Rays Power Infra announced closure of INR 127 Crore Equity Capital Fund Raise - HD FIRE PROTECT LIMITED ANNOUNCED ITS IPO TO OPEN ON TUESDAY, OCTOBER 13, 2026 Price Band fixed at ₹ 258 to ₹ 271 per equity share of face value of ₹5 each of HD Fire Protect Limited - Second Act Awards 2026 Celebrate Courage, Reinvention and Meaningful New Beginnings Meenakashi Lekhi attended the Mumbai event as Chief Guest as entrepreneurs, artists and changemakers were honoured for rewriting their life stories - Prestigious Asia’s Modern Hero Award 2026 Dr. Nilesh Potdar Honoured with Asia’s Modern Hero Award 2026 - Maharashtra’s Culture Comes Alive in Berlin as ‘Ganpati Bappa Morya’ Echoes Across the City - Matrimonial Dispute Widens Into Parallel Legal Proceedings Across Delhi and Uttar Pradesh A June 2025 complaint by Ayush Gupta preceded Nikita Jaiswal’s September 2025 Kanpur FIR; subsequent proceedings have brought documentary evidence, competing allegations and judicial scrutiny into the public record - Five-Year-Old Boy with Relapsed Leukemia is Cancer-Free after Haploidentical Bone Marrow Transplant at Kokilaben Hospital, Navi Mumbai - Orient Cables (India) Limited Announced its ₹5,520.00 million Initial Public Offering (IPO) to open on September 25, 2026 Price Band fixed at ₹258 to ₹272 per equity share of face value of ₹1 each - AceVector Limited Announced it's Initial Public Offer (IPO) of Equity Shares to open on September 25, 2026, Price Band is fixed at ₹ 30 to ₹ 32 per equity share of face value of ₹ 1 each - Moneyview Limited announced its Initial public offering (IPO) to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ₹1 each to ₹34 per equity share of the face value of ₹1 each - Moneyview Limited announced it's Initial public offering (IPO) to open on Thursday, September 24, 2026 Price Band fixed at ₹32 per equity share of face value ₹1 each to ₹34 per equity share of the face value of ₹1 each

एफएमजेमधील कृष्‍णा व भारतीचे हे अव्‍वल ४ लुक्‍स आहेत हिट!

MUMBAI, 14th September 2020 (GNI): भारती सिंग व कृष्‍णा अभिषेक यांची धमाल विनोदी कृत्‍ये सादर करणारा सोनी सबवरील हसवून-हसवून लोटपोट करणारा शॉर्ट फॉर्मेट स्‍केच कॉमेडी शो ‘फनहित में जारी’ प्रेक्षकांना अचंबित करत आहे. हे दोघेही जगभरातील विविध विषयांवर विडंबन सादर करतात. हे २ ते ३ मिनिटांचे गॅग्‍स वीकेण्‍ड मनोरंजनामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करतात. प्रत्‍येक एपिसोड ५ हास्‍यजनक गॅग्‍स सादर करतो आणि त्‍यामध्‍ये हे दोघेही नवीन अवतारांमध्‍ये पाहायला मिळतात. अत्‍यंत प्रतिभावान कलाकार व कॉमेडीयन्‍स कृष्‍णा व भारती यांनी ‘फनहित में जारी’मध्‍ये काम करताना त्‍यांच्‍या अनुभवाचा चांगला उपयोग केला आहे. त्‍यांचे विविध लक्षवेधक लुक्‍स व पात्रं या शोची खासियत आहे.  

भारती सिंग तिच्‍या आवडत्‍या गॅगबाबत बोलताना म्‍हणाली, ”कृष्‍णासोबत काम करताना नेहमीच आनंद वाटतो. त्‍याची विनोदीशैली व व्‍यावसायिकता अत्‍यंत प्रभावी आहेत आणि ते त्‍याच्‍यासोबत काम करण्‍याच्‍या आनंदामध्‍ये अधिक भर करतात. मला आवडलेला एखादा गॅग निवडणे अवघड आहे, ते सर्वच चांगले आहेत आणि प्रेक्षकांचे छान मनोरंजन करतात. पण मला एका गॅगची निवड करायची असेल तर मी ‘गोलू हाजीर हो’ आणि ‘अॅडवेन्‍चर्स ऑफ राजमाता (बाहुबली)’ची निवड करेन. लुक्‍स अत्‍यंत काळजीपूर्वक डिझाइन करण्‍यात आले आहेत आणि त्‍यामध्‍ये हास्‍यजनक पटकथेची भर होताच ते प्रेक्षकांसाठी अधिक मजेशीर बनते. एक कलाकार म्‍हणून नेहमीच नवीन लुक धारण करताना खास वाटते आणि मी प्रत्‍येक एपिसोडसोबत ‘फनहित में जारी’चा आनंद घेते.”

