National,२६ डिसेंबर २०२३: क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि. (सीजीसीईएल) या भारतातील आघाडीच्या कंपनीला प्रतिष्ठित राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२३ सह सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि उर्जा मंत्रालयाच्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) मार्फत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीने आपल्या स्टोरेज वॉटर हिटरसाठी मोस्ट एनर्जी एफिशिएण्ट अप्लायन्स ऑफ द इअर २०२३ श्रेणीमध्ये ही उपलब्धी प्राप्त केली.
नवी दिल्लीमधील विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडला. सीजीसीईएलच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रोमीत घोष आणि होम इलेक्ट्रिकल्सचे व्यवसाय प्रमुख श्री. सचिन फर्तियाल यांनी पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी मत व्यक्त करत क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोमीत घोष म्हणाले, ”विशेषत: भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते असा प्रतिष्ठित पुरस्कार मिळणे सन्माननीय आहे आणि यामधून क्रॉम्प्टनची ऊर्जा-कार्यक्षम नाविन्यतांमध्ये अग्रणी असण्याप्रती समर्पिता दिसून येते. Ends GNI.
Be the first to comment on "भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार २०२३ वितरण सोहळा संपन्न"