जागतिक दर्जाचे आरोग्यसेवा संकुल अपोलो विकसित करणार हरयाणाच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये आधुनिक आरोग्यसेवांचे लाभ पोहोचवण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स काम करेल

नवी मुंबई, ९ ऑगस्ट २०२२ (GNI): आरोग्यसेवा क्षेत्रातील प्रणेते आणि रुग्णालयांची भारतातील पहिली मल्टीस्पेशालिटी शृंखला, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड ने आज घोषणा केली की त्यांनी नयती हेल्थकेयर अँड रिसर्च एनसीआर प्रायव्हेट लिमिटेडकडून हॉस्पिटल झोन जमिनीवर, ७ लाख चौरस फुटांपेक्षा जास्त ६५० खाटांच्या क्षमतेसह, गुरुग्राम येथे हॉस्पिटलची मालमत्ता अधिग्रहीत विकत घेतली आहे. या व्यवहाराचे एकूण मूल्य जवळपास ४५० कोटी रुपये आहे. या विक्रेत्यांनी ही जमीन डीएलएफ कुतुब एन्क्लेव्ह कॉम्प्लेक्स मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टने २०११ साली विकत घेतली होती.

हे अधिग्रहण म्हणजे भारतामध्ये आरोग्यसेवा क्षेत्रात अपोलो हॉस्पिटल्सच्या उच्च दर्जेदार वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून हरयाणा राज्यात अपोलो हॉस्पिटल्सचे हे पहिले पाऊल आहे. भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या शहरांपैकी एक, गुरुग्राम या मिलेनियम शहरामध्ये हे रुग्णालय अपोलो ग्रुपचे स्थान निर्माण करेल. या क्षेत्रामध्ये अपोलो हॉस्पिटल्सच्या सध्याच्या उपस्थितीमुळे त्यांच्यासाठी ही लक्षणीय ब्रँड इक्विटी ठरेल. गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवर नवे इंटिग्रेटेड हेल्थकेयर कॉम्प्लेक्स २४ महिन्यांमध्ये सुरु करण्यात येईल. अनुभवी फॅकल्टी आणि आंतरराष्ट्रीय सहयोगातून राज्यातील व देशातील नागरिकांना अत्याधुनिक क्लिनिकल सुविधा आणि सेवा याठिकाणी उपलब्ध करवून दिल्या जातील आणि एक इंटरनॅशनल हेल्थकेयर डेस्टिनेशन ही या शहराची ठळक ओळख निर्माण केली जाईल.

डिजिटल हेल्थकेयर, हेल्थकेयर एक्सिलिरेटर्स आणि स्टार्ट-अप्समध्ये प्रगतीला खतपाणी घालण्याचे काम देखील गुरुग्राममधील या रुग्णालयातून केले जाईल व अशाप्रकारे हे रुग्णालय देशाच्या हेल्थकेयर इको सिस्टिममध्ये योगदान देईल, आघाडीच्या प्रथा व जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवांमध्ये देशाचे व हरयाणा राज्याचे नाव मोठे करेल.

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप ज्या-ज्या ठिकाणी कार्यरत आहे तिथे संपूर्णतः ऑपरेटिंग इकोसिस्टिम निर्माण करण्यासाठी सतत काम केले आहे. हरयाणा राज्याच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये आधुनिक आरोग्यसेवांचे लाभ पोहोचवण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स काम करेल. राज्याच्या आरोग्य धोरण व्हिजनमध्ये सरकारने आखलेली उद्दिष्ट्ये व लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला खूप जवळून सहयोग प्रदान करेल.

५.६३ एकर जमिनीवर, ६५० संभाव्य खाटांच्या क्षमतेसह अपोलो हॉस्पिटल्स सेंटर्स ऑफ एक्सेलेन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सब-स्पेशालिटीज आणि आपल्या उपजत क्लिनिकल उत्कृष्टतेमध्ये आपले खऱ्या अर्थाने अनोखे क्लिनिकल प्रोग्राम्स प्रस्तुत करेल. या शहरात राहणाऱ्या लोकांबरोबरीनेच एनसीआर व परदेशातील सर्व लोकांसाठी ही सुविधा खूपच लाभदायक ठरेल.ends GNI SG

Be the first to comment on "जागतिक दर्जाचे आरोग्यसेवा संकुल अपोलो विकसित करणार हरयाणाच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये आधुनिक आरोग्यसेवांचे लाभ पोहोचवण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स काम करेल"

Leave a comment

Your email address will not be published.


*