मुंबई, २३ ऑक्टोबर २०२१ (GNI): एआय तंत्रज्ञानाने चालणाऱ्या ब्रँड-टॅग्ड, युजर्सनी तयार केलेल्या कन्टेन्टचा उपयोग करत आपल्या युजर्सना खरेदीसाठी सक्षम बनवणारा, भारतातील सर्वात विश्वसनीय सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म वूवली सीरिज-अ फंडिंगमध्ये १०० लाख डॉलर्स उभारण्यासाठी गुंतवणूकदारांसोबत बातचीत करत आहे. वूवलीने ३६ लाख डॉलर्सची गुंतवणूक आधीच मिळवली असून यामध्ये अँटहिल व्हेंचर्स, विनर्स, सना व्हेंचर्स, एसओएसव्ही आणि ड्युएन पार्क यांनी केलेल्या गुंतवणुकीचा समावेश आहे. वेंकट जे, नेहा सुयाल आणि हितेंद्र आर यांनी २०१९ मध्ये ‘वूवली’ची सुरुवात केली, वेगवेगळ्या प्रकारच्या लाइफस्टाइल उत्पादनांसाठी विश्वसनीय प्रस्ताव मिळवण्यासाठी भारतीय मिलेनियल्सची सर्वात आवडीची ई-शॉपिग साईट अशी वूवलीची ओळख आहे.
फंड उभारणीबाबत वूवलीचे सीईओ आणि सह-संस्थापक श्री. वेंकट जे. यांनी सांगितले, “सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरु झाल्यापासूनच आमच्या समुदायाने दरवर्षी ४००% वृद्धी नोंदवली आहे. त्यामुळे आमच्या कॉमर्स लॉन्चनंतर सहा महिन्यांच्या आतच आम्ही २० लाख डॉलर्सचा एआरआर (अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न) मिळवला आणि हा दर महिन्याला आधीच्या महिन्याच्या तुलनेत ३०% नी वाढत आहे. सध्याच्या काळात शॉर्ट-फॉर्म क्रिएटर्ससमोरील सर्वात मोठे आव्हान आहे पैसे कमवणे आणि अजून ५०० लाख शॉर्ट-फॉर्म कन्टेन्ट क्रिएटर्सना पैसे कमावण्यात सक्षम बनवणे हे आमचे लक्ष्य आहे.”
वूवलीच्या सोशल मीडिया वैशिष्ट्यांचा लाभ घेत युजर्स ब्रँडेड उत्पादनांचे शॉर्ट व्हिडिओ कंटेन्ट्स आणि व्हिज्युअल्स आपल्या प्रतिक्रिया व प्रस्तावांसह अपलोड करू शकतात, याचा उपयोग करून इतर युजर्स त्या प्लॅटफॉर्मवर उत्पादने शोधू शकतात आणि त्यांची खरेदी करू शकतात. अशाप्रकारे या प्लॅटफॉर्मला अस्सल मौखिक मार्केटिंगचे वैशिष्ट्य मिळते. ऍपच्या बिल्ट-इन ई-कॉमर्स व्यावहारिकतेचा लाभ घेत युजर्स थेट वूवलीच्या अधिकृत ऑनलाईन ब्रँड स्टोर्समधून उत्पादने खरेदी करू शकतात. वूवलीने लाइफस्टाइल उत्पादनांच्या श्रेणीमध्ये अनेक वेगवेगळ्या डी२सी म्हणजे थेट ग्राहकांना उत्पादने विकणाऱ्या कंपन्यांसोबत सहयोग केला आहे, यामध्ये देशांतर्गत ब्रँड्सबरोबरीनेच अनेक जागतिक लोकप्रिय ब्रँड्स देखील आहेत. वूवलीचे अनोखे उत्पादन डिझाईन ब्रँड्ससाठी एक मूल्य-प्रस्ताव आहे कारण यामध्ये त्यांना ओम्नीचॅनेल मिळते ज्याच्या मदतीने ते आपल्या इच्छित ग्राहकांपर्यंत ऑनलाईन पोचू शकतात. ही अनोखी उत्पादन वैशिष्ट्ये युजर्सच्या खरेदीच्या निर्णयांवर सकारात्मक प्रभाव पाडतात.
आपल्या प्लॅटफॉर्मवरील इन्फ्ल्यूएंसर्सचे मजबूत नेटवर्क हे वूवलीचे आणखी एक लक्षणीय व आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. वूवलीच्या सीटीओ व सीओओ श्रीमती नेहा सुयाल यांनी सांगितले, “सोशल कॉमर्स विश्वासावर चालतो आणि वूवलीमध्ये आम्ही मायक्रो व नॅनो इन्फ्ल्यूएंसर्समार्फत संचालित, युजर्सनी बनवलेल्या कंटेंटमार्फत ब्रँड्स व उत्पादनांवर विश्वास निर्माण करतो. या प्लॅटफॉर्मवर १८००० पेक्षा जास्त मायक्रो इन्फ्ल्यूएंसर्स आणि कन्टेन्ट क्रिएटर्स आधीपासूनच कार्यरत असून ते ब्रँड्स, उत्पादने आणि त्यांच्या अनुभवांसंदर्भात कन्टेन्ट चालवून कमाई करत आहेत.”ends
Be the first to comment on "‘वूवली’ सोशल कॉमर्स उद्योग फंडिंगमध्ये उभारणार १०० लाख डॉलर्स, ३६ लाख डॉलर्सची गुंतवणूक आधीच उभारली गेली असून त्यामध्ये प्री-सीरिज फंडिंगचा समावेश आहे"