भारतातील जारो एज्युकेशनची मिशिगन रॉसशी भागिदारी कार्यकारी शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासाठी धोरणात्मक भागिदार

मुंबई, ३१ मार्च २०२३ – जारो एज्युकेशन ही आघाडीची एडटेक कंपनी असून जागतिक दर्जाचे कार्यकारी शिक्षण पुरवणे हे तिचे ध्येय आहे. कंपनीने रॉस स्कूल ऑफ बिझनेस एक्झक्युटिव्ह एज्युकेशनशी जागतिक पातळीवर सहकार्य केले असून त्याअंतर्गत ऑनलाइन अभ्यासक्रमांचा प्रसार केला जाणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून भारतात वैयक्तिक पातळीवर तसेच विविध कंपन्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्यानंतर करण्यात आलेली ही धोरणात्मक भागिदारी मिशिगन रॉस एक्झक्युटिव्ह एज्युकेशनने भारतातील एखाद्या एडटेक कंपनीशी व्यवसायवृद्धीसाठी केलेली पहिलीच भागिदारी आहे.

मिशिगन रॉस आणि जारो एज्युकेशनने नुकताच त्यांचा पहिला जनरल मॅनेजमेंट अभ्यासक्रम लाँच केला. हा अत्याधुनिक जनरल मॅनेजमेंट अभ्यासक्रम जागतिक स्तरावरील लीडर्स, संचालक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि करियरच्या मध्य टप्प्यावर असताना आपली कौशल्ये अद्ययावत करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी योग्य आहे. या अभ्यासक्रमामध्ये सहा महिन्यांच्या कालावधीच्या पाच कोर्सेसचा समावेश असून ते मे २०२३ पासून सुरू होतील.

हा अभ्यासक्रम व्यावसायिकांना सर्वसमावेशक व्यावसायिक ज्ञान, व्यावसायिक संकल्पना आणि नव्याने उदयास येत असलेल्या संकल्पनांचे सखोल आकलन प्राप्त करण्यास मदत करून आपला विकास साधण्यासाठी तयार करतो. पाचही कोर्सेसपैकी प्रत्येक कोर्स निर्णय प्रक्रियेवर भर देणारा आहे, कारण तो व्यवस्थापनाचे सर्व पैलू अमलात आणण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. चार मूलभूत कोर्स व्यावसायिक कामकाजाची माहिती देणारे असल्यामुळे सहभागींना संवादासाठी आवश्यक शब्दसंग्रह आणि संस्थात्मक दृष्टीकोन मिळतो. त्याशिवाय या अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षणार्थीच्या आवडीचा एक खास कोर्स समाविष्ट करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांना आपले वैयक्तिक नेतृत्व ध्येय साध्य करता येते आणि व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करता येतो.

रंजिता रामन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जारो एज्युकेशन म्हणाल्या, ‘‘मिशिगन रॉससारख्या जगातील सर्वोत्तम बिझनेस स्कूल्सपैकी एका संस्थेशी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. व्यापक सामाजिक बदल लक्षात घेत आजच्या नेतृत्वापुढे असलेल्या आव्हानांवर उत्तर शोधणे आवश्यक आहे. ही आंतरराष्ट्रीय भागिदारी आणि तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या मदतीने प्रशिक्षणार्थींना सातत्याने बदलत असलेल्या या जगात पुढे राहाण्यासाठी नेतृत्व गुण आणि जागतिक दृष्टीकोन यांचे सखोल आकलन करून घेता येईल. विकासाच्या नव्या संधी तयार करता येईल व जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीवर राहाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करता येतील.’’

निकोलस हॅमिल्टन आर्चर, मुख्य कार्यकारी शिक्षण अधिकारी, मिशिगन रॉस म्हणाले,’’जारो एज्युकेशनसह आम्ही जागतिक दर्जाचे सहकार्यपूर्ण शैक्षणिक वातावरण तयार करण्यासाठी आणि व्यावसायिक लीडर्सना अर्थपूर्ण, कृतीवर भर देणारा, बहुआयामी दृष्टीकोन विकसित करून तीव्र स्पर्धेच्या या काळात वैयक्तिक आणि संस्थात्मक यश मिळवण्यासाठी मदत करत आहोत”.ends GNI SG

Be the first to comment on "भारतातील जारो एज्युकेशनची मिशिगन रॉसशी भागिदारी कार्यकारी शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासाठी धोरणात्मक भागिदार"

Leave a comment

Your email address will not be published.


*