माननीय नामदार श्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी स्वच्छता अभियान

मुंबई, 10th Sept., 2022 (GNI): माननीय नामदार श्री गिरीश महाजन (मंत्री ग्रामविकास-पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण) उपस्थितीत गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जनानंतर जमा होणाऱ्या निर्माल्याची व इतर कचर्‍याची विल्हेवाट लावण्यायासाठी स्वच्छता अभियानांतर्गत कार्यास सुरुवात करण्यात आली.

मा. मंत्रीमहोदय  माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींनी सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मा. मंत्रीमहोदय श्री गिरीशजी महाजन यांनी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्थेचे माननीय श्री.एन बी. मोटे राज्य चिटणीस(अ.का), मध्य मुंबई जिल्हा संस्था, दादर. पूर्व मुंबई उपनगर जिल्हा संस्था,चेंबूर.पूर्व मुंबई व पश्चिम मुंबई जिल्हा संस्था आझाद मैदान मुंबई येथील विविध शाळेतील स्काऊट गाईड रोव्हर रेंजर युनिट लीडर, राज्य कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व इतर असे ४०० सभासद,एन.सी.सी. मधील १५०० मुले व मुली  आणि अधिकारी असे एकूण १९०० सभासद या मोहिमेमध्ये सहभागी झाले. तसेच मा. मंत्रीमहोदय श्री गिरीशजी महाजन यांनी सर्व उपस्थित जनतेला जाणीव करून दिली कि, स्वच्छता राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि ते आपण परिपूर्ण केले पाहिजे. प्रत्येकांनी हि जबाबदारी घेऊन स्वचाता केली पाहिजे असे ते म्हणाले.

मा. मंत्रीमहोदय श्री गिरीशजी महाजन यांनी एन.सी.सी व स्काऊट गाईड विद्यार्थी सकाळपासून जे कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व महत्वाचे मार्गदर्शन केले कि, आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तशाचप्रकारे आपली गल्ली, परिसर स्वच्छ ठेवले पाहजे असे बोलून एन.सी.सीच्या विद्यार्त्याना वार्षिक भत्यात वाढ करून देण्याचे कार्य यांच्या हस्ते झाले. यापूर्वी वार्षिक भत्ता १० रुपये मिळत होता तो ९० रुपयांनी वाढवून एकूण 100 रुपये करून देण्यात आला. त्याचबरोबर अजून कोणतीही मदत हवी असेल त्याची खात्रीपूर्वक पूर्तता केली जाईल याचे आश्वासनही देलीये. तसेच सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  Ends GNI SG

Be the first to comment on "माननीय नामदार श्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी स्वच्छता अभियान"

Leave a comment

Your email address will not be published.


*