उल्लेखनीय व अपवादात्मक कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर अॅवॉर्ड’ सोनू सूद, अरविंद केजरीवाल, नितीन गडकरी, अजिंक्य रहाणे, तात्याराव लहाने, ओम राऊत, आदींना पुरस्कार प्रदान

मुंबई, ७ मे २०२१ (GNI): शेमारू मराठीबाणा सुमारे एक वर्षापूर्वी सुरू झाली. काही अत्यंत गाजलेले मराठी चित्रपट व नाटके यांच्यासाठीचे हे एक ‘वन-स्टॉप डेस्टिनेशन’ ठरावे, ही या वाहिनीसाठीची योजना आता फलद्रूप झालेली आहे. महाराष्ट्र व गोवा येथील महाराष्ट्रीय प्रेक्षकांच्या मनोरंजनावर प्रामुख्याने भर देणाऱ्या या वाहिनीने,मराठी संस्कृती फुलविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, तसेच कोरोना साथीच्या काळातही मराठी प्रतिभेला वाव दिला. याच अनुषंगाने, महाराष्ट्रीय नागरिकांची समृद्ध संस्कृती व प्रतिभा यांचा सोहळा खास महाराष्ट्रदिनी साजरा करण्यात आला, ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर अवॉर्ड’ या कार्यक्रमाचे संयोजन १ मे रोजी शेमारू या वाहिनीवर करण्यात आले.

सध्याच्या आव्हानात्मक काळात, थोडासा आनंद साजरा केल्यानेदेखील आपली मनोवृत्ती सकारात्मक राहण्यास मदत होते. असाच आनंद साजरा करण्याची उत्तम संधी या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रेक्षकांना मिळाली. आपापल्या क्षेत्रांत उल्लेखनीय व अपवादात्मक कामगिरी करणाऱ्यांचा गौरव या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला. महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणणाऱ्या दिग्गजांना गौरविणारा हा एक पुरस्कार समारंभ असून, त्यांना ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर अवॉर्ड’ हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्राला राष्ट्रीय व जागतिक मंचांवर नेण्यात ज्या व्यक्तींनी सकारात्मक परिणाम घडवून आणले, त्यांना या समारंभात सन्मानित करण्यात आले. ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर अवॉर्ड’ च्या या सोहळ्याची शोभा वाढविणाऱ्यांमध्ये सोनू सूद, अरविंद केजरीवाल, नितीन गडकरी, ज्ञानदा कदम, कुमकुम बिन्वाल, शोभा यादव, अजिंक्य रहाणे, तात्याराव लहाने, ओम राऊत, अविनाश अरुण, निर्मला सीतारामन आदींचा समावेश करण्यात आले होते.

शेमारू एन्टरटेन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेन गाडा म्हणाले, “शेमारू मराठीबाणा’वर या पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला आनंद वाटत आहे व मी कृतज्ञही आहे. समृद्ध प्रतिभा आणि संस्कृती या बाबी नेहमीच साजऱ्या झाल्या पाहिजेत. याबाबत पुढाकार घेणाऱ्या लोकमतचा मी आभारी आहे. महाराष्ट्रीयनागरिकांच्या उत्तुंग प्रतिभेचा प्रसार व संवर्धन करायचा, हे ‘शेमारू मराठीबाणा’ चे सुरुवाती पासूनचे उद्दिष्ट आहे आणि शेमारू मराठीबाणावर पुरस्कार सोहळा आयोजित केल्याने, आम्ही आपले ध्येय गाठले आहे, असा आमचा विश्वास आहे. हे ध्येय टिकवण्याच्या दिशेने आम्ही पुढे जात राहू.”

यावर्षी या पुरस्कार सोहळ्यात क्रीडा, औषधे, सामाजिक, व्यावसायिक, जागतिक, राजकीय आणि चित्रपटसृष्टी या क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. आरतीसिंग, इक्बाल चहल, आस्तिक कुमार, वंदना अवसरमल, अलका पठाणकर, ओम राऊत, अविनाश अरुण आदी अनेक मान्यवर व्यक्तींच्या हस्ते एकूण २४ हून अधिक पुरस्कार प्रदान केले. यावर्षी अजिंक्य रहाणे व अविनाश अरुण यांना प्रेक्षकांची वाहवा मिळाली.ends

Be the first to comment on "उल्लेखनीय व अपवादात्मक कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर अॅवॉर्ड’ सोनू सूद, अरविंद केजरीवाल, नितीन गडकरी, अजिंक्य रहाणे, तात्याराव लहाने, ओम राऊत, आदींना पुरस्कार प्रदान"

Leave a comment

Your email address will not be published.


*