मुंबई, ६ एप्रिल २०२३ (GNI): रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे सह्याद्रीच्या कुशीत, हिरवीगार शेती, धबधब्यांच्या सानिध्यात मॉन्टेरियाच्या ‘काबिला’ व्हिलेजमध्ये पर्यटकांना उन्हाळी सुटीचा आनंद अधिक द्विगुणित करता येणार आहे. निरभ्र आकाश, नैसर्गिक वातावरणात भटकंती करण्याबरोबरच लोकांसोबत मिसळून आपला वेळ घालवायला आवडणाऱ्या व्यक्तींसाठी ‘मॉन्टेरिया व्हिलेज’ हे योग्य ‘पर्यटन डेस्टिनेशन’ ठरणार आहे. शहरात धकाधकीच्या आणि डिजिटल आयुष्यापासून दूर करून अशा व्यक्तींना सामाजिकरित्या व्यस्त ठेवण्यासाठी निसर्गसंपन्न ‘काबिला’ व्हिलेजची निर्मिती करण्यात आली आहे.
बंजारा समुदायापासून प्रेरणा घेत काबिला व्हिलेजमध्ये एकूण ४ श्रेणीत ४६ आरामदायी अशा विशिष्ठ थीमवर आधारित रूम्स आहेत. व्हिलेज हट्स (Village Huts), वूडन चॅलेट्स (Wooden Chalets-स्वित्झर्लंडमधील घरांच्या धर्तीवर बांधलेली लाकडी झोपडी), कच्छी भुंगाज (Kutchi Bhungas) आणि प्रीमियम कॉटेजेस आदी ४ श्रेणींचा या मध्ये समावेश असून, यामध्ये पर्यटकांना आधुनिक सुविधांसह सुंदर, पारंपरिक वास्तुकलेचा अनुभव घेता येणार आहे.
‘काबिला हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आरामदायी आणि समृद्ध गावाची अनुभूती देण्यासाठी डिझाईन केले आहे. पारंपरिक आणि आधुनिक गरजांची पूर्तता करून पर्यटकांना सर्वार्थाने एका उत्कृष्ट गावाचा भारदस्त अनुभव देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मॉन्टेरिया व्हिलेजमध्ये अनोख्या अनुभवांची देणगी मिळेल, असा विश्वास मॉन्टेरिया रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक राही वाघानी यांनी सांगितले. शहरी राहणीमान, गजबजाटातून बाहेर पडून पर्यटकांना नवीन निसर्गाचा अनुभव देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले.
तब्बल ३६ एकर क्षेत्रफळात पसरलेल्या मॉन्टेरिया व्हिलेजमध्ये पर्यटकांसाठी विविध उपक्रम आणि आकर्षणे असणार आहेत. कला, संस्कृती आणि पारंपरिक उपक्रमांद्वारे ग्रामीण जीवनात डोकावून पाहण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. नुक्कड स्नॅक्स शॉपपासून बुफे सेवा देणाऱ्या ‘सब्राज रेस्टॉरंट’ आणि विस्तृत अशा ए-ला-कार्टे मेनू देणारे ‘कॅफे डी मॉन्टेरिया’, मॉकटेल आणि कॉकटेलचे विस्तृत पर्याय देणारे ‘ठेका’ तसेच मॉन्टोरिया व्हिलेजमध्ये प्रत्येक खवय्यासाठी काहीतरी खास आहे, गावाकडील अस्सल पाककृतीचे आधुनिक मिश्रण असलेले पदार्थ मिळणार आहेत.
मॉन्टेरिया व्हीलेजमध्ये काय विशेष –
गावची रपेट मारण्याची संधी: काबिला व्हिलेजमध्ये रूळल्यानंतर गावाची रचना अनुभवण्यासाठी फेरफटका मारणे आवश्यक आहे. त्यासाठी गावात हिरवेगार शेत, रंगबेरंगी कच्छी हाऊस आणि सरपंचाचे घर आहे. शिवाय गोशाळा (गायींचा गोठा), तलाव, गुहा, बोगदा, बांबूची चर, ओम मंदिरलाही भेट देता येते. येथे उभारलेल्या तात्पुरत्या रेल्वे स्थानकावरील रूळांवरून चालणे किंवा धबधब्याच्या खाली असलेल्या तलावात डुबक्या मारणे किंवा जवळच असलेल्या टेकडीवर ट्रेकिंग करण्याचा अनुभव घेता येणार आहे.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ (स्ट्रिट फूड): काबिला व्हिलेजमधील नुक्कड स्टॉलवर रस्त्यावरील खाद्यपदार्थांची चवही चाखता येते. यामध्ये पाणीपुरी, गोला, चना जोर गरम, ज्यूस यासारख्या अनेक पदार्थांचा समावेश आहे. याठिकाणी सब्राज रेस्टॉरंटमध्येही विविध पदार्थांचा आस्वाद घेता येतो, शिवाय चहा स्टॉलवर गरमा गरम चहाचे झुरकेही घेता येतात. या गावातील महिला घरगुती लोणचे, पापड विक्री करतात. त्यामुळे पर्यटकांना अस्सल गावचे पदार्थ या ठिकाणी मिळणार आहेत.
जत्रेला भेट द्या: काबिला व्हिलेजमध्ये सायंकाळी भरणारी जत्रा विशेष आकर्षण असते. या ठिकाणी सादर होणारे लोकनृत्य, संगीत, नाटक (मनोरंजनपर कलेचे सादरीकरण) आदींचे प्रत्यक्ष साक्षीदार होता येणार आहे. या ठिकाणी सादर होणाऱ्या संगीत, नृत्य, नाटकातून आपले कौशल्य दाखवणारे कलाकार न्याहाळण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे.
हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूंची खरेदी: बांबू आणि फर्निचर विणकरांनी साकारलेल्या विविध वस्तूंची खरेदी काबिला व्हिलेजमध्ये करता येणार आहे. बांबू आणि फर्निचर विणकरांबरोबर गावात सुतार, लोहार, न्हावी, शिंपी, कुंभार, सायकल दुरुस्तीची दुकानेही आहेत. आपल्याकडे एखादी धातूची वस्तू असल्यास त्यापासून उपयोगी वस्तूही या ठिकाणी घडवून मिळतात.
पारंपरिक खेळ खेळा: या ठिकाणी पारंपारिक खेळही खेळता येतात. यामध्ये गोट्या अर्थात कोयबा, चक दो राईड, अडथळ्यांचा रस्ता आणि झाडाच्या आच्छादनभोवती फिरणे आदी खेळांचा समावेश आहे.
खुली शेती ते हायड्रोफोनिक शेती: काबिला व्हिलेजमध्ये पारंपरिक ते आधुनिक अशा सर्व प्रकारच्या शेतीचे तंत्र आणि प्रक्रिया, शेती कशी करतात, हे जाणून घेता येणार आहे.ends GNI SG
Be the first to comment on "यंदाच्या उन्हाळ्यात मॉन्टेरियाच्या ‘काबिला’ व्हिलेजमध्ये सुटीचा आनंद घ्या कुटुंब आणि मित्रांसोबत येथील पारंपरिक गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी मुक्काम करण्याचे नियोजन करा"