१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अपोलोची लसीकरण मोहीम, अपोलोतील व्हॅक्सिनेशन सेंटर्सवर ३ जानेवारी पासून लसीकरणास सुरुवात

नवी मुंबई, ३ जानेवारी २०२२ (जीएनआई): अपोलो रुग्णालय ३ जानेवारी २०२२ पासून देशभरातील अपोलो व्हॅक्सिनेशन सेंटर्सवर १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम सुरु करत आहे. माननीय पंतप्रधानांनी ३ जानेवारी २०२२ पासून कोविड लसीकरण कार्यक्रमामध्ये १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना सहभागी करवून घेतले जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर अपोलो रुग्णालयाने हे पुढचे पाऊल उचलले आहे. लसीकरणासाठी पात्र वयोगटातील मुलांची नोंदणी आणि लसीकरणासाठी वेळेचे स्लॉट्स बुक करण्याची प्रक्रिया अपोलो २४/७ अँपवर सुरु आहे.

मुलांना कोवॅक्सिनची लस दिली जाणार असून ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) मुलांसाठी या लसीचा वापर करण्यास मंजुरी दिलेली आहे. कोवॅक्सिनचे दोन डोस घेणे आवश्यक असून, पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर असायला हवे.अपोलो रुग्णालय हे भारतातील सर्वात मोठे खाजगी लसीकरण प्रदाता आहे. जानेवारी २०२१ मध्ये सरकारने कोविड लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात केल्यापासून त्याला सहयोग प्रदान करण्यात अपोलो रुग्णालय कायम आघाडीवर आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरळीतपणे पार पडावे यासाठी सर्व पायाभूत सोयीसुविधा आणि आवश्यक व्यवस्था अपोलोत सज्ज ठेवलेल्या आहेत.

१५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे लसीकरण सुव्यवस्थित पद्धतीने व्हावे यासाठी अपोलो रुग्णालयाचे विशेष प्रशिक्षित कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याठिकाणी सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. लस लावण्याच्या आधी ओळख तपासणी, कोविन ऍपवर माहितीची पडताळणी, लसीकरणानंतर त्या व्यक्तीला ३० मिनिटे थांबवून, काही त्रास होत नाही याची खात्री करून घेणे आणि काही त्रास होत असल्यास एईएफआय अर्थात लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांवर उपचार यांचा यामध्ये समावेश आहे. लसींच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज चेनची योग्य देखभाल आणि जैव वैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन देखील सुनिश्चित केले जाईल. लसीकरण प्रक्रियेमध्ये सर्व लाभार्थींच्या शरीराच्या तापमानाची तपासणी (ताप नाही ना हे तपासण्यासाठी), प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये योग्य शारीरिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता, सर्वांनी मास्क घालणे अनिवार्य आणि इंजेक्शन लावण्याच्या सुरक्षित पद्धती यांचे पालन केले जाईल याचे नियोजन केले आहे.

Be the first to comment on "१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अपोलोची लसीकरण मोहीम, अपोलोतील व्हॅक्सिनेशन सेंटर्सवर ३ जानेवारी पासून लसीकरणास सुरुवात"

Leave a comment

Your email address will not be published.


*