आयएचसीएल ठाण्यामध्ये सुरु करणार जिंजर हॉटेल
आयएचसीएलचे मुंबई महानगर प्रदेशातील पाचवे हॉटेल
ठाणे, १७ जुलै २०२४ (GNI): इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (आयएचसीएल) या भारतातील सर्वात मोठ्या हॉस्पिटॅलिटी कंपनीने मुंबई महानगर प्रदेशातील पाचवे जिंजर ब्रँडेड हॉटेल ठाण्यामध्ये सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. जिंजर ब्रँडची लीन लक्स डिझाईन फिलॉसॉफी दर्शवणारा हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट याठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांना आधुनिक वातावरणात काम आणि सुट्टी या दोन्हींचा योग्य मिलाप मिळवून देईल.
श्रीमती सुमा वेंकटेश, एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट, रिअल इस्टेट अँड डेव्हलपमेंट, आयएचसीएल म्हणाल्या,”मुंबई महानगर प्रदेशातील पाचवे जिंजर हॉटेल ठाण्यामध्ये सुरु करण्याचा निर्णय आयएचसीएलच्या भारतामध्ये प्रमुख शहरांमध्ये विस्तार करण्याच्या धोरणात्मक व्हिजनचा एक भाग आहे. वेगाने विकसित होत असलेले शहर ठाणे महाराष्ट्रातील एक प्रमुख निवासी आणि वाणिज्यिक केंद्र आहे. या नवीन हॉटेलसाठी जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडसोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”
तब्बल २०० खोल्यांचे जिंजर ठाणे सर्व प्रमुख रिटेल सेंटर्सना अगदी सहजपणे पोहोचता येईल अशा मोक्याच्या ठिकाणी आहे. संपूर्ण दिवसभर खानपान सेवा पुरवणारे डायनर क्युमिन इथे असल्याने जागतिक व स्थानिक खाद्यपदार्थ तसेच बारचा देखील आनंद घेता येईल. याखेरीज अत्याधुनिक फिटनेस सेंटर, २००० चौरस फुटांपेक्षा मोठा बँक्वेट हॉल, सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज मीटिंग रूम अशा वेगवेगळ्या सुविधांचा लाभ याठिकाणी घेता येईल.
श्री राहुल जगदाळे आणि श्री रोहित जगदाळे, संचालक, जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांनी सांगितले,”या नवीन प्रकल्पासाठी आयएचसीएलसोबत हातमिळवणी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सुप्रसिद्ध जिंजर ब्रँड ठाणे शहरात घेऊन येण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.”
ठाण्यामध्ये अनेक आयटी पार्क्स, वेगवेगळे लहान-मोठे व्यवसाय व खरेदीची लोकप्रिय ठिकाणे आहेत. व्यवसायासाठी तसेच सुट्टीमध्ये मौजमजा, खरेदी करण्यासाठी ठाण्यामध्ये येणाऱ्या पाहुण्यांची संख्या प्रचंड आहे. या हॉटेलमुळे आता आयएचसीएलच्या हॉटेल्सची एकूण संख्या ३५ होईल, त्यापैकी १२ हॉटेल्सचे काम अद्याप सुरु आहे.ends GNI
Be the first to comment on "आयएचसीएल ठाण्यामध्ये सुरु करणार जिंजर हॉटेल आयएचसीएलचे मुंबई महानगर प्रदेशातील पाचवे हॉटेल"