Mumbai, 19th May 2022 (GNI): तुम्ही याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा निसर्गाची आपल्याला शिक्षा देण्याची पद्धत म्हणा. पण या उन्हाळ्यात प्रचंड ऊनाच्या झळांपासून कोणाचीही सुटका झालेली नाही. सोनी सबचा खास शो असलेला ‘वागले की दुनिया’ आता नवीन कथानकासह आला आहे. त्यात या उन्हाळ्यात आपल्या जगण्याचा वेग कमी करून फिट राहण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. राजेश (सुमीत राघवन) हा या प्रचंड उष्णतेच्या लाटेदरम्यान भरपूर पाणी पिण्याचे आणि स्वतःची काळजी घेण्याचे महत्त्व जाणतो. तो संपूर्ण साई दर्शन सोसायटीला आणि त्याच्या कार्यालयात गाइड म्हणून एक पत्रक वाटतो. परंतु त्याच्याकडे त्याचे कुटुंब, सोसायटीतील सदस्य आणि त्याचे सहकारी दुर्लक्ष करतात. तो या मार्गदर्शक तत्वांचे महत्त्व पटवण्यासाठी खूप प्रयत्न करतो आणि त्यावेळी त्याला दुर्दैवी उष्माघाताचा झटका बसतो व हीट स्ट्रोक होतो.
राजेशच्या प्रकृतीबद्दल सगळे काळजीत आणि चिंतेत असताना तो स्वतःला स्वतःचीच मार्गदर्शक तत्वे आठवून शांत करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्याला कळते की आपले डोके शांत ठेवले पाहिजे आणि त्याचा परिणाम म्हणून शरीर वेगाने बरे होऊ शकते. आपल्या सुरेख पद्धतीने लिहिलेल्या कथांद्वारे वागले की दुनिया हा परिणाम परत साध्य करते. एक साधा संदेश जो खूप महत्त्वाचा आहे आणि राजेश या हीट स्ट्रोकमधून बरा होतो की नाही हे पाहणे मजेशीर असेल. परंतु त्याचवेळी या प्रचंड हीट वेव्हपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याचा सल्ला ऐकला पाहिजे.
राजेश वागळेच्या भूमिकेतील सुमीत राघवन म्हणाले की, “हीच आमच्या शोची खासियत आहे. आम्ही सामान्य लोकांच्या काळजीचे विषय घेतो आणि सामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरेल असे कंटेंट त्यातून तयार करतो. आम्ही पृथ्वीचा आणि निसर्गाचा अपमान करून ही वेळ आपल्यावर ओढवून घेतली आहे. त्यामुळे आम्हाला स्वतःचे उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ही गोष्ट हलक्यात घेण्याची नाही आणि हीट स्ट्रोक टाळण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. ‘वागले की दुनिया’मध्ये आम्ही कायम अशा चांगल्या कथानकांद्वारे आणि हास्य कल्लोळाद्वारे तुमच्या पाठीशी राहू. त्यामुळे भरपूर पाणी प्या, घरी राहा आणि वागले की दुनिया पाहत राहा.” पाहत राहा ‘वागले की दुनिया- नयी पीढी, नये किस्से’ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त सोनी सबवर!
Be the first to comment on "सोनी सबच्या वागले की दुनियामध्ये राजेश वागळेला उष्माघाताचा त्रास!"