आशियातील पहिल्या ‘सब-सी रिसर्च लॅबचा’ शुभारंभ, एमआयटी युनिव्हर्सिटी जागतिक तेल व वायू उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ विकसित करणार

मुंबई, १७ मे २०२३ (GNI): एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी गेल्या ४० वर्षांपासून उच्च शिक्षण देत असलेले भारतातील प्रतिष्ठित विद्यापीठ असून त्यांनी आशियातील पहिली सब-सी रिसर्च लॅब उभारली आहे. सेंटर फॉर सब-सी इंजिनियरिंग रिसर्च (सीएसईआर) असे या लॅबचे नाव आहे. ही क्रांतीकारी संस्था अकेर सोल्यूशन्सच्या सहकार्याने तयार करण्यात आली असून तिथे खोल पाण्यातील ऑफशोअर पेट्रोलियम कामकाज कसे चालते हे दाखवणारे वर्किंग प्रोटोटाइप ठेवण्यात आले आहे. यामुळे भविष्यात उर्जा क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात क्रांती येईल. ही अत्याधुनिक प्रयोगशाळा एमआयटी- डब्ल्यूपीयूमधील डिपार्टमेंट ऑफ पेट्रोलियम इंजिनियरिंगच्या (पीई) संकल्पनेतून उतरली आहे. हा विभाग उर्जा क्षेत्रातील प्रवर्तकीय संस्था असून भारतात पेट्रोलियम इंजिनियरिंग शिक्षण देणारी दुसरी सर्वात जुनी संस्था आहे.

सब-सी लॅबोरेटरीमध्ये विविध प्रकारची अप्लिकेशन्स आहेत. त्यामध्ये इंजिनियरिंग व त्यानंतरचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील प्रयोग, संयुक्त व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम, सबसी आणि इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ इंजिनियरिंग (आयएसएचई) क्षेत्रातील तज्ज्ञ, सब-सी इंजिनियरिंग अवेयरनेस अभ्यासक्रम आणि कॉलेज व शालेय विद्यार्थी तसेच या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी सहलीचा लाभ घेता येणार आहे. रियल टाइम ड्रिलिंग आणि त्यासाठी वापरली जाणारी वेल कंट्रोल सिस्टीम व वेल कंट्रोल स्टिम्युलेशन प्रयोग यांचा इथे प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. सब-सी इंजिनियरिंग क्षेत्रातील आपले ज्ञान व कौशल्ये विकसित करण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही लॅब परिपूर्ण आहे. उद्योग क्षेत्र, सरकार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मदतीने संयुक्त संशोधन प्रकल्प राबवण्याची या लॅबची योजना आहे. यामुळे ज्ञान निर्मितीस चालना मिळेल व आपल्या देशाची उर्जा सुरक्षा वाढेल.

डॉ.समर्थ पटवर्धन, प्रोफेसर- पेट्रोलियम इंजिनियरिंग, एमआयटी विद्यापीठात संशोधन व विकास विभागाचे संचालक-प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणाले,‘‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पेट्रोलियम इंजिनियरिंगमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना उर्जा क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्यांनी सक्षम करत असतो. सब-सी रिसर्च लॅब लाँच करून आम्ही मोठी झेप घेतली आहे. ही लॅब विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जगातील, आधुनिक शिक्षण देण्याच्या आमच्या ध्येयपूर्तीच्या प्रवासातील लक्षणीय टप्पा आहे. आम्हाला खात्री आहे, की या अत्याधुनिक केंद्रामुळे फक्त आमच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण उद्योगक्षेत्राला लाभ होईल. कारण या लॅबमुळे कुशल आणि उद्याची आव्हाने पेलण्यासाठी सक्षम व्यावसायिक तयार करण्यास मदत होईल.’’

पराग परांजपे, व्यवस्थापक, अकेर सोल्यूशन्स सिस्टीम इंजिनियरिंग म्हणाले,’‘जागतिक पातळीवर सब-सी ऑइल आणि गॅस विकास क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. या क्षेत्राची मागणी पूर्ण करण्यासाठी कुशल व्यावसायिकांची तीव्र गरज आहे. एमआयटी- डब्ल्यूपीयूसह केलेली भागिदारी या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची दरी भरून काढता येईल. यामुळे या उद्योगक्षेत्राशी लागणारी वैविध्यपूर्ण कौशल्ये असलेला कर्मचारी वर्ग तयार करणे व जागतिक तेल व वायू क्षेत्राची मागणी पूर्ण करणे शक्य होईल. सबसी इंजिनियरिंग विषय म्हणून उपलब्ध करणे व सब-सी विषयी ज्ञान आणि कौशल्ये यांच्या विकासाला पाठिंबा देणे यातून या क्षेत्राच्या यशासाठी महत्त्वाचे योगदान देणे शक्य होईल,’.ends GNI SG

Be the first to comment on "आशियातील पहिल्या ‘सब-सी रिसर्च लॅबचा’ शुभारंभ, एमआयटी युनिव्हर्सिटी जागतिक तेल व वायू उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ विकसित करणार"

Leave a comment

Your email address will not be published.


*