पिटल्स एक आहे. नवी मुंबईमध्ये आम्ही कोविशील्ड ही लस देत आहोत ज्याची किंमत ८५० रुपये आहे आणि सरकारी नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व पात्र व्यक्तींना लस दिली जात आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जाईल अशी केंद्रे निर्माण करण्यासाठी आणि ती सुरळीतपणे चालवता यावीत यासाठी आम्ही सक्षम संसाधने, शीत शृंखला व्यवस्थांमध्ये गुंतवणूक केली आहे तसेच विविध संसाधने तैनात केली आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांच्या परिसरातील तसेच हौसिंग सोसायट्यांमधील लसीकरण अभियानांबरोबरीनेच खारघर (सरस्वती इंजिनियरिंग कॉलेज) आणि वाशी (मॉडर्न स्कूल) येथे २ कम्युनिटी व्हॅक्सिनेशन्स सेंटर्स उभारण्यासाठी आम्हाला सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून अनुमती मिळाली आहे. ३ मेपासून आम्ही दररोज जवळपास १००० व्यक्तींना लस देत आहोत. आमच्या सर्व सुसज्ज संसाधनांसह आमचे तज्ञ व वैद्यकीय कर्मचारी हा उपक्रम असाच पुढे सुरु ठेवण्यासाठी सज्ज आहेत. अतिशय महत्त्वाच्या अशा या उपक्रमाचा प्रसार करत असतानाच सर्व नियम व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यावर देखील आम्ही भर देत आहोत.” 

नवी मुंबई महानगरपालिकेचे माननीय आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले, “संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तरुण व्यक्ती मोठ्या संख्येने आजारी पडत असल्याचे दिसून येत आहे आणि १८ वर्षांपेक्षा पुढील वयाच्या प्रत्येकाला लस दिली गेल्याने केसेसच्या संख्येत सातत्याने होत असलेली वाढ रोखण्यात मदत होईल.  मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियानाला पाठिंबा देण्यासाठी सर्व पात्र व्यक्तींना लस उपलब्ध करवून देण्याच्या प्रयत्नांना आम्ही साथ देत राहू. कोविड-१९ लसीकरणामध्ये योगदान देण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांना लस उपलब्ध करवून देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सकडून राबवल्या जात असलेल्या उपक्रमांबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.”

पनवेल महापालिकेचे माननीय आयुक्त श्री सुधाकर देशमुख म्हणाले, “दुसरी लाट अति भयंकर आहे.  प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण पूर्ण होणे अतिशय गरजेचे आहे. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्ती कोविड-१९ लसीकरणासाठी पात्र ठरवण्यात आल्यामुळे लसींची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्याच्या परिस्थितीत आम्ही मोठ्या प्रमाणावर कोविड-१९ लसीकरणासाठी आणि प्रत्येक व्यक्तीला लस उपलब्ध करवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत. आम्हाला पक्की खात्री आहे की, पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी आणि खासकरून घरे व कामाच्या ठिकाणी जवळपास जितक्या जास्त लसीकरण मोहिमा चालवल्या जातील तितके लोकांसाठी लस घेणे सोपे बनेल”, stated in the s release.ends

Be the first to comment on "नवी मुंबई अपोलो तर्फे कोरोना लसीकरण सुरु अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षे व त्यापुढील वयोगटासाठी लसीकरण केले जाईल"

Leave a comment

Your email address will not be published.


*