एक्‍झॉनमोबिलकडून नवीन, सुधारित पॅकेजिंगमध्‍ये ल्‍युब्रिकण्‍ट्सची नेक्‍स्‍ट-जनरेशन मोबिल सुपर रेंज लाँच

बेंगळुरू, भारत । जून 24, 2022 GNI): एक्‍झॉनमोबिल ल्‍युब्रिकण्‍ट्स प्रा. लि.ने आज सुधारित लेबल्‍ससह नवीन, सुधारित पॅकेजिंगमध्‍ये त्‍यांचे नेक्‍स्‍ट-जनरेशन पॅसेंजर वेईकल ल्‍युब्रिकण्‍ट्स – ‘मोबिल सुपर’च्‍या लाँचची घोषणा केली. हे सुधारित पॅकेजिंग ग्राहकांना उत्‍पादनांची सत्‍यता पडताळण्‍यासाठी बॉटल्‍सवर नवीन क्‍यूआर-कोड आधारित अॅण्‍टी-काउंटरफिट वैशिष्‍ट्य देते.

नवीन पॅकेजिंगच्‍या लाँचसह एक्‍झॉनमोबिलने त्‍यांच्‍या मोबिल सुपर ३००० सिरीजला मोबिल सुपर ऑल-इन-वन प्रोटेक्‍शन सिरीज, मोबिल सुपर १००० सिरीजला मोबिल सुपर फ्रिक्‍शन फाइटर सिरीज आणि मोबिल सुपर एचपीला मोबिल सुपर एव्‍हरीडे प्रोटेक्‍शन असे नाव दिले आहे.

हे नेक्‍स्‍ट जनरेशन सिन्‍थेटिक पॅसेंजर वेईकल ल्‍युब्रिकण्‍ट उच्‍च दर्जाचे तंत्रज्ञान देते, जे आधुनिक बीएस-६ वैशिष्‍ट्यांची पूर्तता करते आणि त्‍यांच्‍या मोबिल सुपर ऑल-इन-वन प्रोटेक्‍शन सिरीजच्‍या माध्‍यमातून इंधन इकोनॉमी लाभ देते. तसेच मोबिल सुपर फ्रिक्‍शन फाइटर सिरीज सर्वोत्तम इंजिन वेअर प्रोटेक्‍शन व स्‍वच्‍छता देते.

एक्‍झॉनमोबिल त्‍यांचे ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर टोकियो ऑलिम्पिक्‍स सुवर्ण पदक विजेते पद्मश्री नीरज चोप्रा यांच्‍या सहयोगाने परिवर्तनाप्रती जागरूकता निर्माण करत आहे.

या लाँचबाबत बोलताना एक्‍झॉनमोबिल ल्‍युब्रिकण्‍ट्स प्रा. लि. चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विपिन राणा म्‍हणाले, ”तंत्रज्ञान अग्रणी म्‍हणून एक्‍झॉनमोबिल ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या जीवनामध्‍ये सकारात्‍मक बदल घडवून आणण्‍यासाठी नेहमीच नवीन मार्गांचा शोध घेत आहे. हे आमची ब्रॅण्‍ड मोहिम ‘फरक लाकर देखिये’शी संलग्‍न आहे. ग्राहकांच्‍या गरजा लक्षात घेत आमचे उत्‍पादन सुत्रीकरण प्रमाणित तंत्रज्ञानांवर आधारित आहेत आणि विविध ड्रायव्हिंग स्‍टाइल्‍स व स्थितींसाठी सानुकूल आहेत. नवीन एर्गोनॉमिक पॅक डिझाइन ग्राहकांना आमची उत्‍पादने कार्यक्षमपणे हाताळण्‍यास मदत करेल आणि सुधारित लेबल डिझाइन्‍स व्हिज्‍युअल आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करतील. नवीन मोबिल सुपर रेंज आमच्‍या ग्राहकांना सर्वोत्तम इंधन इकोनॉमी देखील देईल आणि त्‍यांच्‍या दैनंदिन ड्राइव्‍हसाठी सुधारित अनुभव देईल.”

एक्‍झॉनमोबिलच्‍या इंजिन ऑईल्‍सना ल्‍युब्रिकेशनच्‍या १५० वर्षांहून अधिक काळाच्‍या अनुभवाचे पाठबळ आहे आणि २००८ पासून सिन्‍थेटिक इंजिन ऑईल्‍समध्‍ये जगभरातील लीडर म्‍हणून मान्‍यताकृत राहिले आहेत.*

मोबिलची नवीन पॅकेजिंगसह इंजिन ऑईल्‍सची रेंज मोबिल कार केअर आऊटलेट्स, मोबिल रिटेल स्‍टोअर्स आणि आघाडीचे ऑनलाइन व्‍यासपीठ जसे अॅमेझॉन इंडिया व फ्लिपकार्ट येथे उपलब्‍ध आहे.    

About ExxonMobil in India: ExxonMobil’s downstream business engages in the distribution, sales and marketing of Mobil branded lubricants and specialties. The chemicals business provides market development support, analytical and reporting services. It also conducts chemical product application support services and product testing support at its technology center in Bengaluru. The upstream business provides consulting and LNG market development support services for other ExxonMobil upstream affiliates. The Global Business Center/Technical Center provides a range of support services for ExxonMobil’s operations around the globe.
ExxonMobil contributes to a wide range of programs in India that support education, health and the community. For more news and information on Mobil lubricants in India, ends GNI SG

Be the first to comment on "एक्‍झॉनमोबिलकडून नवीन, सुधारित पॅकेजिंगमध्‍ये ल्‍युब्रिकण्‍ट्सची नेक्‍स्‍ट-जनरेशन मोबिल सुपर रेंज लाँच"

Leave a comment

Your email address will not be published.


*