EDUCATION


No Picture

विप्रो जीई हेल्‍थकेअरकडून भारतभरात दर्जेदार आरोग्‍यसेवा प्रबळपणे उपलब्‍ध करून देण्‍यासाठी ‘मेड इन इंडिया’ सीटी सिस्टिम लाँच

रिवॉल्‍युशन अस्‍पायर सीटी सिस्टिम सरकारच्‍या प्रॉडक्‍शन लिंक्‍ड इन्‍सेटिव्‍ह्ज (पीएलआय) योजनेअंतर्गत उभारण्‍यात आलेल्‍या कंपनीच्‍या नवीन कारखान्‍यामध्‍ये उत्‍पादित करण्‍यात आली आहे आणि सरकारच्‍या ‘आत्‍मनिर्भर भारत’ दृष्टीकोनाशी संलग्‍न आहेद्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांसह भारतभरात दर्जेदार नैदानिक सेवा उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबाउत्तम वैद्यकीय कार्यक्षमतेसह सुधारित इमेज क्‍वॉलिटी आणि कार्यरत कार्यक्षमतेसह जवळपास ५० टक्‍के उच्‍च रूग्‍ण थ्रुपूट*[1]    बेंगळुरू, एप्रिल २८, २०२२ (GNI):  विप्रो जीई हेल्‍थेकअर  या आघाडीच्‍या जागतिक वैद्यकीय तंत्रज्ञान व डिजिटल सोल्‍यूशन्‍स नवप्रवर्तक कंपनीने नेक्‍स्‍ट-जनरेशन रिवॉल्‍युशन  अस्‍पायर सीटी (कम्‍प्‍युटेड टोमोग्राफी) स्‍कॅनरच्‍या लाँचची घोषणा केली. रिवॉल्‍युशन अस्‍पायर हे भारतातील ‘आत्‍मनिर्भर भारत’ उपक्रमाशी संलग्‍न नवीनच उभारण्‍यात आलेल्‍या विप्रो जीई मेडिकल डिवाईसेस मॅन्‍युफॅक्‍चुरिंग कारखान्‍यामध्‍ये डिझाइन व उत्‍पादित करण्‍यात आलेले एण्‍ड-टू-एण्‍ड प्रगत इमेजिंग सोल्‍यूशन आहे. सीटी सिस्टिम आजार व विकृतींचे निदान करताना वैद्यकीय विश्‍वास वाढवण्‍यासाठी उच्‍च इमेजिंग इंटेलिजन्‍ससह सुसज्‍ज आहे. भारतासमोर शहरी-ग्रामीण विभाजन आणि आजारांचा भार असे दुहेरी आव्हान आहे. मोठ्या प्रमाणात लोकसंख्‍या ग्रामीण भागात असली तरी बहुतांश आरोग्‍य सुविधा निवडक मोठ्या शहरांमध्‍ये आहेत. कॅन्सर डायग्नोस्टिक्स, मेडिकल इमेजिंग टूल्स यांसारख्या उच्‍च दर्जाच्या वैद्यकीय उत्पादनांच्या आयातीवर भारत अवलंबून आहे. आयुष्मान भारतच्या माध्यमातून असंसर्गजन्य आजारांचे (एनसीडी) लवकर निदान आणि आत्‍मनिर्भरतेवर सरकार भर देत असल्याने प्रगत वैद्यकीय उपकरणांची मागणी वाढली आहे. ही गरज पूर्ण करणे आणि द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांसह संपूर्ण भारतभर दर्जेदार वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणे हे रिवॉल्‍युशन अस्‍पायर सीटीचे उद्दिष्ट आहे. रिवॉल्‍युशन अस्‍पायर सीटी स्‍कॅनर डॉक्‍टरांना जवळपास ५० टक्‍के उच्‍च थ्रुपूटसोबत* सुधारित कार्यरत कार्यक्षमतेसह सक्षम करतो. रिवॉल्‍युशन अस्‍पायर सीटी स्‍कॅनरमध्‍ये रोटेशन वेळ २० टक्‍क्‍यांनी वाढवण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे डॉक्‍टरांना जलदपणे निदान* करता येते. तसेच लक्षणीयरित्‍या सुधारित कूलिंग दरासह स्‍कॅनर सतत स्‍कॅनिंगचे उच्‍च प्रमाण देते आणि प्रतिदिन अधिकाधिक रूग्णांची हाताळणी करू शकतो. सीटी स्‍कॅनरमध्‍ये नवीन डिटेक्‍टर डिझाइन व अल्‍गोरिदमसह स्‍मार्ट वैशिष्‍ट्ये देखील आहेत- जसे स्‍मार्ट एमएआर, जे जवळपास ३० टक्‍के सुधारित इमेज क्‍वॉलिटी* देते. विभागातील सर्वात शक्तिशाली सिस्टिम्‍सपैकी असलेली ही सिस्टिम ट्यूब क्षमता, ट्यूब करण्‍ट व एक्‍स-रे जनरेटर पॉवरच्‍या माध्‍यमातून उच्‍च कार्यक्षमता देण्‍यासाठी, तसेच उपस्थिती कायम ठेवण्‍यासाठी रिडिझाइन करण्‍यात आलेली आहे. याव्‍यतिरिक्‍त ही सिस्टिम अपवादात्‍मक वैद्यकीय निष्‍पत्ती देण्‍यासोबत रूग्‍ण व डॉक्‍टरांच्‍या सुरक्षिततेसाठी कमी रेडिएशन डोसेस देण्‍यासाठी इंटेलिजण्‍ट आयक्‍यू देते. या लाँचबाबत बोलताना अध्‍यक्ष व वरिष्‍ठ सल्‍लागार, कार्डियक सर्जन डॉ. देवी शेट्टी म्‍हणाले, ”भारतात आरोग्‍यसेवा उपलब्‍ध असण्‍याची स्थिती फारच विषम आहे आणि नवोन्‍मेष्‍कारी वैद्यकीय तंत्रज्ञान उत्‍पादने ही पोकळी भरून काढण्‍यामध्‍ये साह्य करतील. अत्‍याधुनिक, स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित व किफायतशीर उत्‍पादनांसह हा बदल दिसून येत आहे, जसे रिवॉल्‍युशन अस्‍पायर सीटी स्‍कॅनर बाजारपेठेचे लोकशाहीकरण करण्‍यामध्‍ये मदत करत दर्जेदार आरोग्‍यसेवा द्वितीय श्रेणीच्‍या व त्‍यापलीकडील शहरांपर्यंत घेऊन जात आहे. मोठे असो वा लहान, सर्व आरोग्‍य केंद्रांना दर्जेदार निदान सेवा उपलब्‍ध असणे महत्त्वाचे आहे. मी सुधारित रूग्‍ण केअर सेवेसाठी या क्रांतिकारी उत्‍पादनासह भारतातील आरोग्‍यसेवा पायाभूत सुविधा सक्षम करण्‍यासाठी विप्रो जीई हेल्‍थकेअरच्‍या प्रयत्‍नांचे कौतुक करतो.” विप्रो जीई हेल्‍थकेअरचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. श्रवण सुब्रमण्‍यम म्‍हणाले, ”विप्रो जीई हेल्‍थकेअरमध्‍ये आम्‍ही भारताच्‍या आत्‍मनिर्भर दृष्टीकोनाप्रती कटिबद्ध आहोत. रिवॉल्‍युशन अस्‍पायर सीटी सिस्टिमसह आमचा वंचित बाजारपेठांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍याचा आणि दर्जेदार आरोग्‍यसेवा उपलब्‍धतेमधील पोकळी भरून काढण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍ही सरकारशी सहयोग करण्‍यास उत्‍सुक आहोत आणि ‘मेड इन इंडिया, फॉर इंडिया अॅण्‍ड फॉर द वर्ल्‍ड’ वैद्यकीय डिवाईसेसमध्‍ये गुंतवणूक करत राहू, तसेच ‘सर्वांसाठी आरोग्‍यसेवा’ सक्षम करण्‍याच्‍या आमच्‍या मिशनला प्रगत करू.” Ends



