‘शेमारू मराठीबाणा’ अस्सल फिल्मी मनोरंजनाची २ वर्ष महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनमुराद मनोरंजन करणारी वाहिनी ‘शेमारू मराठीबाणा’ ने पूर्ण केले द्वितीय वर्ष

मुंबई, १७ जानेवारी २०२२ (GNI): दर्जेदार कार्यक्रमांसह मनोरंजन क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या, भारतातील आघाडीचे ‘कन्टेन्ट पॉवरहाऊस’ म्हणून नावाजल्या जाणाऱ्या शेमारू एंटरटेन्मेंटची मराठी चित्रपट वाहिनी ‘शेमारू मराठीबाणा’ आपला द्वितीय वर्धापनदिन साजरा करत आहे. दोन वर्षांपूर्वी शेमारूने ‘शेमारू मराठीबाणा’ ही फ्री-टू-एअर प्रादेशिक चित्रपट वाहिनी सुरु करून टेलिव्हिजनच्या क्षेत्रात पदार्पण करून मनोरंजन क्षेत्रातील आपले स्थान अधिक मजबूत केले. दर्जेदार मराठी चित्रपट पाहण्यासाठी हक्काची वाहिनी ही ‘शेमारू मराठीबाणा’ ची ओळख प्रत्येक मराठी घराघरांत अवघ्या दोन वर्षांत निर्माण झाली आहे. मराठी चित्रपट क्षेत्राचा अभिमान आणि लोकप्रियता वृद्धिंगत करण्यात ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनी मोलाचे योगदान देत आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील या वाहिनीने अन्यत्र पाहायला न मिळणारे सिनेमे दाखवून आपल्या प्रेक्षकांची चांगली करमणूक केली. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर्स, महा-मुव्हीज सादर करून शेमारू मराठीबाणाने आपल्या मराठी भाषिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे.

जानेवारी, २०२० मध्ये शेमारू मराठीबाणा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली. मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीने वाहिनीच्या लाँचसाठी ‘वाहिनीचा चेहरा’ म्हणून जबाबदारी सांभाळली. अल्पावधीतच मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या हक्काची अशी शेमारू मराठीबाणाची ओळख महाराष्ट्रातील घराघरांत निर्माण झाली आहे. शेमारू मराठीबाणा वाहिनीकडे अनेक वैविध्यपूर्ण सिनेमांची लायब्ररी असून दर रविवारी एक लोकप्रिय सिनेमा आणि दर महिन्याला एका चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रदर्शित केला जातो. मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी वचनबद्ध असलेली ही वाहिनी आपल्या प्रेक्षकांच्या बदलत्या, वेगवेगळ्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी अनेक वैविध्यपूर्ण व दर्जेदार कार्यक्रम सातत्याने दाखवत असते, यामध्ये भक्तिमय कार्यक्रमांचाही समावेश आहे.

श्री.हिरेन गडा, सीईओ-शेमारू एंटरटेन्मेंट यांनी सांगितले,”शेमारू मराठीबाणाचा द्वितीय वर्धापनदिन साजरा होत आहे, आम्हां सर्वांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे.महामारीच्या अतिशय आव्हानात्मक काळात देखील आम्ही नवनवीन, दर्जेदार आणि मनोरंजक कार्यक्रम, आणि चित्रपट सादर करून आमच्या प्रेक्षकांची करमणूक करू शकलो याचे आम्हाला खूप समाधान आहे.या नवीन वर्षात देखील आम्ही अनेक आशयसंपन्न आणि मनोरंजक कार्यक्रम प्रस्तुत करणार आहोत, जे आमच्या प्रेक्षकांना खूप आवडतील याची आम्हाला खात्री आहे.”

प्रेक्षकांची आवडनिवड पूर्ण करण्याला सर्वाधिक प्राधान्य देणाऱ्या ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर चित्रपट-कार्यक्रमांची भरपूर रेलचेल नेहमीच अनुभवायला मिळते. प्रेमकथा ऍक्शन, विनोदी, भक्तिमय आणि कौटुंबिक नाट्य अशा विविध शैलीतील कार्यक्रम या वाहिनीवर दाखवले जातात.‘बाहुबली’ या तुफान लोकप्रिय चित्रपटाच्या मराठी प्रीमियर मुळे ‘शेमारू मराठीबाणा’ कडे नवा प्रेक्षकवर्ग आकर्षित झाला. हेरा फेरी, गोलमाल, भागम भाग, यासारखे अनेक धम्माल लोकप्रिय हिंदी सिनेमे मराठीत डब करून शेमारू मराठीबाणावर दाखवले गेले आहेत. लहान मुलांसोबतच संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करण्यासाठी वाहिनीने नुकताच ‘गोष्टींचा खजिना’ हा ऍनिमेशन स्लॉट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ज्यात लहान थोरांना आवडतील अशा छान गोष्टी ऍनिमेशन स्वरूपात दाखवल्या जातात.

श्री. संदीप गुप्ता, सीओओ-ब्रॉडकास्टिंग बिझनेस, शेमारू एंटरटेन्मेंट यांनी सांगितले, “शेमारूमधील प्रत्येकासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. मराठी प्रेक्षकांच्या आवडी-निवडींवर भर देत त्यांचे मनोरंजन ही आपली जबाबदारी मानून कार्यरत असणाऱ्या शेमारू मराठीबाणा वाहिनीचे यश हे आमच्या सातत्यापूर्ण प्रयत्नांची पोचपावती आहे. कन्टेन्ट मध्ये सातत्याने सर्जनशीलता आणि नावीन्य आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काही सर्वोत्तम ब्रँड्ससोबत आम्ही काम करत आहोत. त्यामुळे आमचं प्रेक्षकांसोबतचं नातं अधिक दृढ झाले आहे. शेमारू मराठीबाणा वाहिनीने नेहमीच प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सर्जनशील कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत, या दोन्ही गोष्टी एकत्र घडवून येणं दुर्मिळच, आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातील प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकलो आहोत “. Ends

Be the first to comment on "‘शेमारू मराठीबाणा’ अस्सल फिल्मी मनोरंजनाची २ वर्ष महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनमुराद मनोरंजन करणारी वाहिनी ‘शेमारू मराठीबाणा’ ने पूर्ण केले द्वितीय वर्ष"

Leave a comment

Your email address will not be published.


*