मुंबई, ७ फेब्रुवारी २०२२ (GNI): फेब्रुवारी हा महिना म्हणजे स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना चिरकाल संस्मरणीय राहणाऱ्या आणि तुमच्या प्रेमाचे प्रतिक असणाऱ्या भेटवस्तू बहाल करण्याचा मोसम. ‘व्हॅलेंटाईन्स डे’ जोमाने साजरा करण्यासाठी भारतातील आघाडीच्या ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सतर्फे दागिन्यांचे एक खास कलेक्शन सादर करण्यात येत आहे. आपल्या सहचर्यातील अनोखेपणा अधोरेखित करणारे अतिशय खास असे दागिने आपल्या प्रियव्यक्तीला भेट देण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी हे कलेक्शन आहे. या अनोख्या कलेक्शनमध्ये मौल्यवान खडे आणि हिऱ्यांनी मढविलेले पेंडंट्स, अंगठ्या, कर्णभूषणे आणि अन्य कितीतरी वजनाने हलके असणारे सोन्याचे दागिने समविष्ट करण्यात आले आहेत. रोझ गोल्ड प्रकारामध्ये घडविण्यात आलेल्या नितांतसुंदर अशा खास दागिन्यांचा देखील या कलेक्शनमध्ये समावेश आहे.
कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री.रमेश कल्याणरामन म्हणाले, “व्हॅलेंटाईन्स डे साठी खास तयार केलेले आमचे एकदम नवीन कलेक्शन हे परवडण्याजोग्या किंमतीत, वजनाने हलके, शैलीदार आणि विविध प्रकारच्या डिझाईन्सने परिपूर्ण असे प्रसंगाला साजेसे आहे. हे कलेक्शन आकर्षक असून ब्रँडशी संबंधित उच्च दर्जाला अनुरूप आहे.” कल्याण ज्वेलर्सच्या ‘वुई केअर’ या कोरोना मार्गदर्शक प्रणालीचा एक भाग म्हणून कंपनीने ग्राहक आणि आपले कर्मचारी या दोघांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आपल्या सर्व दालनांमध्ये अत्युच्च पातळीवरील सुरक्षा आणि खबरदारी उपायांची अंमलबजावणी केली आहे. सुरक्षाविषयक उपायांची कडक अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्यासाठी कंपनीने ‘सेफ्टी मेजर अधिकारी’ही नियुक्त केला आहे.
कल्याण ज्वेलर्स त्यांच्या पोर्टफोलिओ मधून एक लाखाहून अधिक समकालीन आणि पारंपरिक डिझाईन उपलब्ध करून देणार असून दररोज तसेच विवाह प्रसंगी आणि सणासुदीच्या काळात निवड करता येऊ शकेल. भारत आणि मध्यपूर्वेतील १५१ दालनांमधून ते निवडता येतील. ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांवर कल्याणच्या नव्या ४-लेव्हल अॅश्युएरन्स सर्टिफिकेटचे फायदे मिळविणेही शक्य होणार आहे. कल्याण ज्वेलर्समध्ये मिळणाऱ्या दागिन्यांनी शुद्धतेच्या अनेक कसोट्या पार केलेल्या असल्या आणि सगळ्या बीआयएस हॉलमार्क चाचण्या दिलेल्या असल्या तरी ४-लेव्हल अॅश्युएरन्स सर्टिफिकेटमुळे ग्राहकांना पुन्हा विक्रीसाठी आणताना किंवा दागिना बदलून घेताना इनव्हॉईस मध्ये लिहिल्याप्रमाणे शुद्धतेनुसार मूल्य परतावा मिळेल याची शाश्वती राहील. जोडीलाच देशातील कल्याण ज्वेलर्सच्या कोणत्याही दालनामध्ये कधीही दागिन्यांचा नी:शुल्क मेंटेनन्स करण्याची खात्री मिळेल.
कल्याण ज्वेलर्सने त्यांच्या दागिने खरेदीवर तत्काळ बचतीची नोंद करण्यासाठी नव्या स्लॅश्ड बोर्डरेट- द लोएस्ट इन द मार्केटची (बाजारपेठेतील सर्वात कमी दर) घोषणा केली. कंपनीने त्यांच्या विस्तृत दागिन्यांच्या मालिकेवर इतर अनेक आकर्षक योजना आणि मोठ्या सवलतींची घोषणा केली. त्यामध्ये हिऱ्यांच्या दागिन्यावर २५% पर्यंत सवलत आणि अनकट मौल्यवान खड्यांच्या दागिन्यावर २०%पर्यंत सवलत यांचा समावेश आहे. या सर्व योजना आणि सवलती कल्याण ज्वेलर्सच्या भारतभरातील सर्व दालनांमध्ये ३१ मार्च २०२२ पर्यंत सुरु राहतील.ends
Be the first to comment on "‘व्हॅलेंटाईन्स डे’ साठी कल्याणची लिमिटेड एडिशन ज्वेलरी सादर ‘कल्याण’च्या विस्तृत दागिन्यांच्या श्रेणींवर आकर्षक योजना आणि मोठ्या सवलतींची घोषणा"