‘
मुंबई, २८ जानेवारी २०२१:- तुमच्या प्रिय मैत्रिणीसाठी प्रेमाचे सर्वात योग्य प्रतीक ‘व्हॅलेंटाइन डे’ जवळ आला आहे ! हो… प्रेमाचा मौसम जवळ आला आहे आणि आम्हाला खात्री आहे, की तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या खास व्यक्तीसाठीचं आपलं प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी योग्य भेटवस्तूच्या शोधात असाल. आम्ही तुमच्यासाठी भेटवस्तूचा सर्वात चांगला पर्याय घेऊन आलो आहोत – दागिने! दागिने हे प्रेमाचं सर्वोच्च प्रतीक मानले जातात. प्रेमापासून प्रेरित होऊन बनवण्यात आलेले दागिने तुमच्या जोडीदाराला आनंद देतील, त्यांचे रूप खुलवतील, शिवाय त्यांचे रूप आणखी स्टायलिश करतील. त्याशिवाय दागिने हे सर्वात अर्थपूर्ण आणि विचारपूर्वक निवडलेली भेटवस्तू असते.
कल्याण ज्वेलर्समधे खिशाला सहज परवडतील अशा दागिन्यांचे पर्याय भेटवस्तू उपलब्ध करण्यात आले असून ते तुमच्या जोडीदाराचा व्हॅलेंटाइन डे खास करतील. प्रेमाचा हा मौसम साजरा करण्यासाठी कल्याण ज्वेलर्सने अभिजात दागिन्यांची मर्यादित श्रेणी लाँच केली आहे. या खास संग्रहात सोने व हिऱ्यांची ब्रेसलेट्स आणि पेंडंट्स यांचा समावेश आहे. अद्यावत फॅशन ट्रेंड्स लक्षात घेत या संग्रहात दागिन्यांचे विविध आणि भरपूर पर्याय देण्यात आले आहेत.
प्रेमाचा हा मौसम आणखी आनंददायी बनवण्यासाठी कल्याण ज्वेलर्सने हिऱ्यांच्या दागिन्यांवर १० टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे. ग्राहकांना १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कल्याण ज्वेलर्सच्या सर्व दालनांमधे या खास सवलतीचा लाभ घेता येणार आहे. व्हॅलेंटाइन डे निमित्त तुमच्या प्रियजनांना भेट देता येतील अशा खास दागिन्यांची ही झलक. –
पांढरी कबूतरे – खऱ्या प्रेमासाठी अगदी योग्य व्हॅलेंटाइन. पांढरी कबूतरे एकाच जोदीराबरोबर आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करतात. ती प्रेम, मर्यादा आणि दोन विश्वांतील संवादाचे प्रतीक मानले जातात. या साध्याशा नेकलेसमधे खोल अर्थ दडलेला आहे आणि तो आयुष्यभर जपला जाईल.
लव्ह बर्ड्सचे पेंडंट – उत्तम कारागिरीचा नमुना असलेले हे लव्ह बर्ड्सचे पेंडंट तुमच्या जोडीदारासाठी आदर्श भेटवस्तू ठरेल. हे गोलाकार, हिरे जडवलेले पेंडंट लव्ह बर्ड्स झाडाच्या फांदीवर बसल्याचा थ्रीडी आभास देणारे आणि अगदी रोमँटिक आहे.
हृदयाच्या आकाराचे पेंडंट – हृदयाच्या आकाराचे आकर्षक पेंडंट एका बाजूला हिरे आणि दुसऱ्या बाजूला फुलांच्या आकारात बनवण्यात आल्यामुळे हृदायाचा आकार पूर्ण होतो. हे पेंडंट अगदी रोज वापरता येण्यासारखे असून नेकलेसच्या लेयर्समधेही वापरता येईल.
लव्ह पेडंट – ‘लव्ह’ पेडंट. व्हॅलेंटाइनच्या निमित्ताने तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी ही भेट सर्वात योग्य आहे.
हृदयामधे हृदय असलेली बांगडी – हृदयामधे हृदय या संकल्पनेवर आधारित डिझाइन हे या दागिन्याचे वैशिष्ट्य आहे. नाजूक हृदयाच्या आकाराचा हिरे जडवलेली व मध्यभागी एकच हिरा असलेली ही बांगडी कायम स्टायलिश दिसेल.
व्हॅलेंटाइन ब्रेसलेट – कल्याण ज्वेलर्सचने व्हॅलेंटाइन दिनानिमित्त खास तयार केलेल्या संग्रहातील हे ब्रेसलेट व्हॅलेंटाइन डेची अविस्मरणीय भेट ठरेल.ends
Be the first to comment on "व्हॅलेंटाइन डे’ स्पेशल कल्याणचे खास दागिने, लव्ह बर्ड्सचे पेंडंट, हृदयाच्या आकाराचे पेंडंट, लव्ह पेडंट, हृदय असलेली बांगडी, ब्रेसलेट दागिन्यांच्या अनेक शृंखला घेऊन आले कल्याण ज्वेलर्स"