GENERAL




No Picture

नाबार्ड समर्थित महालक्ष्मी सरस 2023-24  मेळ्यास  उत्साहात प्रारंभ ग्रामीण  कारागिरांना बँकेकडून पाठबळ, एमएमआरडीए मैदानावर 7 जानेवारीपर्यंत आयोजन

मुंबई, 26 डिसेंबर, 2023 (GNI):  भारताच्या  समृद्ध  सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या महालक्ष्मी सरस 2023-24 या उत्सावाचे 26 डिसेंबरला  मुंबईतील वांद्रे  कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील एमएमआरडीएच्या मैदानावर अतिशय उत्साहात आणि धडाक्यात शुभारंभ झाला. नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्डतर्फे आयोजित या उत्सावात देशभरातील अनेक कारागिरांना त्यांच्या मालाची विक्रीसाठी उत्तम दालन प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री श्री. गिरीश महाजन यांनी महालक्ष्मी सरस 2023-24 या उत्सावाचे उदघाटन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियाना (एमएसआरएलएम) चे सीईओ श्री. रूचेश जयवंशी, एमएसआरएलएमचे सीओओ श्री. परमेश्वर राऊत, रेमंड डिसोझा तसेच एमएसआरएलएमचे अन्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.  महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियाना (एमएसआरएलएम) शी संबंधित असलेल्या उमेद या उपक्रमाच्या सहकार्याने, केद्र सरकारचे ग्रामीण विकास मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचे ग्रामीण विकास विभाग यांच्याद्वारे 2006 पासून दरवर्षी आयोजित केला जाणारा महालक्ष्मी सरस मेळा हे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करते. बचत गट (एसएचजी), ग्रामीण भागातील कुशल कारागीर, कलाकार, शेतकरी आणि अन्य भागधारकांना त्यांची उत्पादने ग्राहकांसमोर आणण्यात तसेच शहरी ग्राहकांशी थेट संबध जोडण्यासाठी हा मेळा अतिशय उपयुक्त ठरला आहे. याप्रसंगी बोलताना नाबार्डचे अध्यक्ष श्री. के. व्ही. शाजी (Shaji) म्हणाले, “महालक्ष्मी सरस मेळा  ग्रामीण कारागिरांना सक्षम बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे, कारागिरांना आम्ही केवळ बाजारपेठच उपलब्ध करून देत नाही तर, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या सखोल माहितीचा प्रसार करणाऱ्या कार्यक्रमाशी जोडले गेलो आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. यासारख्या उपक्रमांद्वारे, ग्रामीण कारागीर आणि शहरी ग्राहक यांच्यातील दरी कमी करणे, शाश्वत उपजीविका निर्माण करणे आणि आपल्या समृध्द आण विविधता असलेल्या परंपरांचे जतन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” याप्रसंगी बोलताना नाबार्डचे सीजीएम श्री. रेमंड डिसोझा म्हणाले, “नाबार्डने पाठबळ दिलेला प्रत्येक स्टॉल आमच्या कारागिरांनी सुंदररित्या विणलेले हातमाग तसेच हस्तकला तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची गाथा उलगडतो. नाबार्ड ग्रामीण कारागीर आणि शेतकर्‍यांना अत्याधुनिक पध्दतीने मदत करत राहील आणि सरस मेळ्यात त्यांच्यासाठी तब्बल 49 स्टॉलची तरतूद हे एक उदाहरण आहे. सरसमध्ये सहभागी झालेले कारागीर ग्रामीण भागातील अन्य कारागींराना पुढे येण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांची शहरी भागात विक्री करण्यास प्रेरित करतील, असा आम्हाला विश्वास आहे.” यंदाच्या उत्सवात 500 हून अधिक स्टॉल्स आहेत. या स्टॉल्सवर भारतभरातील विविध उत्पादने मांडण्यात आलेली आहेत. उल्लेखनीय म्हणजे, नाबार्डने देशभरातील विविध कारागिरांच्या ४९ स्टॉल्ससाठी मदत देत मेळ्याच्या अनोख्या योजनेमध्ये योगदान दिलेले आहे. या स्टॉल्सच्या माध्यमातून आसामी गामोचा, पोचमपल्ली साड्या, बनारसी साड्या, टांगलिया उत्पादने इत्यादी कलाकुसरीच्या वस्तू मांडण्यात आलेल्या आहेत. स्वयंम बचत गट (एसएचजी), शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि बिगर शेतकरी उत्पादक संस्था (ओएफपीओ) तील सुमारे 100 ग्रामीण कारागिरांना त्यांची उत्पादने सादर करण्यासाठी नाबार्ड मदत करत आहे. नाबार्ड–सहाय्यित कारागीर गट या मेळ्यात 13 भौगोलिक संकेत (जीआय) प्रमाणित उत्पादनांचे प्रदर्शन करणार आहे. ग्रामीण भागातील दुर्लक्षित होत चाललेल्या  कला आणि हस्तकलेचे संरक्षण करण्याची गरज ओळखून, त्यांना मदतीसाठी नाबार्ड आघाडीवर आहे, ग्रामीण कारागीर, विणकर, शेतकरी आणि कारागीर यांना आर्थिक सहाय्य, कौशल्य, बाजार जोडणी आणि पायाभूत सुविधा प्रदान करत बँक मदत करत आहे. आपल्या सहाय्यकारी उपक्रमांचा एक भाग म्हणून, सरस मेळ्याचा 2023-24 उत्सवासाठी नाबार्ड सातत्यपूर्ण सहाय्य देत आहे. जीआय–टॅग केलेल्या उत्पादनांचे महत्त्व अधोरेखित करताना नाबार्ड हे सुध्दा सुनिश्चित करत आहे की, केवळ सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण उत्पादने यांनाच मेळ्यामध्ये स्थान मिळेल आणि शहरी ग्राहकांसमोर या वैविध्यपूर्ण  आणि विशिष्टतेने नटलेल्या आपल्या समृद्ध परंपरेचे सादरीकरण होईल. अनेक ग्रामीण कारागिरांना शहरी बाजारपेठांमध्ये सहजासहजी प्रवेश मिळत नाही.  सरस मेळा त्यांना आपल्या उत्पादनांच्या सादरीकरणीसाठी महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतो. हे व्यासपीठ ग्रामीण कारागीरांना शहरी बाजारपेठेची प्राधान्ये समजून घेण्यास मदत करते तसेच अनुकूल वातावरणही तयार करते.  कारागीर उत्तम किंमत मिळण्यासाठी ग्राहकांशी वाटाघाटी करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट ऑर्डरसाठी संधी शोधू शकतात. ग्रामीण कारागिरांना उत्पन्न वाढवण्यासाठी, स्वतःचा ब्रँड विकसित करण्यासाठी आणि शहरी ग्राहकांमध्ये ओळख मिळवण्यासाठी नाबार्डची या सहयोगातून एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून देते. प्रदर्शनाचा समारोप येत्या 7 जानेवारी 2024 रोजी होईल. तोपर्यंत सर्व दिवस ग्राहकांना सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत स्टॉल्सला भेट देता येतील. About NABARD: The National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) is an apex development…


भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते  राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२३ वितरण सोहळा संपन्न

National,२६ डिसेंबर २०२३: क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि. (सीजीसीईएल) या भारतातील आघाडीच्या कंपनीला प्रतिष्ठित राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२३ सह सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि उर्जा मंत्रालयाच्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) मार्फत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीने आपल्या स्टोरेज वॉटर हिटरसाठी मोस्ट एनर्जी एफिशिएण्ट अप्लायन्स ऑफ द इअर २०२३ श्रेणीमध्ये ही उपलब्धी प्राप्त केली. नवी दिल्लीमधील विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडला. सीजीसीईएलच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रोमीत घोष आणि होम इलेक्ट्रिकल्सचे व्यवसाय प्रमुख श्री. सचिन फर्तियाल यांनी पुरस्कार स्वीकारला.  याप्रसंगी मत व्यक्त करत क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोमीत घोष म्हणाले, ”विशेषत: भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते असा प्रतिष्ठित पुरस्कार मिळणे सन्माननीय आहे आणि यामधून क्रॉम्प्टनची ऊर्जा-कार्यक्षम नाविन्यतांमध्ये अग्रणी असण्याप्रती समर्पिता दिसून येते. Ends GNI.


President of India conferred Crompton Greaves with the prestigious National Energy Conservation Award 2023

National, 26th  December, 2023 (GNI), Mumbai: Crompton Greaves Consumer Electricals Ltd. (CGCEL), one of India’s leading consumer electrical companies, has been conferred with the prestigious National Energy Conservation Award 2023. The honor was conferred by…




No Picture

NABARD Empowers Rural Artisans by Supporting their Participation in Mahalaxmi Saras 2023-24

Mumbai, December 26, 2023 (GNI): The Mahalaxmi Saras 2023-24, a celebration of India’s rich cultural heritage, opened its doors on December 26th at MMRDA Ground, Bandra Kurla Complex (BKC) in Mumbai. The National Bank for…


No Picture

Coca-Cola extended partnership with the International Cricket Council (ICC) for eight years

Coca-Cola extends partnership with the International Cricket Council (ICC) for eight years Amplifying Global Cricket Experiences, Coca-Cola establishes itself as a long-standing partner of the ICC New Delhi, 26th Dec 2023 (GNI): The International Cricket…