कर्करोग रुग्णांच्या आरोग्यासाठी, दिग्गज उद्योजक रतन टाटा आणि वेणू श्रीनिवासनचा स्टार्टअपला पाठींबा ‘एंडीया पार्टनर्स’ ची ‘कारकीनॉस हेल्थकेअर’ मध्ये गुंतवणूक

मुंबई, १६ जानेवारी २०२२: आँकोलॉजीवर भर असलेले व्यवस्थापित आरोग्यसुरक्षा व्यासपीठ कारकीनॉस हेल्थकेअरने तंत्रज्ञान, आरोग्यसुरक्षा आणि जैवविज्ञान क्षेत्रातील भारतातील सर्वात आघाडीच्या व्हीसी फंड्सपैकी एक असलेल्या एंडीया पार्टनर्सकडून अनामिक रकमेचा निधी उभा केला आहे. या स्टार्टअपला सध्या टाटा ग्रुप, रिलायन्स डिजिटल हेल्थ आणि राकुतेन मेडिकल यांचे पाठबळ असून त्याजोडीला रतन टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांसारख्या कित्येक दिग्गज उद्योजकांचाही पाठींबा आहे.

कारकीनॉस हेल्थकेअरने भारतात डिस्ट्रिब्युटेड कॅन्सर केअर नेटवर्क प्रारूपाची सुरुवात केली आहे. कर्करोगाच्या रुग्णांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा देत त्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्याचे काम याद्वारे होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, दर दहा भारतीयांमध्ये एकाला आयुष्यात कर्करोग होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतातील ७०% हून अधिक जणांमध्ये कर्करोगाच्या विकाराचे निदान उशीरा होते आणि त्यामुळे रुग्णांची तब्बेत लवकर खालावते आणि त्यातून वाचण्याचे प्रमाण कमी होते. अत्यंत अनुभवी टीमने स्थापना केलेल्या कारकीनॉस हेल्थकेअरच्या कार्याची सुरुवात केरळ मध्ये झाली आणि तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल मध्ये कार्यविस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कर्करोगासाठी रेणुकीय चाचण्या आणि इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री चाचण्या यांचा समावेश असलेल्या जागतिक दर्जाच्या निदान सेवा पुरविण्यासाठी कंपनीने कोची मध्ये सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड कॅन्सर डायग्नॉस्टीक्स केंद्रही उभारले आहे. कंपनीने आँकोलॉजी निगा आणि उपचार यांमध्ये सर्वोत्तम सेवा देण्यासाठी युनायटेड किंग्डमच्या गाईज अँड सेंट थॉमस एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट बरोबर भागीदारी केली आहे.

आर. वेंकटरामनन, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, कारकीनॉस हेल्थकेअर म्हणाले, “एंडीया पार्टनर्स हे डिजिटल हेल्थ क्षेत्रामधील प्रमुख गुंतवणुकदार राहिले आहेत. रेडीऑलॉजी मधील कृत्रिम बुद्धिमत्ता, पॅथोलॉजी मधील एआय, दुर्लभ आजारांवर पेशी उपचारपद्धती तसेच तंत्रज्ञान प्रणीत- मधुमेह व्यवस्थापन इत्यादी सारख्या आरोग्य तंत्रज्ञान सबंधित विविध उपविभागांमध्ये त्यांनी सुरुवातीपासून गुंतवणूक केली आहे. कारकीनॉस मधील त्यांची गुंतवणूक हे आमच्या व्यापक कर्करोग सेवा उपचार नेटवर्क उभारणीच्या प्रयत्नांना मिळालेली प्रबळ मान्यता आहे आणि कर्करोगाच्या विरोधातील आमच्या लढ्यात त्यांची सोबत मिळाल्यामुळे आम्ही अत्यंत भारावून गेलो आहोत. कर्करोगावरील उपचार आणि निगा ही आजही सर्वाधिक अवघड गोष्ट आहे आणि याचा देशभर विस्तार करून कार्य करण्यावर आमचा भर आहे.”

डॉ.रमेश बायरापेनेनी, व्यवस्थापकीय संचालक, एंडीया पार्टनर्स यांनी मत मांडले, “जास्तीत जास्त रुग्णांना व्यवस्थित वेळेवर निदान आणि उपचार मिळवून देण्यासाठी मदत करणारे कर्करोग निगा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्टार्टअप ही आज भारताची गरज बनली आहे. आम्हांला असे ठामपणे वाटते की कारकीनॉस आपल्या समग्र तंत्रज्ञान प्रणीत सुविधा आणि व्यापक जाळ्याच्या माध्यमातून कर्करोग निगा उपचार परिसंस्थेत गरजेचा असलेला बदल घडवून आणेल. आम्ही एंडीया पार्टनर्स मनापासून कारकीनॉसच्या बाजूने उभे असून या कार्याचा भाग होण्याचा आम्हांला आनंद आहे,”ends

Be the first to comment on "कर्करोग रुग्णांच्या आरोग्यासाठी, दिग्गज उद्योजक रतन टाटा आणि वेणू श्रीनिवासनचा स्टार्टअपला पाठींबा ‘एंडीया पार्टनर्स’ ची ‘कारकीनॉस हेल्थकेअर’ मध्ये गुंतवणूक"

Leave a comment

Your email address will not be published.


*