टाटा समूहाची देखील कार्किनोसमध्ये ११० कोटीची गुंतवणुक आरोग्यसेवा-सुविधांच्या विकासासाठी ‘मायो क्लिनिक’ ची कार्किनोस हेल्थकेअरमध्ये गुंतवणूक

मुंबई, २३ मे २०२२ (GNI): तंत्रज्ञान-प्रणित ऑन्कोलॉजी केंद्रित व्यवस्थापित आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म कार्किनोस हेल्थकेअरने आज जाहीर केले की मायो क्लिनिकने काही अटींच्या आधीन राहून कंपनीमध्ये अल्प भागभांडवल गुंतवले आहे. या कराराचा एक भाग म्हणून मायो क्लिनिक कार्किनोस संचालक मंडळावर एक सदस्य देखील नियुक्त करेल.

भारतात डिस्ट्रिब्युटेड कॅन्सर केअर नेटवर्क मॉडेलची उभारणी करण्यात अग्रणी असलेल्या कार्किनोस हेल्थकेअर मध्ये रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, क्रिस गोपालकृष्णन, रॉनी स्क्रुवाला, विजय शेखर शर्मा आणि भाविश अगरवाल गुंतवणूकदारांपैकी आहेत. टाटा समूह कार्किनोसमध्ये ११० कोटी रुपये गुंतवत आहे तर जागतिक पातळीवरील क्लिनिकल स्टेज जैवतंत्रज्ञान कंपनी राकुटेन मेडिकल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स डिजिटल हेल्थ यांच्याकडे अल्प समभाग आहेत. व्हेंचर कॅपिटल फंड एंडिया पार्टनर्सचीही कंपनीत भागीदारी आहे.

कर्करोग रुग्णांच्या क्लिनिकल गरजा पुरवत कार्किनोस भारतातील डिस्ट्रिब्युटेड कॅन्सर केअर नेटवर्क मॉडेलची उभारणी करत आहे. कंपनी अनेक आरोग्य सेवा संस्था आणि ऑन्कोलॉजी इकोसिस्टममधील व्यावसायिकांसोबत काम करते आणि एका मजबूत तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मच्या मदतीने रूग्णांची काळजी घेण्याचे काम यशस्वीरित्या करत आहे. केरळमधील एर्नाकुलम आणि इडुक्की जिल्ह्यांतील कोथमंगलम, चोट्टानिकारा, थोडुपुझा, मुन्नार या ठिकाणी कार्किनोस आधीपासूनच आपल्या सेवा देत आहे आणि भारतभर त्याचे कार्य वाढवण्याची योजना आखत आहे. कंपनी मणिपूर सरकारच्या भागीदारीत इंफाळ येथील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (JNIMS) परिसरात कॅन्सर सेंटरही स्थापन करत आहे. Ends GNI SG

Be the first to comment on "टाटा समूहाची देखील कार्किनोसमध्ये ११० कोटीची गुंतवणुक आरोग्यसेवा-सुविधांच्या विकासासाठी ‘मायो क्लिनिक’ ची कार्किनोस हेल्थकेअरमध्ये गुंतवणूक"

Leave a comment

Your email address will not be published.


*