मुंबई, २८ जुलै २०२२ (GNI): फर्निचर आणि घरगुती वस्तूंच्या ईकॉमर्समधील भारतातील एक आघाडीची कंपनी पेपरफ्रायने जगामध्ये पहिल्यांदाच, २४ तास फर्निचर डिलिव्हरी सेवा सुरु केल्याची घोषणा आज केली. मुंबई, दिल्ली-एनसीआर आणि बंगलोरमध्ये पेपरफ्रायने ही सेवा सुरु केली आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत ऑर्डर नोंदवल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी त्या वस्तू घरपोच मिळण्याचा आनंद आणि समाधान ग्राहकांना मिळवून देण्याच्या उद्देशाने पेपरफ्रायने ही धोरणात्मक लॉजिस्टिकल सहायता देऊ केली आहे.
भारतातील ५०० पेक्षा जास्त शहरांमध्ये १०० लाख डिलिव्हरीजचा लक्षणीय टप्पा पेपरफ्रायने नुकताच पार केला. मुंबई, गुरुग्राम व बंगलोर या शहरांमध्ये स्थित असलेले, फर्निचर आणि घरगुती वस्तूंच्या क्षेत्रातील सर्वात मोठे वेयरहाऊसिंग नेटवर्क या कंपनीने उभारले असून, तब्बल १०,००० हुन जास्त पिन कोड्सना सेवा पुरवण्याचे काम त्याच्यामार्फत केले जाते. ‘पेपकार्ट’ हा इन-हाऊस डिलिव्हरी प्लॅटफॉर्म सर्वात मोठे बिग-बॉक्स पुरवठा शृंखला नेटवर्क असून त्यामध्ये ग्राहकांना फर्स्ट व लास्ट माईल लॉजिस्टिक्स सेवा पुरवल्या जातात. गेल्या दशकभरात कंपनीने ३०० पेक्षा जास्त ट्रक्सच्या समर्पित ताफ्याच्या साहाय्याने ९,१२,००० शिपमेंट्स पोहोचवून कामकाजात उत्कृष्ट कामगिरी बजावली. कस्टमाइज्ड हँडलिंग टूल्स व सक्षम इन्स्टॉलेशन सेवांचा उपयोग करणाऱ्या या कंपनीचा फर्निचर विभागात डॅमेज रेट अवघा १% नोंदवला गेला आहे.
श्री.आशिष शाह, सह-संस्थापक व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, पेपरफ्राय म्हणाले,“२४ तास ऑनलाईन फर्निचर डिलिव्हरीची सेवा जगात पहिल्यांदा पेपरफ्राय सुरु करत असल्याची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे. फर्निचरचा आकार आणि वजन खूप जास्त असते त्यामुळे त्यांची इतक्या जलद डिलिव्हरी दिली जाणे ही बाब आमच्या उद्योगक्षेत्रामध्ये नवे परिवर्तन घडवून आणेल. आमच्या सहयोगी व्यापाऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावरील व्यापार मंचाचे नेतृत्व करण्याचा प्रदीर्घ अनुभव आमच्या गाठीशी आहे. फर्निचर व घरगुती वस्तूंच्या बाजारपेठेचे लोकशाहीकरण करण्यासाठी पेपरफ्रायने आजवर हजारो सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना व कारीगरांना एक व्यवसाय इकोसिस्टिम उभारण्यासाठी सक्षम केले आहे. आमच्या पुरवठा शृंखलेतील १५०० कार्यक्षम व प्रेरित सदस्यांची टीम अधिकाधिक जलद डिलिव्हरीजसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. तत्परतेने, वेळेवर सेवा उपलब्ध करवून देऊन ग्राहकांना अधिकाधिक समाधान मिळवून देणे हा आमचा उद्देश आहे.”
श्री. पियुष अगरवाल, पुरवठा शृंखलेचे प्रमुख, पेपरफ्राय यांनी सांगितले, “मुंबई, दिल्ली व बंगलोरमध्ये आम्ही ८७% बिल्ड-टू-स्टॉक ऑर्डर्स २४ तासांत डिलिव्हर केल्या आहेत. एखाद्या उत्पादनाची इच्छा मनात उत्पन्न होण्यापासून ती वस्तू प्रत्यक्षात मिळाल्याचा आनंद ग्राहकाला प्रदान करण्यापर्यंतचा प्रवास जलद आणि विनासायास पार पडावा यासाठी आमची पुरवठा शृंखला कार्यरत असते. गेल्या दोन वर्षात आम्ही ७ लाख चौरस फूट वेयरहाऊसिंग जागेच्या व्यवस्थापनासाठी आम्ही इन-हाऊस क्षमता निर्माण केल्या आहेत ज्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना त्यांना हव्या असलेल्या वस्तूंच्या मालकीचा परिपूर्ण अनुभव प्रदान करण्यात मदत मिळाली आहे. आमच्या कामातून आम्ही असे मापदंड निर्माण करू ज्याचे पालन संपूर्ण उद्योगक्षेत्राकडून केले जाईल.”
इतर व्यापार उद्योग व उत्पादन विभागांच्या तुलनेत फर्निचर आणि घरगुती वस्तूंच्या उद्योगक्षेत्राला एन्ड-टू-एन्ड पुरवठा शृंखला पायाभूत सेवासुविधांसाठी अनोखा व सूक्ष्म दृष्टीकोनाची गरज असते. उत्तम दर्जा आणि अनुभव प्रदान करण्यासाठी फर्निचरचे विविध भाग जपून साठवून ठेवावे लागतात.
पेपरफ्रायने एकात्मिक बिग-बॉक्स पुरवठा शृंखला निर्माण केली आहे जी सर्वोत्कृष्ट सेवा आणि संचालनाचे ठोस लाभ प्रदान करण्यासाठी नावाजली जाते. ९०% पेक्षा जास्त असेम्ब्ली २४ तासांच्या आत पूर्ण केली जाते. पेपरफ्रायवर फर्निचर, घरगुती सजावट आणि गाद्यांचे अनेक विविध पर्याय असलेला विशाल डिजिटल कॅटलॉग उपलब्ध आहे, त्यामध्ये खाजगी लेबल्सचा देखील समावेश आहे. बाजारपेठेमध्ये नेतृत्वस्थान मिळवलेल्या ईकॉमर्स बिझनेस मॉडेलचा वापर करून ग्राहक त्यांना हव्या असलेल्या वस्तूंचा शोध घेऊ शकतात, माहिती जमा करू शकतात, निवड करून फर्निचर व घरगुती वस्तू विकत घेऊ शकतात. Ends GNI SG
Be the first to comment on "पेपरफ्रायने सुरु केली ‘२४-तास फर्निचर डिलिव्हरी’ सेवा, भारतातील ५०० पेक्षा जास्त शहरांमध्ये १०० लाख डिलिव्हरीजचा लक्षणीय टप्पा पेपरफ्रायने नुकताच पार केला"