नवी मुंबई, १३ मे २०२१ (GNI): आंतरराष्ट्रीय नर्सेस दिनाचे (१२ मे परिचारिका दिन) औचित्य साधून इम्पॅक्ट गुरु फाऊंडेशन या आरोग्यसेवा किफायतशीर व सहजपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरु करण्यात आलेल्या विना नफा तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या संस्थेने अपोलो हॉस्पिटल्सच्या सहयोगाने ‘कोविड वॉरियर अप-स्किलिंग प्रोग्राम – ‘एंजेल’ #ThankANurse’. आजपासून सुरु केला आहे. “एंजेल” म्हणजे ऍडव्हान्स नर्सेस ग्रोथ एक्सेलेन्स अँड लर्निंग. या उपक्रमामध्ये अपोलो हॉस्पिटल्स संस्थापक मंडळातील प्रमुख सदस्य व प्रमुख दाता आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्ट इंडिया, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसीआय), एमिटी युनिव्हर्सिटी, आयसीएफएआय युनिव्हर्सिटी, इंडियन नर्सिंग कौन्सिल (आयएनसी), सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि इतर संस्था देखील प्रभाव व ज्ञान भागीदार म्हणून योगदान देणार आहेत. टाटा स्टील फाऊंडेशन, ज्यांनी झारखंड व ओडिशामधील दुर्गम भागांतील युवकांना भारतात सर्वत्र नर्सिंग व्यवसायात आणण्यासाठी खूप मोठे काम केले आहे ते देखील या समूहाच्या कौशल्य विकासासाठी या मंचाचा उपयोग करणार आहेत.
‘कोविड वॉरियर अप-स्किलिंग प्रोग्राम – “एंजेल” #ThankANurse’ हा उपक्रम अशाप्रकारचा एकमेव सामाजिक प्रभाव प्रोजेक्ट म्हणून सुरु करण्यात आला असून, यामध्ये नर्सेसच्या योगदानाचे महत्त्व जाणून, त्याच्या करियर मार्गाची परिभाषा पुन्हा तयार करत तो नव्या स्वरूपात तयार केला जाईल आणि त्यांना क्लिनिकल, व्यवस्थापन, संशोधन आणि नर्सिंग व्यवसायाच्या इतर महत्त्वाच्या पैलूंमध्ये प्रगती करत यश संपादन करण्यासाठी त्यांना सक्षम बनवले जाईल. संपूर्ण प्रोग्राम कालावधीत सुधारित कौशल्य प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रत्येक नर्ससाठी ५०,००० रुपयांपर्यंत गुंतवणुकीच्या वचनबद्धतेसह पुढील काही वर्षात भारतातील १,००,००० नर्सेसच्या कौशल्य विकासाचे विशेष उद्धिष्ट या उपक्रमामध्ये ठरवण्यात आले आहे. अनेक शैक्षणिक संस्था, कौशल्य प्रशिक्षक आणि विना नफा तत्त्वावर काम करणाऱ्या भागीदारांसोबत देशभरातील सर्व नर्सेससाठी निःशुल्क कन्टेन्ट आणि प्रशिक्षण देखील देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोविडशी संबंधित क्लिनिकल, सार्वजनिक आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन या पैलूंवर भर दिला जाईल जेणेकरून नर्सेसना अधिक जास्त रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सक्षम बनवले जाईल. दुसऱ्या टप्प्यात नर्सिंग कम्युनिटीच्या व्यापक प्रशिक्षण आणि कौशल्य विकासावर भर दिला जाईल जेणेकरून त्या वाढत्या आणि बदलत्या आरोग्यसेवा गरजा पूर्ण करू शकतील, यामध्ये सहा महत्त्वाचे पैलू असतील – क्लिनिकल प्रॅक्टिस, लीडरशिप ट्रेनिंग, मेडटेक, संशोधन, आंतरराष्ट्रीय नर्सिंग मॉडेल्स आणि नर्स प्रॅक्टिशनर. या उपक्रमावर एका मोठ्या प्रशासन संरचनेचे नियंत्रण असणार आहे. यामध्ये विशेष गव्हर्नन्स बोर्ड आणि तंत्रज्ञान अंमलबजावणी, शैक्षणिक उत्कृष्टता, कौशल्य विकास यासाठी स्वतंत्र सुकाणू समिती असेल. त्याशिवाय यामध्ये नर्सिंग ऍडव्हायजरी बोर्ड असेल ज्यामध्ये कॉर्पोरेट व आरोग्यसेवा क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींचा समावेश असेल, यामध्ये निष्पक्ष आणि अनुकूल सामाजिक प्रभाव साधणे सुनिश्चित केले जाईल. अशाप्रकारे प्रशासन संरचनेमुळे प्रोग्राममध्ये उभारण्यात आलेल्या निधीचा उपयोग आणि वाटप यांचे व्यावसायिक व स्वतंत्र रिव्ह्यू पार्टनर्समार्फत परीक्षण केले जाईल.
अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे चेअरमन व ‘कोविड वॉरियर अप-स्किलिंग प्रोग्राम – “एंजेल” #ThankANurse’चे पॅट्रोन डॉ प्रताप सी रेड्डी यांनी सांगितले, “या महामारीच्या काळात नर्सेसच्या सेवा व योगदानाचे महत्त्व जितके जाणवत आहे तितके ते यापूर्वी क्वचितच कधी जाणवले असावे. कोविडच्या विरोधात लढल्या जात असलेल्या या युद्धामध्ये त्या फ्रंटलाईनवर आहेत आणि रुग्णांचे प्राण वाचवण्यातील त्यांचे योगदान अतिशय उल्लेखनीय आहे. नर्सेस अशा हिरो आहेत ज्यांच्या साहस आणि त्यागाविषयी फारच कमी बोलले जाते. नर्सेसना अधिक उज्वल आणि समृद्ध भवितव्य मिळवून देण्यासाठी या अपस्किलिंग उपक्रमामध्ये सहभागी होऊन आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत. वेगाने विकसित होत असलेल्या आणि बदलत असलेल्या आरोग्यसेवा क्षेत्रात आपली भूमिका व स्थान अधिक वाढवण्यासाठी हा उपक्रम जास्तीत जास्त नर्सेसना तयार करेल.”
इम्पॅक्ट गुरु फाऊंडेशनचे संस्थापक श्री पियुष जैन यांनी सांगितले, “संस्थापक मंडळातील प्रमुख सदस्य म्हणून भारतातील आघाडीची आरोग्यसेवा संस्था अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप यांच्या सहयोगाने आणि इतर अनेक आघाडीच्या शैक्षणिक, कौशल्य व कॉर्पोरेट भागीदारांसह हा उपक्रम सुरु करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमची अशी इच्छा आहे की, जास्तीत जास्त कॉर्पोरेट्स, फाउंडेशन्स व व्यक्तींनी सीएसआर व ऑनलाईन योगदानाच्या माध्यमातून यामध्ये सहभागी व्हावे जेणेकरून आमचे एंजेल्स व नर्सेसना सक्षम बनवण्याचे व देशातील आरोग्यसेवा क्षेत्राला मजबूत करण्याचे उद्धिष्ट पूर्ण होईल. भारतातील व परदेशातील सर्व आरोग्यसेवा संस्था, रुग्णालये, वैद्यकीय शिक्षण व कौशल्य संस्थांसोबत सहयोग करण्याचे आणि कोविडविरोधातील लढ्यामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या आमच्या नर्सेसच्या करियरमध्ये उत्तम प्रभाव घडवून आणण्याचे आमचे उद्धिष्ट आहे”, stated in the press release.
Be the first to comment on "भारतातील नर्सेससाठी ‘कोविड वॉरियर अपस्किलिंग प्रोग्राम’अपोलो आणि इम्पॅक्ट गुरु फाऊंडेशन यांचे भारतातील एक लाख नर्सेसच्या कौशल्य विकासाचे विशेष उद्धिष्ट"