मुंबईतील २ लाख आर्थिक-दुर्बल घटकांची मोफत कर्करोग चाचणी करणार, ‘सर एच एन रिलायन्स – कारकीनॉस’ चा संयुक्त उपक्रम

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२२ (GNI): सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पीटलने दिनांक ४ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने मुंबईत आर्थिक-दुर्बल घटकांमध्ये कर्करोगाचे लवकर निदान करण्याच्या उद्देशाने कारकीनॉस हेल्थकेअर बरोबर भागीदारी करण्याचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. समाजापर्यंत पोहोचण्याच्या या उपक्रमात मुंबई आणि परिसरात तब्बल २,००,००० लोकांची कर्करोग चाचणी घेण्यात येणार असून जोडीला कर्करोग निगा यंत्रणा व्यवस्थाही असणार आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत वंचित समाज घटकांना तपासणी सेवा मोफत पुरविण्यात येणार आहे. कारकीनॉस हेल्थकेअरचा हा उपक्रम आहे. कारकीनॉस हेल्थकेअर ही संस्था म्हणजे एंड-टू-एंड तंत्रज्ञान प्रणीत ओन्कोलोजी केंद्रित आरोग्यनिगा सेवा सुविधा व्यासपीठ असून परवडत नाही म्हणून किंवा माहितीच नाही म्हणून कुणीही उपचारांशिवाय राहू नये अशी त्यांची भावना आहे. प्राथमिक आरोग्य सेवा व्यवस्थेतून कर्करोग सेवांच्या सुधारित एकात्मिकरणाची ग्वाही कारकीनॉसची तंत्रज्ञान प्रणाली देते.

आयुष्य वाचवू शकणाऱ्या कर्करोग तपासणी सुविधांचा खर्च मोठा असतो. महाग चाचण्या आणि जागृतीचा अभाव यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील लोकांना या सुविधांची सर्वाधिक गरज असते. या उपक्रमाद्वारे कर्करोग तपासणी सुविधा पुरविण्यात येतील. कोणतीही चिन्हं किंवा लक्षणं दिसण्याआधी काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांचे निदान व्हायला या चाचण्यांची मदत होते. कर्करोगामुळे जाणारे जीव वाचविणे आणि लवकर निदान करून एकूणच कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंना रोखणे हे कर्करोग तपासणीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. मुंबई आणि उपनगरांत हा उपक्रम राबविण्यात येणार असून नंतर देशभरात सगळीकडे त्याचा विस्तार करायची योजना आहे.  

श्री.आर.वेंकटरामनन, संस्थापक – मुख्य कार्यकारी अधिकारी, कारकीनॉस हेल्थकेअर म्हणाले, “सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पीटलकडून आमच्या उपक्रमाला मिळालेल्या पाठबळामुळे कारकीनॉसमध्ये आम्ही सर्वजण खूपच उल्हासित झालो आहोत. जीवन वाचवू शकणाऱ्या सुविधा कदाचित ज्या समाजापर्यंत सहजी पोहोचू शकत नाहीत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची आमच्या कार्यक्रमाची ही केवळ सुरुवात आहे. कर्करोगाचे लवकर निदान करून अमुल्य जीव वाचविण्याचे प्रयत्न करण्यासाठी भविष्यात देशभरात सगळीकडे आमच्या सेवा विस्तारण्याची आम्हांला आशा आहे. या महत्वपूर्ण उपक्रमाचा एक भाग होता येणं हे खरोखरच खूप आल्हाददायक आहे.”

डॉ.तरंग ग्यानचंदानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पीटल म्हणाले, “लोकांचे आयुष्य वाचविणे यासाठी समर्पित डॉक्टर या नात्याने योग्य सुविधांचा अभाव आणि वेळेवर निदान चाचणी न होणे यामुळे लोकांना जेव्हा स्वतःचा जीव गमवावा लागतो तेव्हा मला खरोखर खूप दु:ख होते. त्यामुळेच सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पीटलने कारकीनॉस हेल्थकेअर बरोबर भागीदारी केली आहे. या सुयोग्य भागीदारीतून या उपक्रमाला मदत करण्यासाठी आमच्याकडील अद्ययावत सुविधा आणि जीववाचाविण्याप्रती असलेली आमची बांधिलकी आणि कारकीनॉसचा तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आणि कमांड सेंटर मधून रुग्णांना सीमलेस अनुभव मिळायला मदत होईल.”ends

Be the first to comment on "मुंबईतील २ लाख आर्थिक-दुर्बल घटकांची मोफत कर्करोग चाचणी करणार, ‘सर एच एन रिलायन्स – कारकीनॉस’ चा संयुक्त उपक्रम"

Leave a comment

Your email address will not be published.


*