Mumbai, 23rd December 2021 (GNI): “द काश्मीर फाईल’ या ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांच्या आगामी चित्रपटाच्या “कु’ अॅपवर प्रदर्शित टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आपले घरदार सोडून काश्मीरमधून जीव मुठीत धरून पलायन केलेल्या काश्मीरी पंडितांना अजूनही तिथे परत जाता आलेले नाही. या मागचे नेमकी कथा या चित्रटात आहे.
अनुपम खेर यांनी “द काश्मीर फाईल’ हा चित्रपट त्यांचे वडील पुष्करनाथ यांना अर्पण केला आहे. माझ्याकरीता हा केवळ चित्रपटच नाही. तर गेल्या ३० वर्षांपासून जगापासून लपवून ठेवले आहे. पण, आता हे सत्य जगासमोर येणार आहे, असे अनुपम खेर यांनी “कु’ अॅपवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या चित्रपटात जम्मु काश्मीरचे निवृत्त विभागीय आयुक्त ब्रम्ह भट्ट यांची भूमिका मिथुन चक्रवर्ती यांनी केली आहे. तर प्रोफेसर राधिका मेनन यांची भूमिका पल्लवी जोशी यांनी केली आहे. येत्या २६ जानेवारी २०२२ रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे लेखन विवेक अग्निहोत्री आणि सौरभ एम. पांडे यांचे असून दिग्दर्शन विवेक अग्निहोत्रीचे आहे. या तिघां व्यतिरिक्त या चित्रपटात चिन्मय मंडलेकर, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, प्रकाश बेलवाडी आदींच्या दमदार भूमिका आहे. कू लिंक -https://www.kooapp.com/koo/anupampkher/36398df6-41d1-4f0b-b1f8-04c904e2d798
Be the first to comment on "“द काश्मीर फाईल’च्या टिझरने “कू’वर वाढवली उत्सुकता"