मुंबई, २० मार्च २०२३ (GNI): नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समध्ये ८६ वर्षीय व्यक्तीची खराब झालेली हृदयाची व्हॉल्व्ह बदलण्यासाठी ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (टीएव्हीआय) ही प्रगत प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मुंबईत राहणाऱ्या श्री. यशवंत अहिरे या रुग्णाच्या हृदयाची व्हॉल्व्ह (एऑर्टिक स्टेनोसिस) गंभीररित्या अरुंद झाली होती, ज्यामुळे रक्तप्रवाह मर्यादित प्रमाणात होत होता. त्यांच्यामध्ये उच्च रक्तदाब आणि इस्केमिक हृदयविकाराची लक्षणे आढळून आली होती आणि त्यांना पूर्वी मधुमेहाचा त्रास देखील होता. त्यांचे वय तर जास्त होतेच, त्याचबरोबर त्यांना याआधी हृदयाच्या समस्या देखील होत्या, यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचे झाले होते, ज्यामध्ये कोरोनरी बायपास शस्त्रक्रियेने उपचार केलेल्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज या समस्येचा देखील समावेश होता. रुग्णाच्या स्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर, उपस्थित असलेल्या कार्डिओलॉजी टीमने खराब झालेले व्हॉल्व्ह बदलण्यासाठी ऍक्युरेट निओ2 नावाची नवीन व्हॉल्व्ह प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला.
डॉ. राहुल गुप्ता, वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट,रिदम डिसऑर्डर-व्हॉल्व्ह विशेषज्ञ, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले की,”श्री.अहिरे यांना एऑर्टिक स्टेनोसिसचा त्रास होता, ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाच्या बाहेर आणि शरीराच्या इतर भागात रक्त प्रवाह नियंत्रत करणारे हृदयातील मुख्य व्हॉल्व्ह अरुंद होते आणि व्यवस्थित उघडले जात नाही. तसेच कॅल्सिफिकेशन खूप कठोर आणि कडक झाले होते व अवघड जागेवर होते, ज्यामुळे हे प्रकरण खूपच धोकादायक झाले होते. १९९८ मध्ये कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (सीएबीजी) आणि २०१६ मध्ये वैद्यकीय व्यवस्थापन करुन कोरोनरी अँजिओग्राफी अशा भूतकाळातील समस्या असल्यामुळे अतिरिक्त नियोजन आवश्यक होते. बऱ्याचदा रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीनुसार व्हॉल्व्ह विविधतेसह उपलब्ध असतात. पण आमच्या रुग्णामध्ये चकीत करणारे अनेक घटक आढळून आले ज्यामुळे योग्य व्हॉल्व्हची निवड करणे कठीण होऊन बसले. खूप विचार व चर्चा केल्यानंतर आम्ही ऍक्युरेट निओ2 व्हॉल्व्ह प्रणालीचा वापर करुन टीएव्हीआय प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही प्रक्रिया श्री. अहिरे यांच्यासाठी योग्य होती. अत्यंत आधुनिक व्हॉल्व्ह वापरण्याची महाराष्ट्रातील ही दुसरी आणि नवी मुंबईतील पहिली घटना आहे. या प्रकरणात माझ्या टीमने मला पूर्णपणे सहकार्य केले, या टीममध्ये डॉ. चरण रेड्डी आणि डॉ. राजेश मट्टा यांचा देखील समावेश होता.”
श्री.संतोष मराठे, पश्चिम क्षेत्र-प्रादेशिक सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले की,”नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे उच्च दर्जाच्या स्ट्रक्चरल हार्ट डिजेस प्रोसिजर (संरचनात्मक हृदयविकारासंबंधी प्रक्रिया) करत आहेत, ज्यामुळे देशातील आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्हीकडच्या रुग्णांना या सेवांचा लाभ मिळत आहे. आमच्या कार्डिओलॉजी टीममध्ये अशा जटिल प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रमाणित इम्प्लांटर (प्रत्यारोपक) असलेले तज्ञ कार्डिओलॉजिस्ट आहेत त्याचबरोबर पेसमेकर प्रक्रिया करण्यासाठी प्रमाणित तज्ञ देखील आहेत. ज्यांच्यावर वयामुळे किंवा इतर कारणामुळे ओपन हार्ट शस्त्रक्रिया करता येत नाही अशा गंभीर एऑर्टिक स्टेनोसिसने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी प्रगत टीएव्हीआय प्रक्रिया ही आशेचा किरण म्हणून समोर येत आहे. नवीनतम ऍक्युरेट निओ2 व्हॉल्व्ह प्रणाली वापरून ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आम्हाला आमच्या वैद्यकीय टीमचा अभिमान वाटत आहे.”ends GNI SG
Be the first to comment on "नवी मुंबईत ८६ वर्षीय वृद्धावर ‘टीएव्हीआय’ प्रक्रिया यशस्वीपणे पारऍक्युरेट निओ-2 व्हॉल्व्ह वापरण्याची नवी मुंबईतील पहिलीच घटना"