नवी मुंबई, १ एप्रिल २०२१ (GNI): डिजिटल हेल्थकेयर इकोसिस्टिम निर्माण करण्यासाठी नवनवीन डिजिटल तंत्रज्ञान, सुविधा निर्माण करणे आणि त्यांचा स्वीकार करणे अधिकाधिक महत्त्वाचे बनत आहे. ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून एक जॉईंट टेक्निकल एज्युकेशन प्लॅटफॉर्म सुरु करण्यासाठी नॅसकॉम फ्युचरस्किल्स प्राईमने अपोलो हॉस्पिटल्ससोबत भागीदारी केली आहे. तांत्रिक शिक्षण प्लॅटफॉर्ममार्फत कौशल्य विकासामुळे एक वैकल्पिक विचार पद्धती निर्माण होईल, ज्यामुळे एकंदरीत आरोग्यसेवा क्षेत्रात उच्च दर्जाची कार्यक्षमता येईल. कौशल्य विकासासाठी एक सर्वसमावेशक स्थान उपलब्ध होईल. याठिकाणी आरोग्यसेवा व्यवस्थापनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर तसेच सर्व समाजांमध्ये आरोग्यसेवा प्रभावी पद्धतीने पोहोचवल्या जाण्यासाठी त्याचा उपयोग यांचा समावेश असेल. कर्मचाऱ्यांचे विविध स्तर आणि करिअर मार्ग यानुसार प्रशिक्षणाची आखणी करण्यात येणार आहे. कौशल्यांचा तुटवडा असल्यामुळे येत्या दोन दशकांमध्ये ९०% नोकऱ्या अशा असतील ज्यामध्ये काही ना काही प्रकारे डिजिटल नैपुण्ये आवश्यक असतील. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाऊड आणि डेटा अनॅलिटीक्स यासारख्या आधुनिक काळातील तंत्रज्ञानांचे शिक्षण घेतल्याने सर्वांना आरोग्यसेवा उपलब्ध होतीलच शिवाय डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी यांच्यातील वैद्यकीय कौशल्यांची दरी देखील कमी होण्यात मदत होईल. यामुळे कर्मचाऱ्यांचा करिअर विकास होईल तसेच त्यांना अधिकाधिक चांगली कामगिरी बजावण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
नॅसकॉमचे आयटी-आयटीईएस सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया – चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. अमित अगरवाल यांनी यावेळी सांगितले, “आधुनिक आणि क्रांतिकारी तंत्रज्ञान विकासाला गती मिळाल्यामुळे भारतात आरोग्यसेवा क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडून येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा अनॅलिटीक्स यासारखी आधुनिक काळातील कौशल्ये यामध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत. पारंपरिक आरोग्यसेवा पद्धतींना मागे सोडून नवी कौशल्ये शिकणे, कौशल्यांचा विकास करणे आणि मूळ आरोग्यसेवा व डिजिटल यांच्यात परस्परपूरक कौशल्ये निर्माण करणे यासाठी उचललेले पुढचे पाऊल म्हणजे नॅसकॉम फ्युचरस्किल्स आणि अपोलो हॉस्पिटल्स यांच्या दरम्यानच्या भागीदारीतून तयार करण्यात आलेला प्लॅटफॉर्म होय.”
अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. संगीता रेड्डी यांनी सांगितले, “गेल्या काही वर्षांपासून अपोलो हॉस्पिटल्स सातत्याने ज्या डिजिटल परिवर्तनासाठी प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही नॅसकॉम फ्युचरस्किल्स प्राईमसोबत भागीदारी करत आहोत. आरोग्यसेवांमध्ये एक नवे युग अवतरत आहे. मोबाईल फोन्स, सेन्सर्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, जेनोमिक्स आणि इमेजिंग यासारखी विविध अत्याधुनिक तंत्रज्ञाने यामध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत. आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना आधुनिक वैद्यकीय प्रथांची माहिती हवीच शिवाय अतिशय वेगाने घडून येत असलेल्या डिजिटल क्रांतीसाठी देखील त्यांनी सज्ज असायला हवे. तांत्रिक शिक्षण प्लॅटफॉर्ममार्फत कौशल्य विकासामुळे एक वैकल्पिक विचार पद्धती निर्माण होईल आणि एकंदरीत आरोग्यसेवा क्षेत्रात उच्च दर्जाची कार्यक्षमता येईल.”ends
Be the first to comment on "नॅसकॉम फ्युचरस्किल्स® प्राईम आणि अपोलोची भागीदारी, डिजिटल तंत्रज्ञान शिक्षणाने आरोग्यसेवेची सर्व उपलब्धी डॉक्टर्स व कर्मचारी यांच्यातील वैद्यकीय कौशल्यांची दरी देखील कमी होईल"