जे. बी. केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे (जेबीसीपीएल) भारतात नेफ्रॉलॉजी विभागात पदार्पण


• देशातील किडनीच्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी “रेनोवा” हे नवे विशेष डिव्हिजन सुरु केले.
• या डिव्हिजनमध्ये जेबीसीपीएल सात उत्पादने सादर करणार आहे, किडनीच्या गंभीर आजारांमध्ये अतिताणाच्या (हायपरटेन्शन) व्यवस्थापनावर ही उत्पादने भर देतील.


मुंबई, भारत ७ मे २०२१ (GNI): जे. बी. केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक आणि अतिताण (हायपरटेन्शन) क्षेत्रात कार्यरत असलेली आघाडीच्या कंपनीने नेफ्रॉलॉजी अर्थात मूत्रपिंड विकार क्षेत्रात पदार्पण केले आहे. यासाठी त्यांनी “रेनोवा” हे नवे विशेष डिव्हिजन सुरु केले असून किडनीच्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांची मदत करण्याच्या दृष्टीने हे डिव्हिजन प्रयत्नशील असणार आहे.
हे नवे डिव्हिजन किडनीची सर्वसमावेशक देखभाल या विषयावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. किडनीच्या गंभीर आजारांमध्ये अतिताणाचे (हायपरटेन्शन) व्यवस्थापन करण्यापासून ते अगदी शेवटच्या स्टेजमध्ये पोहोचलेल्या मूत्रपिंड विकारापर्यंत सर्व बाबतीत हे डिव्हिजन कार्यरत राहील. सिलाकर® (Cilacar®) आणि निकार्डिया® (Nicardia®) यासारख्या ब्रँड्ससह अतिताण (हायपरटेन्शन) क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्यानंतर आता जेबीसीपीएलने किडनीच्या गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांची मदत करण्यावर देखील लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.
किडनीचा गंभीर आजार हे जगभरात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमुख कारण बनत चालले आहे. २०१५ सालच्या ग्लोबल डिजीज बर्डन रिपोर्टमध्ये या आजाराला मृत्यूच्या सर्वाधिक सामान्य कारणांपैकी एक संबोधण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षात या आजाराने होणाऱ्या मृत्यूंमध्ये ३७.१% वाढ झाली आहे. भारतात या आजाराच्या प्रमाणाचा आणि त्यामुळे होत असलेल्या नुकसानाचा नीट अभ्यास केला गेलेला नाही पण दर १० लाख लोकसंख्येमध्ये ८०० रुग्णांना किडनीचा गंभीर आजार असतो असे अनुमान आहे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला मूत्रपिंड विकार दर १० लाख लोकसंख्येमध्ये १५०-२०० लोकांना असतो. दुर्दैवाने यापैकी खूपच कमी रुग्ण नेफ्रोलॉजिस्ट्सपर्यंत पोहोचू शकतात आणि तेदेखील जेव्हा त्यांचा आजार अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला असतो तेव्हा जातात. म्हणूनच या क्षेत्रात विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
जे. बी. केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे सीईओ व पूर्णवेळ संचालक श्री. निखिल चोप्रा यांनी सांगितले, “अतिताण (हायपरटेन्शन) क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी म्हणून कार्यरत असताना आमच्या असे लक्षात आले आपल्या देशात किडनीचा गंभीर आजार ही एक खूप मोठी समस्या आहे आणि या रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. किडनीच्या गंभीर आजाराशी संबंधित अतिताणाच्या (हायपरटेन्शन) केसेसची संख्या वाढते आहे आणि आम्ही असे मानतो की आमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून किडनीच्या आजारांनी त्रस्त रुग्णांच्या वाढत्या पण पूर्ण होत नसलेल्या गरजा आम्ही पूर्ण करू शकू.”
त्यांनी पुढे असेही सांगितले, “रुग्णांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी जेबीसीपीएल वचनबद्ध आहे आणि विशेष नेफ्रॉलॉजी डिव्हिजन सुरु करून आम्ही त्या दिशेने पुढचे पाऊल उचलले आहे. याशिवाय आम्ही किडनीच्या गंभीर आजारांविषयी जागरूकता निर्माण करून रुग्णांना लवकरात लवकर डॉक्टर्सपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम करण्याचे आमचे प्रयत्न देखील सुरु ठेवू.”
नव्या डिव्हिजनची सुरुवात आणि रुग्ण-केंद्रित उपक्रम यांच्या माध्यमातून जेबीसीपीएल गंभीर किडनी आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण केल्या जाण्यात मदत करू शकेल. हे डिव्हिजन सुरु करण्यात आल्यामुळे नेफ्रोलॉजिस्ट्स आणि डॉक्टर्सना आपल्या रुग्णांना उपचारांचे विविध पर्याय देता येतील आणि त्यामुळे या रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारेल. किडनीच्या गंभीर आजारांच्या रुग्णांना प्रत्येक टप्प्यावर सर्वसमावेशक मदत पुरवण्याचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी जेबीसीपीएल या डिव्हिजनमार्फत वेगवेगळी उत्पादने सादर करेल.ends

Be the first to comment on "जे. बी. केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे (जेबीसीपीएल) भारतात नेफ्रॉलॉजी विभागात पदार्पण"

Leave a comment

Your email address will not be published.


*