ARTIVAL FOUNDATION PRESENTS – Contemporary Art Show by 10 professional artists @ Spectrum World, Andheri (W), Mumbai

Mumbai, 28th April 2022 (GNI): Artival Art Foundation has opened up a new art gallery in Mumbai for promoting artists and their artworks.         Artival Foundation – an art promotional foundation based in Mumbai has…



१२६ कर्णबधिर मुलांना मिळाले श्रवणशक्तीचे वरदान कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या सहयोगाने करण्यात आल्या कॉक्लियर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कॉक्लियर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून गेल्या वर्षभरात १२६ मुलांमधील जन्मजात बहिरेपणा दूर करण्यात आला

Mumbai, 27th April 2022 (GNI): जन्मजात बहिऱ्या असलेल्या कोणत्याही मुलासाठी आवाजाची जादू, श्रवणशक्ती हे जगातील सर्वात मोठे वरदान आहे. मानवी शरीरातील पंचेंद्रियांपैकी एक म्हणजे ऐकू येण्याची शक्ती. संवाद, संभाषण, भावनिक नातेसंबंध आणि शिकणे या सर्व…




No Picture

Castrol Power1 ULTIMATE celebrates the spirit of bikers with a new anthem, Anthem celebrates the adventurous spirit of bikers, Sung by Benny Dayal, the anthem features brand ambassador Tiger Shroff

Mumbai, 26 April 2022 (GNI):  Castrol POWER1 ULTIMATE, India’s premium engine oil brand for two-wheelers, is celebrating the adventurous and indomitable spirit of bikers with a new and catchy anthem. Sung by Benny Dayal, the…