Rajiv Mistry, Founder and Managing Director, Ascent Meditech Ltd., with actor Rithik Roshan
National, ७ डिसेंबर २०२० (GNI): ग्राहक आरोग्यनिगा क्षेत्रातील भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी अॅसेन्ट मेडीटेक लिमिटेडने आपल्या फ्लॅगशिप ब्रँड ‘फ्लेमिंगो – अँन एड फॉर न्यू लाइफ’साठी बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनबरोबरचे सहचर्य कायम ठेवले आहे. ह्रतिक रोशन त्याच्या अपूर्व शैलीत या आंतरराष्ट्रीय जाहिरात मोहिमेमध्ये ‘तुम्ही काय करता, हेच महत्त्वाचे’ (what you do, ultimately matters) ही नव्याने रूळू पाहत असलेल्या परिस्थितीला अनुरूप विचारसरणी सांगतो. जीवनशैलीशी निगडित विविध समस्यांवरील वेदना शमविण्यासाठी प्रस्तुत अव्वल चार उत्पादने – हीट बेल्ट, नी कॅप, लंबर सॅक्रो बेल्ट आणि अँकलेट यांच्या भोवती या जाहिरात मोहिमेतील कथा फेर धरते.
अॅसेन्ट मेडीटेक लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव मिस्त्री म्हणाले, “काळ जेव्हा कठीण बनतो, तेव्हा कठोरता सर्वंकषच वाढते – ही म्हण भारतीयांसाठी तसेच अॅसेन्टसाठीही तंतोतंत खरी ठरली आहे. भारतीयांनी सर्व प्रतिकूलतांचा सामना केला आणि प्राप्त परिस्थितीशी म्हणजे न्यू नॉर्मलशी जुळवून घेतले. तर आम्ही, अॅसेन्टमध्ये भारतीयांना आजच्या घडीला अतीव गरज असलेल्या उत्पादनांच्या सहाय्याने पाठबळ दिले. ग्राहकांच्या वर्तनात आणि मानसिकतेत अचानक बदल घडून आल्यामुळे ब्रॅण्ड फ्लेमिंगोने ‘तुम्ही काय करता, हेच शेवटी महत्त्वाचे’या विचाराच्या छायेतच आपली ही नवीन मोहीम आखली आहे. नवीन मोहिमेतील संदेश हेतूपूर्ण आहे आणि वेदनादायी समस्या असतील त्या स्थितीत ग्राहकांना अस्तित्वात असलेल्या पद्धतींच्या तुलनेत शाश्वत तोडगा देणाऱ्या पर्यायाचा निर्णय घेण्यास सुचविते.”
ग्राहकोपयोगी आरोग्यनिगेतील कंपनी या नात्याने अॅसेन्ट मेडीटेक लिमिटेड नेहमीच ग्राहकांचे मन खूप लवकर वाचत आली आहे. आजारसाथीला सुरुवात झाली आणि भारतीयांना अधिक सुरक्षिता आणि बचावाची काळजी सतावू लागली. ग्राहकांमधील विश्वासार्ह ब्रँड असलेल्या फ्लेमिंगोने लोकांची ही गरज पाहून त्वरित सक्रियता दाखविली आणि फ्लॅमिमास्क, फ्लॅमिमास्क प्लस आणि फ्लॅमिमायटाझर ही किफायतशीर उत्पादने प्रस्तुत केली व त्यायोगे वैयक्तिक संरक्षण क्षेत्रात प्रवेश केला. या अलीकडच्या उत्पादन श्रेणी विस्तारासह, अॅसेन्ट मेडीटेक लिमिटेड, आता पाच (५) वर्गवारींमध्ये अस्तित्त्वात आहे, पूर्वीच्या चार (४) उत्पादन वर्गांमध्ये ऑर्थोपेडिक सॉफ्ट गुड्स, हेल्थकेअर, मोबिलिटी आणि जखमेची काळजी यांचा समावेश आहे.
