जल्लोष आणि चैतन्यमय वातावरणात रंगला २३ व्या पार्ले महोत्सवचा समारोप सोहळा

जल्लोष आणि चैतन्यमय वातावरणात रंगला २३ व्या पार्ले महोत्सवचा समारोप सोहळा

कार्यकर्त जबाबदारी यशस्वीपणे पेलत असल्यानेच

पार्ले महोत्सव दरवर्षी वाढतोयआ. पराग अळवणी

· ३९२ प्रथम पारितोषिकांसह २५ हजार एकूण बक्षिसांचे वाटप

· यंदाच्या ३० हजार स्पर्धकांसह आतापर्यंत ३.५ सहभागींची नोंद

· ८०० कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग

· ९२ वर्षीय वसंत म्हात्रे यांचा हस्ताक्षर स्पर्धेतील सहभाग ठरला लक्षवेधी

Mumbai, 31st December 2023 (GNI): गेल्या आठवडाभरापासून ३२ विविध स्पर्धांमधून रंगत आणत गेलेल्या २३ व्या पार्ले महोत्सवाची यशस्वी सांगता जल्लोष आणि चैतन्यमय वातावरणात झाली. यंदाच्या या महोत्सवात ३९२ प्रथम पारितोषिकांसह २५ हजार एकूण बक्षिसांचे वाटप करण्यात आले तर यंदाच्या ३० हजार स्पर्धकांसह आतापर्यंत ३.५ सहभागींची नोंद झाली तसेच ८०० कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग मिळाला. ६ महिन्याच्या बाळाचा सदृढ बालक स्पर्धेत तर ९२ वर्षीय वसंत म्हात्रे यांचा हस्ताक्षर स्पर्धेतील सहभाग हे या महोत्सवाचे वेगळेपण ठरले. या महोत्सवाच्या यशस्वी होण्यामागचे श्रेय मुख्य आयोजक आमदार पराग अळवणी यांनी कार्यकर्त्यांना दिले असून दरवर्षी हा महोत्सव वाढत जातो आणि त्यामुळे कार्यकर्त्यांवरील जबाबदारी देखील वाढत जाते, पण ती चोखपणे पेलण्याचे काम सर्वजण करत असतात, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.

महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाल्यानंतर अनेक मान्यवरांनी या महोत्सवाला भेटी दिल्या. मिलिंद शिंदे, श्रीकृष्ण आंबेकर, विनीत गोरे, विलास करमळकर, एन. सुरेशन, प्रवीर कपूर, राजेश मेहता, माजी नगरसेविका ज्योती अळवणी आणि सुनिता मेहता, माजी नगरसेवक अनिष मकवानी अणि अभिजीत सामंत आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली विलेपार्ले परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या विविध स्पर्धांमधून स्पर्धकांनी उत्सफूर्त सहभाग देत सांस्कृतिक, क्रीडा विभागात आपले कला-कौशल्य सादर केले. त्यामुळे संपूर्ण विलेपार्ले महोत्सवमय झाले होते. अंतिम सामन्यांच्या विजेत्यांना समारोपाच्या वेळी पारितोषिके देण्यात आली. त्यावेळी उपस्थितांच्या जल्लोषमय वातावरणाने आणि खिलाडूवृत्तीने कार्यक्रमात एकच रंगत आणली. पार्ले महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नसून खरा एकता, चैतन्य आणि खिलाडूवृत्तीचा उत्सव आहे, अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी दाखवून दिल्या.

होम मिनिस्टरचा ठरल्या सुनिता गुंडे: पार्ले महोत्सवातील होम मिनिस्टर होण्याचा पहिला मान सुनिता गुंडे तर दुसरा मान राजश्री मांडवकर यांना मिळाला. त्यांना मानाची पैठणी देण्यात आली. उत्तम पेहरावाबद्दल रेखा विश्वकर्मा, सुरेखा डिंगणकर, पूनम सिंग, प्रिया सावंत यांना पारितोषिके मिळाली. त्याचबरोबर पहिल्या गटात स्वरा कदम, मेघना गावंडे, अक्षता धनावडे तर दुसऱ्या गटात श्रृतिका नारकर, प्राची शेंड्ये, वैशाली सुतार यांना पहिली तीन पारितोषिक देण्यात आली.

वरिष्ठ नागरिकांचाही उत्साहपूर्ण सहभाग: वरिष्ठ नागरिकांसाठी विविध गटांमध्ये आयोजित कऱण्यात आलेल्या स्पर्धेत सारंग सबनीस, अपर्णा कुलकर्णी, मंजुळा ठक्कर, सुनिता जाधव, विलासिनी चित्रे यांनी बाजी मारली. त्याच्या खालोखाल प्रिया परुळेकर, प्रमोद शेंडे, शुभदा नार्वेकर, तारमती हडशी, कुसुम भरणकर यांनीही क्रमांक पटकावला. वरिष्ठ नागरिकांच्या स्पर्धेचे विशेष म्हणजे ९२ वर्षीय वसंत म्हात्रे यांनी हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग घेत आपले कौशल्य सादर केले.

अटीतटीची शरीरसौष्ठव स्पर्ध: शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेते आणि उपविजेते गटनिहाय – ५५ किलो – अक्षय गव्हाणे, ओमकार आंग्रे, ६० किलो – गणेश पाटील, सचिन बोईनवाड, ६५ किलो – सैमी खान, अनिल जयस्वाल, ७० किलो – उमेश गुप्ता, नदीम अन्सारी, ७५ किलो – सुरत निर्मल, विशाल धावडे, ८० किलो – अमित साटम, अक्षय खोत, ८० किलोवरील – हरमित सिंग, अभिषेक लोंढे.

मेहंदीची कलात्मकता: मेहंदी स्पर्धेतील विजेते क्रमनिहाय – शालेय गट – अप्सरा अन्सारी, ऱफिया अन्सारी, हिना खातून, ध्रुवी, झीनत शेख, ज्योती यादव, अल्सिफा अन्सारी, भारतीय गट – अफरीन अन्सारी, सुप्रिया कारणे, अनिषा सोखिया, जस्मिन बुच, कशिश गलैया, नियाद तांडेल, अरेबिक गट – दिप्ती धुल, सोनाली मोरे, प्राजक्ता बेटकर, शबीना गलब, खुशी पासी, सुवर्णा कवठेकर.ends GNI

Be the first to comment on "जल्लोष आणि चैतन्यमय वातावरणात रंगला २३ व्या पार्ले महोत्सवचा समारोप सोहळा"

Leave a comment

Your email address will not be published.


*