भारतीची सोबत आणि शोमधील आवडत्‍या गॅगबाबत बोलताना कृष्‍णा अभिषेक म्‍हणाला, ”भारतीसोबत काम करताना नेहमीच उत्‍साहवर्धक वाटते. मला ‘फनहित में जारी’साठी विचारण्‍यात आले आणि मी भारतीसोबत काम करणार आहे हे सांगण्‍यात आल्‍यानंतर मी होकार देण्‍यासाठी अधिक विचार केला नाही. माझे सर्वात आवडते गॅग आहे बाहुबली गॅग – ‘अॅडवेन्‍चर्स ऑफ राजमाता’. या गॅगमधील रोमांचक बाब म्‍हणजे लुक्‍स संदर्भात बारकाईने काम करण्‍यात आले आहे आणि यामधून पूर्णत: चित्रपटाची भावना दिसून येते. मला सीएचआय.आय.डी देखील आवडते, कारण भारती एसीपीच्‍या वेषात खूपच गोंडस दिसत आहे.” 

तुम्‍हाला हसवून-हसवून लोटपोट करणारी ‘फनहित में जारी’मधील कृष्‍णा व भारतीची काही सर्वोत्तम लुक्‍स:

१.     प्रतिष्ठित राजमाता व चटप्‍पा

सुपरहिट चित्रपट ‘बाहुबली’मधून प्रेरित भारती व कृष्‍णा अनुक्रमे राजमाता व चटप्‍पाच्‍या भूमिकेत पात्रांमध्‍ये हलक्या-फुलक्या विनोदी ट्विस्‍टची भर करतात. पात्रांचे लुक्‍स जवळपास चित्रपटामधील पात्रांप्रमाणेच आहेत, ज्‍यामुळे या प्रेरित विडंबनाचा सार कायम राहण्‍यामध्‍ये मदत होते. 

२.    सीएचआय.आय.डी मध्‍ये डबल ट्रबल  

सीएचआय.आय.डी. कार्यालयामधील ट्रबल शूटर्स एसीपी व दया ही जोडी प्रेक्षकांनी पाहणे चुकवता कामा नये. कृष्‍णाने दयाचा कणखर लुक धारण केले आहे, तर भारतीने प्रेमळ एसीपीचा लुक घेतला आहे. हे दोन्‍ही लुक्‍स प्रेक्षकांना खूप आवडतील. 

३.    एफएमजे फॅनाटिक्‍स

प्रेक्षकांचे नवीन एपिसोड्समध्‍ये स्‍वागत करत आहे मालकीण व तिच्‍या मोलकरणीची अपरंपरागत जोडी. कृष्‍णा खोडकर मोलकरणीच्‍या रूपात काही उत्तम संवाद सादर करतो, तर मालकीणीच्‍या रूपातील भारती ‘फनहित में जारी’ची निस्‍सीम चाहती आहे. ही धमाल जोडी वीकेण्‍डला हसवून हसवून लोटपोट करते.

४.    गोलू हाजीर हो

‘गोलू हाजीर हो’ हा शाळेतील मुख्‍याध्‍यापक आणि अत्‍यंत खोडकर व बडबड करणारा विद्यार्थी गोलू यांच्‍यामधील धमाल सीक्‍वेन्‍स आहे. मुख्‍याध्‍यापक चाळीस वर्षाचा आहे आणि त्‍याला फॅशनची खूप आवड आहे. तो चमकदार पोशाख परिधान करताना दिसत आहे. त्‍याला फॅशनच्‍या बाबतीत अत्यंत आवड असून विविध प्रकारचे फॅशनेबल पोशाख परिधान करायला आवडतात. दुसरीकडे भारतीने साकारलेली भूमिका गोलू हा गोंडस दिसतो. पण तो बोलू लागतो तेव्‍हा त्‍याचे बोलणे खूपच हास्‍यजनक वाटते.

भारती व कृष्‍णाचा सर्वोत्तम हास्‍यपूर्ण अभिनय पाहा दर शनिवार व रविवार दर तासाला फक्‍त सोनी सबवर.ends

Be the first to comment on "एफएमजेमधील कृष्‍णा व भारतीचे हे अव्‍वल ४ लुक्‍स आहेत हिट!"

Leave a comment

Your email address will not be published.


*