मुंबई, ६ मे २०२२ (GNI): अर्माकोने अक्षय पात्र फाऊंडेशनशी करार करून भारताच्या कोविड-१९च्या पुनर्वसनासाठीच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अर्माकोने भारतातील कोविड-ग्रस्त कुटुंबांना पौष्टिक जेवणासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी २००,००० डॉलर (रु.१.५० कोटी) दान दिले आहेत. ही भागीदारी समाजातील काही सर्वात वंचित गटांच्या मूलभूत गरजा पूर्ण करते आणि अर्माकोच्या समाजाप्रती असलेल्या कॉर्पोरेट नागरिकत्वाच्या आधारस्तंभांना बळकटी देते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, दिल्लीमध्ये सुमारे ५,३१,००० शिजवलेले जेवण वितरित केले जाईल आणि महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे, पनवेल आणि पुणे येथील आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना १,४४,८६५ इतके जेवण दिले जाईल.
श्री मोहम्मद एस.अल-हर्बिश, अध्यक्ष अर्माको एशिया इंडिया प्रा.ली. म्हणाले, “आम्ही भारतातील स्थानिक समुदायांना पाठिंबा देण्यास समर्पित आहोत आणि कोविड १९ पुनर्वसन प्रयत्नांमध्ये अक्षय पात्र फाउंडेशनसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद झाला आहे. ही देणगी अर्माकोच्या जागतिक कॉर्पोरेट नागरिकत्व मोहिमेचा एक भाग आहे. कंपनी जिथे कार्यरत आहे तिथे असलेल्या स्थानिक समुदायांच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी याद्वारे योगदान दिले जाते. यापूर्वी, ऊर्जा कंपनीने स्थानिक समुदायांसाठी संरक्षणात्मक उपकरणे आणि वैद्यकीय पुरवठा खरेदीसाठी निधी देण्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीला ५००,००० डॉलरची देणगी दिली होती.”
श्री. संदीप तलवार, सीएमओ, अक्षय पात्र फाऊंडेशन म्हणाले, “आम्ही अर्माकोचे त्यांच्या उदार देणगीबद्दल अत्यंत आभारी आहोत. यामुळे भारत आणि आम्हाला कोरोना नंतरच्या परिणामांशी लढा देण्यात मदत होईल. कोरोनाच्या साथीच्या रोगाने गेल्या दोन वर्षांत असंख्य लोकांचा बळी घेतला आहे. उपासमार संपवण्याचे आमचे ध्येय आणि प्रयत्न अशा प्रकारच्या भागीदारीतूनच साध्य होऊ शकतात.”ends GNI SG
Be the first to comment on "‘अर्माको-अक्षय पात्र’ चा कोरोना ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी करार, अर्माकोच्या २००,००० डॉलर देणगीमुळे दिल्ली आणि महाराष्ट्रातील सुमारे ७ लाख कुटुंबांना पौष्टिक अन्न मिळेल"