गुडघ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी विशेष उपक्रमनवी मुंबईत ‘हॅप्पी-नीज वॉकथॉन’ चे आयोजन

नवी मुंबई, ६ जून २०२२ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने वॉकथॉनचे आयोजन केले होते. गुडघ्यांच्या आरोग्याविषयी जनमानसामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सने हे विशेष पाऊल उचलले होते. अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई आणि ऑर्थोपेडिक टीमचे जॉईंट मेडिकल डायरेक्टर डॉ. रवी शंकर, कन्सल्टन्ट, ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी डॉ संजय धर, कन्सल्टन्ट, ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी डॉ प्रशांत अगरवाल आणि कन्सल्टन्ट, ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी डॉ विक्रम पावडे यांनी या वॉकथॉनला हिरवा झेंडा दाखवला.

वॉकथॉनमध्ये विविध क्षेत्रातील ५०० पेक्षा जास्त व्यक्तींनी भाग घेतला होता. सकाळी साडेसात वाजता अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईपासून सुरु झालेली ही वॉकथॉन ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे संपन्न झाली आणि त्यानंतर सहभागी झालेल्यांना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ.रवी शंकर, जॉईंट मेडिकल डायरेक्टर, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले, “आपल्या गुडघ्यांचे आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे सर्वांना समजावे यासाठी वॉकथॉनचा उपक्रम राबवण्यात आला. निरोगी आहार व नियमित व्यायामाने जीवनशैलीमध्ये लक्षणीय बदल घडवून आणणे गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर भर देणे हा देखील या उपक्रमाचा हेतू होता. इतक्या प्रचंड संख्येने लोक या उपक्रमात सहभागी झाले ही बाब नक्कीच प्रोत्साहक आहे.”

श्री. संतोष मराठे, क्षेत्रीय-मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले, “शहरी भागांमध्ये गुडघ्यांच्या समस्या उद्भवण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे आणि या समस्यांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये युवकांची संख्या देखील वाढते आहे.असंसर्गजन्य आजारांबाबत जागरूकता वाढावी यासाठी अपोलो हॉस्पिटल्स सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला सहकार्य करत आहे. कोविडनंतर प्रत्येक नागरिकांच्या आरोग्यावर भर देणे अधिक जास्त महत्त्वाचे बनले आहे. लोकांना जागरूक करण्यासाठी आणि सर्वोत्तम आरोग्यसेवा करण्यासाठी विविध उपक्रम व अभियाने आयोजित करण्यात अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई नेहमीच आघाडीवर असते. सर्वोत्कृष्ट क्लिनिकल परिणाम मिळवून देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाच्या देखभाल सेवा पुरवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”ends GNI SG

Be the first to comment on "गुडघ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी विशेष उपक्रमनवी मुंबईत ‘हॅप्पी-नीज वॉकथॉन’ चे आयोजन"

Leave a comment

Your email address will not be published.


*