नवी मुंबई, २८ एप्रिल २०२२ (जीएनआई): भारतातील आघाडीची कम्युनिकेशन्स सेवासुविधा प्रदान करणारी कंपनी भारती एअरटेलने अपोलो रुग्णालय आणि सिस्कोसोबत भागीदारी केली आहे. आणीबाणीच्या प्रसंगी अधिक तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करवून देऊ शकेल आणि रुग्णांचे प्राण वाचवू शकेल अशी ५जी कनेक्टेड रुग्णवाहिका बनवण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली. हे प्रदर्शन बंगलोरमध्ये एअरटेलला टेलिकॉम विभागाने वाटप केलेल्या ५जी ट्रायल स्पेक्ट्रमवर करण्यात आले. खास पद्धतीने डिझाईन करण्यात आलेली अत्याधुनिक ५जी कनेक्टेड रुग्णवाहिका सर्वात नवीन वैद्यकीय उपकरणे, रुग्णाच्या देखभालीसाठी आवश्यक ऍप्लिकेशन्स आणि टेलिमेट्री उपकरणांनी सुसज्ज आहे, रुग्णवाहिकेमध्ये ऑनबोर्ड कॅमेरा, कॅमेऱ्यावर आधारित हेडगियर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी बॉडीकॅम देखील आहेत – या सर्वांना अल्ट्रा-फास्ट आणि लो लॅटेन्सी एअरटेल ५जी नेटवर्कने जोडले गेले आहे. पुढे या सर्वांना एआर/व्हीआर यासारख्या तंत्रज्ञानांनी देखील सक्षम केले जाईल.
रुग्णवाहिका हॉस्पिटल्शी सतत कनेक्टेड असते वेगवान आणि लॅटेन्सी कमी असलेल्या ५जी नेटवर्कवर प्रत्येक रुग्णवाहिकेचे जिओ-लोकेशन हॉस्पिटलच्या कमांड सेंटरशी रिले केले जाते. यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णाच्या गोल्डन अवर टाइममध्ये बचत करण्यासाठी सर्वात जवळ असलेली रुग्णवाहिका रुग्णापर्यंत तातडीने पोहोचू शकेल. त्यामुळे ईआरमधील डॉक्टर्स तातडीने निर्णय घेऊ शकतात व रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणले जात असतानाच रुग्णवाहिकेतील पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना रुग्णाला आवश्यक मदत प्रदान करण्याबाबत सल्ला देऊ शकतात. रुग्णवाहिकेमध्ये रुग्णाची जी स्थिती आहे त्याची माहिती डॉक्टरांना तातडीने मिळावी यासाठी कॅमेरा फीड उपलब्ध असल्याने रुग्णवाहिकेत उपस्थित असलेले पॅरामेडिकल कर्मचारी हॉस्पिटलमधील ईआर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाची काळजी घेऊ शकतात आणि गरज असेल तर प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी एव्ही/व्हीआर यासारखे तंत्रज्ञान देखील या रुग्णवाहिकेमध्ये आहे.
अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालिका डॉ संगीता रेड्डी यांनी सांगितले,”अपोलोने मृत्युदर रोखण्यासाठी व रुग्णांना लाभ मिळावेत यासाठी गोल्डन अवरचा उपयोग करण्यासाठी कनेक्टेड रुग्णवाहिकांचा उपयोग करण्यास प्रोत्साहन दिले आहे. संशोधनातून असे देखील संकेत मिळाले आहेत की, रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचे व्यवस्थापन हा देखील एक व्यवस्थापन उद्देश बनला पाहिजे. या सर्व माहितीमुळे आम्हाला ५जी कनेक्टेड रुग्णवाहिका प्रकल्पासाठी एअरटेलसोबत सहयोग करण्याची व ५जी मधून प्रदान केल्या जाणाऱ्या विना-अडथळा,लॅग-फ्री कनेक्टिव्हिटीचा उपयोग करण्यासाठी प्रेरित झालो.”
भारती एअरटेलचे एअरटेल बिझनेसचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय चितकारा यांनी सांगितले, “५जी एक परिवर्तनकारी तंत्रज्ञान आहे. मानवतेच्या कल्याणासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या क्षमतांचा वापर करण्यासाठी समन्वयातून कशाप्रकारे काम करता येऊ शकते हे एअरटेलने पुन्हा एकदा याठिकाणी दाखवून दिले आहे. आरोग्यसेवा ५जीसाठी एक सर्वात आशादायी युज केस आहे. भारतीय बाजारपेठांसाठी अनुकूल, अभिनव युज केसेस आणण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स आणि सिस्कोसोबत ही भागीदारी दृढ करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.” पृसीधी पृञकात नमुद केले आहे. शेवट जीनआई
Be the first to comment on "एअरटेल-सिस्कोच्या भागीदारीने अपोलोची ‘५जी कनेक्टेड रुग्णवाहिका’ “गोल्डन अवर” च्या प्रसंगी तत्पर आरोग्यसेवा आणि रुग्णांचे प्राण वाचावे यासाठी ५जी कनेक्टेड रुग्णवाहिका उपलब्ध"