मुंबई, ७ मे २०२३ (GNI): भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १५३ व्या जन्मदिनानिमित्त, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील गेल्या ४० पेक्षा वर्षांपासून दिल्या जात असलेल्या योगदानामध्ये अजून एक मोलाची भर टाकत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल (डीपीआयएफएस) सुरु केले आहे. सिनेजगतातील नामवंत श्री.नाना पाटेकर, ख्यातनाम सिनेनिर्माते श्री.अभिजित पानसे यावेळी उपस्थित होते. श्री.अभिजित पानसे हे डीपीआयएफएसचे क्रिएटिव्ह डायरेक्टर असणार आहेत.
एमआयटी-डब्ल्यूपीयूने बी.ए. फिल्ममेकिंगमध्ये एक पूर्णपणे नवा अंडरग्रॅज्युएट ऑनर्स अभ्यासक्रम सुरु केला आहे. दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी आणि साउंड डिझाईन यामध्ये स्पेशलायझेशनसह या अभ्यासक्रमामध्ये सिने व नाटक जगतातील दिग्गज मंडळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील जेणेकरून हे विद्यार्थी आपल्या आवडीचे रूपांतर व्यवसायात करू शकतील. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलमध्ये या क्षेत्रातील अनेक दिग्गज सल्लागार म्हणून यामध्ये, ख्यातनाम सिनेनिर्माते श्याम बेनेगल, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक वामन केंद्रे, संगीतकार स्नेहा खानवलकर तसेच एफटीआयआय व एनएसडीमधील अनेक ज्येष्ठ फॅकल्टी सदस्यांचा समावेश आहे.
एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमद्ये मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाचे संचालक, सिनेनिर्माते, लेखक, कलाकार आणि लोकसभा टीव्हीचे माजी कार्यकारी संचालक श्री. धीरज सिंग हे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलचे संचालक असणार आहेत. ते म्हणाले, “श्री. राहुल कराड यांच्या व्हिजनमधून दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलची सुरुवात होत आहे. अधिकाधिक उच्च लक्ष्य असणारे, अधिकाधिक मोठी स्वप्ने ज्याठिकाणी पाहिली जातील असे आणि स्वतःच्या संस्कृतीमध्ये घट्ट पाय रोवून काम करणारे भविष्यातील सिनेनिर्माते निर्माण करण्याचे उद्दिष्ट असलेले फिल्म स्कूल पुण्यात उभारले जावे हे त्यांचे स्वप्न आहे.”
श्री.अभिजित पानसे, डीपीआयएफएसचे क्रिएटिव्ह डायरेक्टर-ख्यातनाम सिनेनिर्माते, यांनी या स्कूलच्या निर्मितीमागची पायाभूत संकल्पना समजावून सांगितली, “अंग्रेजी नहीं आती तो फिल्ममेकिंग या ऍक्टिंग नहीं आती क्या?” रेगे आणि ठाकरे यासारख्या उत्तमोत्तम सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक श्री. पानसे यांनी पश्चिमेतील आणि भारतातील सिनेनिर्मितीच्या संस्कृतीतील फरक दर्शवला. त्यांनी वचन दिले की, डीपीआयएफएसमध्ये पश्चिमेतील सर्वोत्तम शैली, तंत्रे आणि पूर्वेतील संस्कृती व परंपरा यांना एकत्र आणून सिने शिक्षणाच्या एका नव्या युगाचा प्रारंभ केला जाईल. त्याबरोबरीनेच याठिकाणी क्षेत्रीय भाषांमध्ये सिने शिक्षण उपलब्ध होईल.
दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलमध्ये विद्यार्थी फिल्ममेकिंगमधील अंडरग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकतील, याठिकाणी दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी आणि साउंड डिझाईनमध्ये विशेष शिक्षण पुरवले जाईल. स्पेशलायझेशन निवडण्याच्या आधी विद्यार्थी या क्षेत्राच्या विविध पैलूंचा अभ्यास करू शकतील आणि १३ फाऊंडेशन प्रोग्राम व सर्व स्पेशलायझेशन्समधील विविध प्रोग्राम करून आपली नेमकी आवड समजून घेऊ शकतील. शेवटच्या वर्षात इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना या उद्योगक्षेत्रात आपल्याला हवा तो करियर मार्ग निवडण्यात मदत मिळेल. प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना एक्झिट पर्याय उपलब्ध राहील आणि २०२० च्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांनी त्यांना ऑनर्स पदवी देखील मिळू शकेल.ends GNI
Be the first to comment on "एमआयटी-डब्ल्यूपीयूने सुरु केले ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल’, सिनेजगतातील नामवंत श्री.नाना पाटेकर, ख्यातनाम सिनेनिर्माते श्री.अभिजित पानसे यावेळी उपस्थित होते"