शेमारूमीवर पहायला मिळणार उत्कृष्ट मराठी सिनेमे

Mumbai, 07th Dec., 2021 (GNI): ओटीटीवर इतका भरपूर मराठी कन्टेन्ट उपलब्ध आहे की त्यातून दर्जेदार पाहण्यासारखे काय हे ठरवणे चांगलेच कठीण होऊन बसते.  पण आता तुमचा हा संभ्रम चुटकीसरशी दूर होईल कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, खास निवडलेले, चांगले आयएमडीबी रेटिंग असलेले उत्कृष्ट मराठी चित्रपट, जे पाहिल्यावर तुमचा मौल्यवान वेळ खूप छान कारणी लागल्याचे समाधान तुम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे. 

१)  रझाकार – आयएमडीबी रेटिंग ८.२/१०

Razzakar_FUM_HD_1920x1080

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला, अतिशय भावस्पर्शी असा हा नाट्य चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा आहे.  स्वातंत्र्य चळवळीच्या दिवसांमध्ये घेऊन जाणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन राज दुर्गे यांनी केले असून १९४८ सालच्या हैदराबाद मुक्ती संग्रामाविषयीच्या एका सत्यकथेवर तो आधारित आहे.  एक सर्वसामान्य माणूस ते स्वातंत्र्यसेनानी असा संपूर्ण प्रवास या सिनेमात चित्रित करण्यात आला आहे.  सिद्धार्थ जाधव, ज्योती सुभाष, झाकीर हुसेन, डॉ. शरद भुताडिया, गौतम पाटील आणि पियुशा कोलते यांच्या समर्थ अभिनयाने नटलेला हा सिनेमा आवर्जून पहावा असा आहे.

२)  उंडगा – आयएमडीबी रेटिंग ८/१०

Undga_FUM_HD_1920x1080

या प्रणय, नाट्य सिनेमामध्ये मैत्री आणि नातेसंबंध यांच्यातील उतारचढाव आकर्षकरित्या रंगवण्यात आले आहेत. विक्रांत नंदकुमार वर्दे यांनी दिग्दर्शित केलेली ही कथा आहे विज्या आणि गण्याची.  यातला विज्या अभ्यासू तर गण्या मस्तीखोर आणि सतत काहीतरी गोंधळ घालणारा आहे, हे दोघेही आपापल्या आयुष्याच्या वाटेवर निवांत चालत आहेत. पण जेव्हा मीरा ही सुंदर तरुणी त्यांच्या जगात येते तेव्हा मात्र त्यांच्या या मैत्रीमध्ये चांगलीच खळबळ उडते. संग्राम समेळ, अरुण नलावडे, शर्वरी गायकवाड, शिवानी बावकर, स्वप्नील कणसे आणि चिन्मय संत या कलाकारांनी यामध्ये भूमिका केल्या आहेत.

३)  व्हीआयपी गाढव – आयएमडीबी रेटिंग ७.१/१० 

VIP_Gadhav_1920x1080

तुम्हाला धम्माल, मस्ती करवायला आणि पोट धरून हसवायला येत आहे एक व्हीआयपी गाढव. एका लहानश्या गावातील एक जखमी गाढव स्थानिक राजकारणाचे अतरंगी रंग अशा काही अनोख्या तऱ्हेने दाखवते की हसून हसून पुरेवाट होते.  या विनोदी नाट्य चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत संजय पाटील आणि भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विजय पाटकर अशा नामी आणि अतिशय लोकप्रिय कलाकारांनी आपल्या अभिनयाने हा सिनेमा रंगतदार केला आहे.   

४) त्या रात्री पाऊस होता – आयएमडीबी रेटिंग ७.१/१०

Tya_Ratri_Paus_Hota_MFUM_HD_1920x1080

गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘त्या रात्री पाऊस होता’ हा एक अतिशय धीट थरार नाट्यपट आहे.  सुबोध भावे, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि सयाजी शिंदे या दिग्गज कलाकारांच्या अभिनयामुळे सिनेमाला आगळीवेगळी उंची लाभली आहे. एकमेकांपासून ताटातूट झालेली दोन भावंडे कित्येक वर्षांनी भेटतात ती एका अतिशय दुःखद परिस्थितीत, बालपणीच्या सुखद दिवसांच्या आठवणींना उजाळा देत असतानाच आपल्या आईवडिलांविषयीचे भयानक सत्य उलगडत जाते, असा हा सिनेमा अलगदपणे आपल्या मनाचा ठाव घेतो.ends

Be the first to comment on "शेमारूमीवर पहायला मिळणार उत्कृष्ट मराठी सिनेमे"

Leave a comment

Your email address will not be published.


*