तळोजा, ५ डिसेंबर २०२३ (GNI): जागतिक स्तरावरील ब्रँड, स्केचर्स, द कम्फर्ट टेक्नॉलॉजी कंपनीने महाराष्ट्रात डोंबिवलीच्या जवळ पलावा सिटीमध्ये आपल्या नवीन अत्याधुनिक नॅशनल डिस्ट्रिब्युशन सेंटरचा (एनडीसी) फेज १ सुरु करत, भारतात आपल्या राष्ट्रव्यापी रिटेल नेटवर्कसाठी शिपिंग सुरु केले आहे. नव्याने तयार करण्यात आलेली ६५० चौरस मीटरच्या या फॅसिलिटीमधून दर दिवशी ६०,००० शूज जोडचे शिपिंग कुशलतापूर्वक केले जाऊ शकते. ही फॅसिलिटी स्केचर्सचे डायरेक्ट-टू-कन्ज्युमर चॅनेल आणि मुंबईबरोबरीनेच युनायटेड स्टेट्समधील मुख्यालयासोबत देखील इंटरफेस करेल.
डेव्हिड वेनबर्ग, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, स्केचर्स यांनी सांगितले,”स्केचर्स नॅशनल डिस्ट्रिब्युशन सेंटरची स्थापना भारतीय बाजारपेठेप्रती आमची अतूट बांधिलकी आणि विश्वास दर्शवते. २०१२ मध्ये सुरुवात केल्यापासून आम्ही देश व आमचा व्यवसाय या दोन्हींमध्ये वेगवान विकास होत असलेला पाहिला आहे. पायाभूत सोयीसुविधांचा विकास, विशाल उत्पादन श्रेणी आणि बॉलिवूड आयकॉन, ऍथलिट्स व प्रभावी लोकांसोबत करण्यात आलेल्या आकर्षक स्थानिक कॅम्पेन्समार्फत आम्ही आमच्या ग्राहकांच्या वाढत्या संख्येसोबत यशस्वीपणे जोडले गेलो आहोत. आज आमची नाविन्यपूर्ण कामगिरी आणि आरामदायक शूज व कपडे भारतातील वैविध्यपूर्ण लोकसंख्येच्या विविध गरजांना अनुरूप आहेत. हे नॅशनल डिस्ट्रिब्युशन सेंटर एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जो भारताच्या आशादायी भविष्यामध्ये स्केचर्सची महत्त्वपूर्ण भूमिका मजबूत करतो, भारतातील लोकांमधील आमची गहन गुंतवणूक आणि या महत्त्वपूर्ण बाजारपेठेत आमचा वाढता व्यवसाय दर्शवतो.”
श्री.राहुल वीरा, सीईओ, साऊथ एशिया, स्केचर्स यांनी सांगितले,”भारतात सातत्याने वाढत असलेल्या फूटवेयर उद्योगक्षेत्रात सर्वात आघाडीवर असलेल्या स्केचर्सने दरवर्षी उल्लेखनीय वृद्धी नोंदवली आहे. कृती सनन, अनन्या पांडे, मिताली राज आणि इतर अनेक ए लिस्ट सेलिब्रेटी व खेळाडूंसोबत आमच्या स्ट्रॅटेजिक सहयोगामुळे अनेक प्रभावी मार्केटिंग कॅम्पेन्स तयार केली गेली. आम्ही मुंबईमध्ये आपला कॉर्पोरेट विस्तार केला आहे आणि ४०० पेक्षा जास्त स्केचर्स रिटेल स्टोर्समध्ये गुंतवणूक करत खूप मोठा विस्तार करून जास्तीत जास्त ग्राहकांसोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत. सुरुवातीपासून आजपर्यंत सीएजीआरमध्ये उल्लेखनीय ६०% पेक्षा जास्त वाढ, जीवनशैली आणि कामगिरी या दोन्हींसाठी आरामदायक सुविधा म्हणून स्केचर्सला भारतीय बाजारपेठेकडून मिळत असलेली मान्यता दर्शवते. जसजसे भारतीय फूटवेयर मार्केट विस्ताराच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज होत आहे, नॅशनल डिस्ट्रिब्युशन सेंटर बाजारपेठेच्या सध्याच्या मागण्या कुशलतेने पूर्ण करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी विकास घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.”
लोढा इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक्स पार्कमध्ये स्थित नॅशनल डिस्ट्रिब्युशन चॅनेल येत्या दोन वर्षांमध्ये १००० चौरस मीटरपर्यंत वाढवण्याची योजना आहे, त्यामुळे याची सध्याची दरवर्षी ४ मिलियन पेयर्स क्षमता ७ मिलियन पेयर्सपर्यंत वाढेल. सध्या पेंडिंग असलेले प्रमाणीकरण मिळाल्यावर आयजीबीसी प्लॅटिनम पूर्व प्रमाणित लीडर म्हणून डिझाईन करण्यात आलेल्या या फॅसिलिटीमध्ये ऊर्जेच्या वापरामध्ये बचत करू शकेल अशा प्रकाश व्यवस्थेसह अनेक ईएसजी वैशिष्ट्ये देखील आहेत. पुढच्या वर्षी पहिल्या तिमाहीत सोलर पॅनेल्स लावले जातील. भविष्यात इनबाउंड, आऊटबाउंड आणि सॉर्टेशन या स्वयंचलित क्षमता देखील कार्यान्वित केल्या जातील.ends GNI
Be the first to comment on "‘स्केचर्स’ ने महाराष्ट्रामध्ये सुरु केले नॅशनल डिस्ट्रिब्युशन सेंटर"