जागतिक मधुमेह दिन -१४ नोव्हेंबर २०२१ मुंबई महानगरपालिकेच्या स्वछतादूतांच्या हस्ते घाटकोपरमध्ये डायबिटीस क्लीनिकचे उद्घाटन

मुंबई, 14th Nov. 2021 (GNI): मधुमेह हा चोरपावलांनी आपल्या शरीरात कधी प्रवेश करतो ते कळत नाही व कालांतराने हा आजार पक्षाघात,अंधत्व, वंध्यत्व हृदयविकार व किडनी विकार यासारखे गंभीर आजार आपल्या शरीरात निर्माण करतो. मधुमेह हा आजार गंभीरपणे घेण्याची गरज असून १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो व यादिवशी अनेक जनजागृती उपक्रम सुरु केले जातात. याच दिनाचे औचित्य साधून घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डायबिटीस क्लीनिकची सुरुवात केली आहे. या डायबिटीस क्लीनिकचे औपचारिक उद्घाटन घाटकोपर एन वार्ड इथे स्वछता विभागात काम करणाऱ्या काम करणाऱ्या पुरुष व महिला स्वच्छतादूतांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ४० स्वच्छतादूतांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली.सीबीसी, रक्त शर्करा तसेच क्रियाटिनची मात्रा तपासणी व तज्ञ डॉक्टरांतर्फे वैद्यकीय व आहारविषयक सल्ला देण्यात आला. यावेळी मुंबई महानगर पालिकेतील एन विभागातील सहायक अभियंता घनकचरा व्यवस्थापन विभागाचे इरफान काझी, दुय्यम अभियंता सूर्यकांत सातपुते, कनिष्ट अवेक्षक स्वप्नील सारंग उपस्थित होते. तसेच एन विभागाचे साह्यायक आयुक्त संजय सोनावणे तसेच झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापन अधिकारी डॉ. शिवाजी दुबे याचे मोलाचे मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले. याविषयी अधिक माहिती देताना झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे बिझनेस हेड आशिष शर्मा म्हणाले, ” मधुमेह नियंत्रणात आणावयाचा असेल तर शरीरातील साखरेचे प्रमाण हे नियमित तपासणे गरजेचे आहे, अनेकांना तर पहिली ४ ते ५ वर्षे मधुमेह आहे याविषयी माहितीच नसते व काही वर्षात शरीरात अनेक समस्या निर्माण होतात ,म्हणूच आम्ही झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डायबिटीस क्लीनिकची सुरुवात केली आहे, या क्लीनिकमध्ये मधुमेह तज्ज्ञ, डोळ्यांचे डॉक्टर, आहारतज्ज्ञ तसेच किडीनीविकार तज्ञ अशी एक मजबूत वैद्यकीय टीम तयार केली असून मधुमेह विरोधाच्या लढाईत आम्ही सहभागी झालो आहोत. या लढाईत जनतेला अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या विभागासोबत आम्ही काम करणार आहोत म्हणजेच मुंबई पोलीस, महानगरपालिका, बेस्ट तसेच एसटी सेवा देणाऱ्या नागरिकांची आम्ही नियमित मधुमेह तपासणी व पुढील वैद्यकीय मार्गदर्शन करणार आहोत व याचाच भाग म्हणजे आम्ही घाटकोपर विभागता काम करणाऱ्या स्वच्छतादूतांची मोफत आरोग्य तपासणी केली आहे.”
कोरोना महामारीत मुंबई महानगर पालिकेच्या घनकचरा विभागात काम करणाऱ्या सर्वच कामगारांनी महत्वाची भूमिका निभावली होती व त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागातील कर्मचाऱ्यांचा झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे बिझनेस हेड आशिष शर्मा यांच्या हस्ते जागतिक मधुमेह दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.ends

Be the first to comment on "जागतिक मधुमेह दिन -१४ नोव्हेंबर २०२१ मुंबई महानगरपालिकेच्या स्वछतादूतांच्या हस्ते घाटकोपरमध्ये डायबिटीस क्लीनिकचे उद्घाटन"

Leave a comment

Your email address will not be published.


*