नवी मुंबईमध्ये केली पहिली ‘ट्रान्सकॅथेटर मिट्रल व्हॉल्व रिपेयर थेरपी’, ६४ वर्षीय महिलेवर रुग्णावर पहिली ‘मिनीमली इन्व्हेसिव्ह मिट्रल हार्ट व्हॉल्व रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया यशस्वी

नवी मुंबई, ४ जुलै २०२२ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई या आघाडीच्या टर्शरी केयर रुग्णालयामध्ये ट्रान्सकॅथेटर तंत्र वापरून एक मिनीमली इन्व्हेसिव्ह प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. ६४ वर्षे वयाच्या महिलेवर ट्रान्स-कॅथेटर मिट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील डॉक्टरांनी केलेली ही शस्त्रक्रिया जवळपास २ तासांहून जास्त वेळ चालली. टीएमव्हीआर अर्थात ट्रान्स-कॅथेटर मिट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंटमध्ये कार्डिओलॉजिस्ट आधी शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपित केलेला आणि आता नीट काम करत नसलेला मिट्रल व्हॉल्व काढून त्याजागी नवीन व्हॉल्व लावतात आणि हे सर्व शस्त्रक्रिया न करता केले जाते. या प्रक्रियेदरम्यान कार्डिओलॉजिस्ट प्रगत इमेजिंग तंत्र वापरून रक्तवाहिनीमध्ये एक कॅथेटर (एक पातळ लवचिक ट्यूब) घालतात आणि एका नवीन व्हॉल्वसोबत ती हृदयापर्यंत नेली जाते. यामध्ये रुग्णाला वेदना कमी होतात आणि त्याची तब्येत देखील अधिक लवकर सुधारते.

डॉ. राहुल गुप्ता, कन्सल्टन्ट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले, “हृदय विकारांवर टीएमव्हीआरसारखे संरचनात्मक उपचार इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी क्षेत्रातील खूप मोठे यश आहे. ओपन हार्ट सर्जरीमध्ये ज्यांना धोका असतो किंवा गुंतागुंत होण्याची शक्यता असते अशा वयस्कर रुग्णांवर देखील अशा नॉन-सर्जिकल, मिनीमली इन्व्हेसिव्ह प्रक्रियेमार्फत अतिशय सुरक्षित पद्धतीने उपचार केले जाऊ शकतात. या केसमध्ये आम्ही तेच केले आहे.”

ठाण्यामध्ये राहणाऱ्या ६४ वर्षे वयाच्या या रुग्ण महिलेला श्वास घेण्यात त्रास होत होता, शिवाय भरपूर खोकला येत होता. १५ वर्षांपूर्वी अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईतील कन्सल्टन्ट, कार्डिओव्हस्क्युलर आणि थोरॅसिस सर्जरी डॉ शांतेश कौशिक यांच्या देखरेखीखाली या महिलेवर मिट्रल व्हॉल्व रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आवश्यक सर्व तपासण्या करण्यात आल्यावर असे लक्षात आले की आधीच्या व्हॉल्व रिप्लेसमेंटनंतर इतकी वर्षे उलटून गेल्याने तो व्हॉल्व खराब झाला होता आणि त्याला बदलणे गरजेचे होते. पुन्हा ओपन हार्ट सर्जरी करणे या महिलेसाठी धोक्याचे होते, त्यामुळे खराब झालेला मिट्रल व्हॉल्व बदलण्यासाठी मिनीमली इन्व्हेसिव्ह परक्युटेनियस दृष्टिकोन वापरला गेला. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये करण्यात आलेली ही पहिली ट्रान्सकॅथेटर मिट्रल व्हॉल्व रिपेयर थेरपी होती, ज्यामध्ये मिनीमली इन्व्हेसिव्ह उपचार करण्यात आले. मिनीमली इन्व्हेसिव्ह प्रक्रिया रुग्णांसाठी सहजसोपी आणि सुरळीतपणे पार पडणारी ठरली आहे कारण यामध्ये गुंतागुंत होण्याच्या शक्यता खूपच कमी असतात, रक्तस्त्राव अगदी नगण्य प्रमाणात होतो, वेदना कमी होतात आणि प्रक्रिया करून झाल्यानंतर रुग्णाची तब्येत अधिक जलद गतीने सुधारते.

या रुग्ण महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. राहुल गुप्ता, कन्सल्टन्ट, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, डॉ. शांतेश कौशिक, कन्सल्टन्ट, कार्डिओव्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जन, डॉ. चरण रेड्डी, कन्सल्टन्ट, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, डॉ. राजेश मत्ता, कन्सल्टन्ट, कार्डिओलॉजी, डॉ. लीना मोरे, ऍनेस्थेटिस्ट तसेच कॅथ लॅब व ओटी तंत्रज्ञांचा समावेश होता. सर्जरीनंतर रुग्ण महिलेच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा होत आहेत.ends GNI SG

Be the first to comment on "नवी मुंबईमध्ये केली पहिली ‘ट्रान्सकॅथेटर मिट्रल व्हॉल्व रिपेयर थेरपी’, ६४ वर्षीय महिलेवर रुग्णावर पहिली ‘मिनीमली इन्व्हेसिव्ह मिट्रल हार्ट व्हॉल्व रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया यशस्वी"

Leave a comment

Your email address will not be published.


*