ऑनलाईन टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझमध्ये क्लस्टर १०च्या अंतिम फेरीत आयआयटी मुंबईच्या शैलेश जे मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या प्रीतम उपाध्यायने विजेतेपद जिंकले

मुंबई, १८ मार्च, २०२१ (GNI):  ऑनलाईन टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझमध्ये क्लस्टर १०च्या अंतिम फेरीत आयआयटी मुंबईच्या शैलेश जे मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या प्रीतम उपाध्यायने विजेतेपद जिंकले आहे.  महाविद्यालयांसाठी आयोजित करण्यात येणारी भारतातील सर्वात मोठी बिझनेस क्विझ यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहे.

टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझच्या क्लस्टर १०मध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांचा समावेश आहे.  या अंतिम  फेरीमध्ये स्पर्धकांनी आपली चाणाक्ष बुद्धी, वेगवान विचार आणि क्वीझिंग क्षमता दर्शवून सर्वांना अचंबित केले.

विजेत्याला ३५,०००* रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच त्याला राष्ट्रीय अंतिम फेरीमध्ये पात्र ठरण्यासाठी झोनल अंतिम फेरीत देखील सहभागी होता येणार आहे.  मुंबईच्या स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, एनएमआयएमएसच्या सिद्धार्थ मिश्राने उपविजेतेपद पटकावले असून त्याला १८,०००* रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या लीडरशिप टीमचे सदस्य व ग्रुप चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर श्री. सिद्धार्थ शर्मा हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  व्हर्च्युअल पारितोषिक वितरण समारोहात त्यांनी विजेत्यांना बक्षिसे दिली.

महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ २०२० प्रमाणेच कॅम्पस क्विझ देखील पहिल्यांदा व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.

ऑनलाईन कॅम्पस क्विझसाठी देशात एकूण २४ क्लस्टर्स तयार करण्यात आले आहेत.  ऑनलाईन प्रिलिम्सच्या दोन स्तरांनंतर प्रत्येक क्लस्टरमधील आघाडीच्या १२ स्पर्धकांना वाईल्ड कार्ड फायनल्ससाठी आमंत्रित करण्यात येईल.  त्यापैकी आघाडीचे ६ स्पर्धक २४ ऑनलाईन क्लस्टर फायनल्समध्ये सहभागी होतील.  या २४ क्लस्टर्सचे दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उत्तर असे चार झोन तयार करण्यात आले आहेत.  प्रत्येक झोनमध्ये ६ क्लस्टर्स आहेत.

प्रत्येक क्लस्टर अंतिम फेरीतील विजेता/विजेती झोनल अंतिम फेरीमध्ये सहभागी होईल.  चार झोनल अंतिम फेरीतील विजेते थेट अंतिम फेरीसाठी पात्र मानले जातील.  चार झोनल अंतिम फेरीतील उपविजेते वाईल्ड कार्ड फायनलमध्ये उतरतील आणि ४ उपविजेत्यांपैकी २ राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.  एकूण ६ स्पर्धक राष्ट्रीय अंतिम फेरीत सहभागी होतील.  त्यांच्यामध्ये सर्वाधिक गुण पटकावणाऱ्या स्पर्धकाला राष्ट्रीय विजेता घोषित केले जाईल व त्याला/तिला २.५ लाख रुपयांचे महापरितोषिक व प्रतिष्ठित टाटा क्रुसिबल ट्रॉफी देऊन गौरवण्यात येईल.

सर्व अंतिम फेऱ्या टाटा क्रुसिबल फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन व युट्युब चॅनेल्सवर प्रक्षेपित केल्या जातील. 

ख्यातनाम क्विझमास्टर ‘पिकब्रेन’ गिरी बालसुब्रमण्यम हे आपल्या अनोख्या, निपुण शैलीमध्ये या क्विझचे सूत्रसंचालन करत आहेत. 

*पारितोषिकांच्या रकमेवर कर लागू आहे.               

About Tata Crucible Campus Quiz: ‘Tata Crucible – The Campus Quiz’ seeks to bring together the sharpest young minds to take on the heat of the country’s largest business quiz. Youth is a key audience cluster which the Tata group is focusing its communication at and Tata Crucible is a key knowledge initiative towards this engagement. Started in 2004, it has now become an eagerly anticipated annual event.

You can follow Tata Crucible Campus Quiz on:

Facebook: https://www.facebook.com/TataCrucible

Twitter: https://twitter.com/Tata_Crucible

You Tube: http://www.youtube.com/user/TataCrucible

LinkedIn: https://www.linkedin.com/company/tata-crucible

Mobile App: Download the Tata Crucible Brainbox mobile app on your phone, available on iOS, Android, and Windows platforms.

About the Tata Group: Founded by Jamsetji Tata in 1868, the Tata group is a global enterprise, headquartered in India, comprising 30 companies across ten verticals. The group operates in more than 100 countries across six continents, with a mission ‘To improve the quality of life of the communities we serve globally, through long-term stakeholder value creation based on Leadership with Trust’. Tata Sons is the principal investment holding company and promoter of Tata companies. Sixty-six percent of the equity share capital of Tata Sons is held by philanthropic trusts, which support education, health, livelihood generation and art and culture.

In 2019-20, the revenue of Tata companies, taken together, was $106 billion (INR 7.5 trillion). These companies collectively employ over 750,000 people. Each Tata company or enterprise operates independently under the guidance and supervision of its own board of directors. There are 29 publicly-listed Tata enterprises with a combined market capitalisation of $123 billion (INR 9.3 trillion) as on March 31, 2020. Companies include Tata Consultancy Services, Tata Motors, Tata Steel, Tata Chemicals, Tata Consumer Products, Titan, Tata Capital, Tata Power, Tata Advanced Systems, Indian Hotels and Tata Communications.ends

Be the first to comment on "ऑनलाईन टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझमध्ये क्लस्टर १०च्या अंतिम फेरीत आयआयटी मुंबईच्या शैलेश जे मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या प्रीतम उपाध्यायने विजेतेपद जिंकले"

Leave a comment

Your email address will not be published.


*