‘एज्युकेशन फॉर ऑल’ साठी ‘बायजूज – अक्षय पात्र’ भागीदार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २ लाख मुलांना निःशुल्क डिजिटल शिक्षणाद्वारे प्रोत्साहन देणार

मुंबई, १९ जानेवारी २०२२ (GNI): जगातील आघाडीची शिक्षण तंत्रज्ञान कंपनी बायजूजने द-अक्षय पात्र फाऊंडेशनसोबत भागीदारी केली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि गरीब कुटुंबांतील मुलांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव निर्माण केला जावा यासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांना अधिकाधिक बळ पुरवले जावे हा या भागीदारीचा उद्देश आहे. ‘एज्युकेशन फॉर ऑल’ अर्थात ‘शिक्षण सर्वांसाठी’ या बायजूजच्या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरु करण्यात आलेल्या या सहयोगातून देशभरातील विविध राज्यांमधील जवळपास २ लाख वंचित आणि आर्थिक-दुर्बल विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडपणे सुरु राहावे यासाठी प्रयन्त आहेत. देशाच्या दुर्गम भागांमधील विद्यार्थ्यांचा देखील या उपक्रमात समावेश केला आहे.

डिजिटल शिक्षण उपक्रम हा अक्षय पात्रचा नॅशनल एन्डेव्हर फॉर स्टुडंट ट्रान्सफॉर्मशनचा एक भाग आहे. सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून शिक्षणाच्या गुणवत्तेला पूरक ठरेल अशा पद्धतीने शिक्षण व्यवस्थेला सामावून घेणे हा यामागचा उद्देश आहे. द-अक्षय पात्र फाऊंडेशन सोबतच्या भागीदारीतून बायजूज विद्यार्थ्यांना फ्री स्ट्रीमिंग लायसेन्सेस व स्मार्ट क्लासरूम्स पुरवून उच्च दर्जाचे आणि तंत्रज्ञानाच्या आधारे चालवले जाणारे शिक्षण उपलब्ध करवून देईल. जागतिक दर्जाचा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि व्यावसायिक पातळीवर खास निवडण्यात आलेला कन्टेन्ट यांच्यापर्यंत उपलब्ध करवून देऊन संवादात्मक व नाविन्यपूर्ण शिक्षण देऊन सरकारी आणि अनुदानप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे याची सुरुवात म्हणून ‘बायजूज-अक्षय पात्र’ यांनी आर्थिक-दुर्बल वर्गांतील मुलांसाठी निःशुल्क शैक्षणिक कार्यक्रम सुरु केला आहे. 

श्रीधर वेंकट, सीईओ, द-अक्षय पात्र फाऊंडेशन यांनी सांगितले, “एकाही मुलाला भुकेमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो त्याला मिळावा हा आमचा उद्देश आहे. बायजूजसोबत आमची भागीदारी हा डिजिटल भेदाभेद दूर करण्याचा आणि मुलांना उत्तम दर्जाचे, आधुनिक शिक्षण निःशुल्क पुरवून डिजिटल समावेशाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी पुढे सांगितले, “सरकारी आणि अनुदानप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सरकार आपल्या परीने लक्षणीय प्रयत्न करत आहे. सरकारच्या या प्रयत्नांमध्ये सक्रिय योगदान देण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.”

श्रीमती दिव्या गोकुलनाथ, सह-संस्थापिका, बायजूजयांनी सांगितले, “समाजाच्या विविध वर्गातील मुलांच्या उत्कर्षासाठी आणि दर्जेदार शिक्षण व डिजिटल उपलब्धता यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुधारणात्मक सामाजिक उपक्रम चालवणे हे बायजूजने आपले प्रमुख उद्धिष्ट मानले आहे. भारतातील शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या भोजन कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अथक प्रयत्नशील असलेल्या अक्षय पात्र फाऊंडेशनसोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. शिक्षण आणि कल्याण यांच्या माध्यमातून मुलांच्या विकासावर कायमस्वरूपी सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या दृष्टीने उचलले गेलेले हे प्रमुख पाऊल आहे. आपल्या सध्याच्या शिक्षण इकोसिस्टिमवर सुस्पष्ट व निश्चित प्रभाव आणणे हा आमच्या सिद्धांतांचा आधारस्तंभ आहे. द-अक्षय पात्र फाऊंडेशनसोबत भागीदारी करून आणि ‘एज्युकेशन फॉर ऑल’ या आमच्या सामाजिक प्रभाव उपक्रमाला अधिक बळ प्रदान करून आम्हाला आनंद होत आहे.’’ends

Be the first to comment on "‘एज्युकेशन फॉर ऑल’ साठी ‘बायजूज – अक्षय पात्र’ भागीदार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २ लाख मुलांना निःशुल्क डिजिटल शिक्षणाद्वारे प्रोत्साहन देणार"

Leave a comment

Your email address will not be published.


*