फ्लेमिंगोची जीवनशैली श्रेणी अर्थात हीट थेरपी, कोल्ड थेरपी अंतर्गत अव्वल दर्जाची उत्पादने शीर्षस्थानी आहेत. या ब्रँडचे आघाडीचे उत्पादन हीट बेल्ट हे सांधेदुखीत वेदना कमी करते तर कोल्ड थेरपी उत्पादने अर्थात उदाहरणार्थ कूल पॅक हे दुखापत झालेल्या भागाला आराम देते आणि सूज कमी करते. फ्लेमिंगोची जीवनशैली उत्पादने हे सर्व वयोगटातील ग्राहक त्यांच्या नित्य दैनंदिन सक्रियतेसाठी वापरात आणू शकतात; मग ते घरात असो अथवा कामाच्या ठिकाणी. प्रतिबंधात्मक काळजी प्रकारात समाविष्ट उत्पादने म्हणजे रेग्युलर आणि प्रीमियम नी कॅप, रेग्युलर आणि प्रीमियम अँकलेट ही देखील तरीही जीवनशैलीचा भाग आहेत. नी कॅप हे गुडघ्याला आधार देते आणि तो भाग सौम्य रूपात आकसून घेते. खेळताना होणाऱ्या जखमा, म्हातारपणातील गुडघेदुखीत ते वापरण्याचा सल्ला दिला जातो. सूज, खेळातील इजा, सौम्य ते मध्यम मुरगळणे, लचक आणि ताणाच्या स्थितीत आणि वृद्धावस्थेत अँकलेटची शिफारस केली जाते. पाठदुखीच्या समस्येवर फ्लेमिंगोची प्रस्तुती असलेले, लंबर सॅक्रो बेल्ट हे एकसमान दाब व संकोचनाने आराम देते आणि पाठीच्या खालच्या भागाला आधार देते ज्यायोगे वेदनांपासून आराम मिळून शरीराची ठेवणही ठीक होते..
अॅसेन्ट मेडीटेक लिमिटेडने यापूर्वी फ्लेमिंगोच्या वेदनाशमन उत्पादनांची श्रेणी ही – ब्लॅक, बीज आणि नियमित श्रेणीसाठी ब्लॅक अँड ऑरेंजचे संयोजन अशा दोन रंगांच्या प्रकारांचे अनावरण केले; आणि तिची प्रीमियम श्रेणी उत्पादने ही टरकॉइज ब्लू रंगात जे त्यांना ट्रेंडीअर, स्पोर्टी आणि समकालीन रूपडे देते, जे विशेषत: तरुणांना आणि मिलेनियल ग्राहकांना आकर्षित करते.
कंपनीने तिचे ई-कॉमर्स व्यासपीठ www.flamingohealth.com प्रस्तुत तिच्या आघाडीच्या ब्रँडच्या देशभरात केव्हाही आणि कुठेही उपलब्धतेची खातरजमा केली आहे. कंपनीचे ई-कॉमर्स व्यासपीठ फ्लेमिंगोहेल्थ डॉट कॉमवर एकूण 350+ पेक्षा जास्त उत्पादनांच्या पोर्टफोलिओपैकी बहुतेक उत्पादने (एकापेक्षा अधिक एसकेयूमध्ये उपलब्ध) आहेत. ई-कॉमर्स मंचावर प्रस्तुत उत्पादन मिश्रणात ओटीसी तसेच आरएक्स उत्पादनांचा समावेश आहे, मात्र बहुतांश ओटीसी उत्पादने आहेत. सर्व वर्गवारीतील उत्पादने ही एमआरपीवर 10% सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. www.flamingohealth.com वर केलेल्या सर्व खरेदींसाठी 10% सवलत आहे आणि ३५० रुपये किंवा त्याहून अधिकची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कोणतेही डिलिव्हरी शुल्क देण्याची गरज नाही.ends
Be the first to comment on "प्राप्तपरिस्थितीत “तुम्ही काय करता, हेच शेवटीमहत्त्वाचे” म्हणणाऱ्याहृतिक रोशन अभिनीत फ्लेमिंगोच्या नवीन टीव्ही जाहिरातीचे अनावरण"