मुंबई, २ डिसेंबर २०२१ (ZGNI): एन्करेज सोशल एंटरप्रायझेस फाऊंडेशन, या टाटा केमिकल्सची उपसंस्था आणि टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रूरल डेव्हलपमेंट (टीसीएसआरडी) कडून आर्थिक साहाय्य पुरवल्या जाणाऱ्या संस्थेकडून देशाच्या दुर्गम भागांमध्ये शुद्ध व सुरक्षित पेयजलाच्या उपलब्धतेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आजवर एन्करेजने २६० ‘टाटा स्वच्छ टेक जल’ पाणी शुद्धीकरण युनिट्स बसवली आहेत. संघटित स्वरूपात आणि स्थानिक स्तरावर संपूर्ण समुदायाच्या वापरासाठी असलेले प्युरिफायर्स बसवण्यासाठी फाऊंडेशनने भागीदार संघटनांसोबत सहयोगाच्या माध्यमातून काम केले असून भारतातील २० राज्यांमधील जवळपास १८००० कुटुंबांना आता यांचे लाभ मिळत आहेत.
टाटा केमिकल्सचे एचआर आणि सीएसआर – चीफ श्री. आर. नंदा यांनी सांगितले, “टाटा केमिकल्समध्ये आम्ही नेहमी अशा उपक्रमांना समर्थन देतो ज्यामध्ये समाजाच्या उत्कर्षासाठी काम केले जाते. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची कमतरता ही समस्या अनेक ठिकाणी भेडसावत असते, खासकरून भारतातील दुर्गम ठिकाणी ही समस्या जास्त तीव्र आहे. आम्हाला आशा वाटते की, या प्रकल्पामुळे देशाच्या दुर्गम भागातील वंचित कुटुंबांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होईल आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या भयानक आजारांचा प्रसार रोखला जाईल. या कार्यात ज्यांचे लक्षणीय योगदान लाभले आहे अशा आमच्या भागीदारांचे आम्ही आभारी आहोत, त्यांच्यामुळे आज अनेक लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव घडून आला आहे. समाजाच्या कल्याणासाठी असे प्रकल्प राबवत राहण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”
२०१८ मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाल्यापासून एन्करेज लक्षणीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे, त्यासाठी दूषित पाण्यामुळे होणारे आजार रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्याबरोबरीनेच स्थानिकांसाठी रोजगार संधी निर्माण करण्यासाठी देखील ही संस्था प्रयत्नशील आहे. काही युनिट्समध्ये पाणी काढण्यासाठी आणि ते जवळपासच्या भागांना/गावांना विकण्यासाठी एक व्यक्ती नियुक्त केली जाते, अशाप्रकारे त्या व्यक्तीला पुरेसा रोजगार कमवता येतो आणि स्थानिक उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिले जाते.
आजवर एन्करेज सोशल एंटरप्राइज फाऊंडेशनने हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी देशभरातील अनेक विविध संघटना, स्वयंसेवी संस्था आणि कंपन्यांसोबत काम केले आहे. नुकतेच त्यांनी सुंदरबंद क्षेत्रात ‘टाटा स्वच्छ टेक जल’ वॉटर प्युरिफायर बसवला आहे, जेणेकरून दर तासाला १००० लिटर पाणी शुद्ध करून जवळपास २००० कुटुंबांना पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवता येईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात आणखी १०० प्युरिफायर्स बसवण्याची त्यांची योजना आहे. Ends
Be the first to comment on "एन्करेजचे २० राज्यांत ‘टाटा स्वच्छ टेक जल’ २० राज्यांमधील १८००० कुटुंबांना लाभ, आतापर्यंत २६० जल शुद्धीकरण युनिट्स कार्यांवित"