नवी मुंबई, ०५ ऑगस्ट २०२२ (GNI): नर्सिंग शिक्षणात न्यूरोसायन्सचा समावेश एक स्वतंत्र विषय म्हणून क्वचितच केला जातो. न्यूरोसायन्स आणि न्यूरॉलॉजि मधील अंतर भरून काढण्यासाठी, अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई यांच्यातर्फे न्यूरॉलॉजिनर्सिंग शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. न्यूरोसायन्स आणि न्यूरॉलॉजि रुग्णांना रोगमुक्त करणे या गोष्टीचा देखील समावेश होता.
डॉ रविशंकर, सह -वैद्यकीय संचालक, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले कि,”अपोलो हॉस्पिटलमध्ये आमच्या रुग्णांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन दाखवावे असे ध्येय आम्ही ठेवतो. न्यूरो रुग्णांच्या गंभीर आजारासाठी वैद्यकीय सेवा देण्यात माहीर असलेल्या परिचारकांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती.ज्यामध्ये प्रवासादरम्यान अपघात झालेल्या मिरगी (फेफरे) आलेल्या रुग्णांना हाताळणे आणि त्यांना रोगमुक्त करणे यासारख्या प्रशिक्षणामुळे न्यूरो रुग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून येतील. ही कार्यशाळा म्हणजे सल्लागारांचे मार्गदर्शन आणि न्यूरो रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रगत उपकरणांवरील प्रशिक्षण अशा दोन्ही स्वरूपाचे सुंदर संयोजन होते.”ends GNI SG
Be the first to comment on "नवी मुंबईत ‘न्यूरॉलॉजि नर्सिंग शैक्षणिक कार्यशाळेचे’ आयोजन"